Shree Tirupati Balajee Agro Trading Company चा IPO ५ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्द असणार आहे. चला तर पाहूया आयपीओची संपूर्ण माहिती.
कंपनीचे आजचे ग्रे मार्केट:
कंपनीच्या ग्रे मार्केट चा आजचा प्रीमिअम सोमवार दिनांक ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत १३३ रु. प्रती शेअर आहे. ( ग्रे मार्केट demand नुसार कमी जास्त होत असतो.)
श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंग कंपनी लिमिटेड कंपनीची माहिती | Shree Tirupati Balajee Agro Trading company Information
श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंग कंपनी लिमिटेड हि कंपनी २००१ मध्ये स्थापन झाली असून देशातील बाजारपेठांमध्ये आणि परदेशात फ्लेक्झिबल इंटरमीडिएट बल्क कंटेनर्स (FIBCs), म्हणजेच मोठ्या लवचिक पिशव्या आणि विणलेल्या सॅक, विणलेले फॅब्रिक, अरुंद फॅब्रिक आणि टेप यासारख्या औद्योगिक पॅकेजिंग उत्पादनांचे उत्पादन आणि विक्री करते.
Tirupati Balajee Agro Trading कंपनी, Honorable Packaging Private Limited (HPPL), श्री तिरुपती बालाजी FIBC लिमिटेड (STBFL), आणि जगन्नाथ प्लास्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड (JPPL) यांसारख्या उपकंपन्यांमार्फत काम करते.
श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंग कंपनी लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Shree Tirupati Balajee IPO Availability of Shares
Shree Tirupati Balajee Agro Trading कंपनीच्या आयपीओची एकूण किंमत १६९.६५ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या २,०४,४०,००० आहे त्यातील १२२.४३ कोटी रुपयांचे १,४७,५०,००० शेअर्स फ्रेश इश्शु (Fresh Issue) आहेत आणि ४७.२३ कोटी रुपयांचे ५६,९०,००० शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale) आहेत.
अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.tirupatibalajee.net/