आज आपण या लेखात स्टॉक मार्केटची बेसिक माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला शेअर बाजाराचे नाव ऐकले कि खूप भीती वाटते पण कोरोना काळात आपण चांगले अनुभवले आहे कि या काळात जरी बरेचसे business बंद असले तरी शेअर मार्केट हा असा business होता कि तो traders ना पैसे कमवून देत होता त्यामुळे बऱ्याच व्यक्तींचा कल हा शेअर मार्केटकडे वळला आहे. आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये पहिले असेल कि शेअर बाजारमूळे बरेच जण कर्जबाजारी झाले आहेत, बेघर झाले आहेत. आणि काही जण याच शेअर बाजारमुळे श्रीमंत सुद्धा झाले आहेत मग हे शेअर मार्केट म्हणजे काय, त्याची सुरुवात कशी करायची, किती रिस्की आहे हे शेअर मार्केट मार्गदर्शन आपण मराठी भाषेतून अगदी सोप्या पध्दतीने पहाणार आहोत.
शेअर्स म्हणजे काय | What is Shares
एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे, म्हणजे त्या कंपनीचे मालकी हक्क खरेदी करणे होय.
आपण जितके शेअर्स खरेदी करतो तितक्याच पटीने आपण त्या कंपनीचे भागीदार किंवा हिस्सेदार बनत असतो. Example म्हणजे जर कंपनीकडे total १०० शेअर्स असतील आणि तुम्ही त्या कंपनीचा १ शेअर विकत घेतला तर तुम्ही त्या कंपनीचे १% भागीदार बनत असता म्हणजेच कंपनीच्या मालकी हक्काचे जे समान हिस्से किंवा भाग होतात त्यात तुमचा समावेश होतो.
शेअर मार्केट म्हणजे काय | What is Share Market in Marathi
जेथे भाज्यांची खरेदी-विक्री केली जाते त्या ठिकाणाला भाजी मार्केट म्हटले जाते, त्याचप्रमाणे जेथे शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते त्याला शेअर मार्केट असे म्हटले जाते.
शेअर मार्केट म्हणजे ज्या ठिकाणी विविध क्षेत्रातील लहान-मोठ्या कंपन्या सूचीबद्ध असतात आणि जेथे त्या कंपन्याच्या समभागांचे सौदे ( खरेदी-विक्री व्यवहार ) होतात.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी | How to Invest in Share Market in Marathi
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे बरेचसे मार्ग आहेत त्यात कंपनीचे शेअर्स खरेदी करणे, Mutual Fund मध्ये investment करणे, ETF, Bonds, SmallCases, इंडेक्स फंड असे बरेचसे प्रकार आपल्याला पहायला मिळतात. तुम्ही कशा प्रकारे तुमची investment आणि ती किती कालावधीसाठी करत आहात यावर त्याचा परतावा अवलंबून असतो.
तुम्ही योग्य मार्गदर्शनाखाली तुमची investment Stock Market मध्ये करू शकता
Stock Market आणि रिस्क
पाण्यात पोहायला न शिकता पाण्यात उडी मारणे जसे risky असते, अभ्यास न करता परीक्षेला बसणे जितके risky असते त्याचप्रमाणे शेअर मार्केट चा अभ्यास न करता शेअर मार्केट मध्ये काम करणे risky ठरणार आहे. शेअर मार्केटचा अभ्यास करून, practice करून हि रिस्क कमी करता येते.
शेअर बाजारातील चढउतार हा बाजारातील मंदी, राजकीय गोंधळ, दहशतवादी हल्ले, नैसर्गिक आपत्ती, व्याजदरातील बदल, अर्थसंकल्पातील करसवलत (Budget), Repo Rate यावर अवलंबून असतो आणि शेअर मार्केट पडण्याची कारणे सुद्धा आहेत त्यामुळे शेअर बाजारातील रिस्क कमी करण्यासाठी कंपन्यांचे विविधीकरण करणे आवशक आहे. बाजार भांडवलनुसार वैविध्यपूर्ण असलेल्या कंपन्यांचे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये ठेवले कि निश्चितपणे रिस्क कमी केली जाते.
तुम्हाला जर शेअर मार्केट मध्ये कमी रिस्क घ्यायची असेल त्यांच्यासाठी Mutual Fund हा उत्तम पर्याय आहे जिथे कमी रिस्क मध्ये अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही investment करू शकता पण त्यासाठी तुम्हाला तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे.
शेअर मार्केट मध्ये काय शिकावे लागते | Share Market Topic
शेअर मार्केट मध्ये काम करायचे असेल तर पुढील topic चे knowledge असणे महत्वाचे आहे. शेअर मार्केट अभ्यास काय आहे? शेअर मार्केट कसे शिकायचे हे आपण पाहूया.
- टेक्निकल विश्लेषण (Technical Analysis) : यामध्ये वेगवेगळ्या Candles चे प्रकार शिकायला मिळतात कि त्यामुळे मार्केटचा ट्रेंड ओळखता येतो. उदाहरणार्थ: बुलीश कॅण्डल, बेअरीश कॅण्डल, मोरुबोझू कॅण्डल, डोजी कॅण्डल, पिअर्सिंग कॅण्डल, Hammer कॅण्डल, शूटिंग स्टार कॅण्डल, Inverted Hammer कॅण्डल, डार्क क्लाउड कव्हर कॅण्डल इत्यादी.
- Price Action : यामध्ये वेगवेगळे pattern शिकता येतात यात खरेदी विक्रीचे निर्णय हे शेअर्सच्या किमतीच्या हालचालींवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ: Rounding Top Rounding Bottom pattern, Double Top Double Bottom Pattern, Head and Shoulder Pattern, Inverted Head and Shoulder Pattern, Triangle Pattern, Cup with Handle Pattern इत्यादी.
- फंडामेंटल विश्लेषण (Technical Analysis) : कंपनी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत कंपनीने कसा performance केला आहे, कंपनी आता कशी perform करत आहे आणि त्यानुसार कंपनी कशा प्रकारे performance करेल याचा अनुमान लावला जातो. त्या कंपनीचा Sales Growth, Cash Flow, Balance sheet कसे पाहायचे. कंपनीचे product काय आहे, promotors कोण कोण आहेत, बाजार भांडवल कसे पहायचे याचा अभ्यास केला जातो. अधिक कालावधीसाठी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपनीचे फंडामेंटल विश्लेषण करणे खूप गरजेचे असते.
- Application ची माहिती : तुम्ही ज्या ब्रोकरचे Demat account use करत आहात त्याची पूर्णपणे माहिती असणे गरजेचे आहे
- पैशांचे व्यवस्थापन : शेअर मार्केटमध्ये काम करत असताना आपल्याकडील भांडवलामध्ये जर लॉस होत असेल तर किती लॉस ठेवावा ज्याला Stoploss म्हटले जाते आणि किती टार्गेट ठेवावे याचे सुद्धा मार्गदर्शन मिळवता येते.
- मानसिक प्रवृत्ती (Psychology) : मानवी प्रवृत्तीत सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे भित्रेपणा (Fear) आणि लालचीपणा (Greedy) यावर कसा मात करायचा याचे मार्गदर्शन मिळते.
शेअर मार्केट ची माहिती घेण्यासाठी पुढील वेबसाईट पाहू शकता | Best Website for Share Market
https://www.chittorgarh.com/
https://www.moneycontrol.com/
https://in.investing.com/
https://www.tradingview.com/
https://www.screener.in/
https://chartink.com/
वरील वेबसाईट यांना शेअर मार्केट चे विविध विषयांचे पुस्तके असेसुद्धा म्हणू शकता कारण दररोज शेअर मार्केटचे मार्गदर्शन, चार्ट आणि शेअर बाजारातील बदलाव (Updation) आपल्याला या website वरून मिळत असते.
Nice info
Thank you
Realy nice
Khup chan information
Excellent information 👍 doing good job..