शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवता येतात | HOW TO EARN MONEY FROM SHARE MARKET

शेअर मार्केट म्हटले कि कमी किमतीमध्ये शेअर्स खरेदी करायचे आणि त्याची किंमत वाढली कि जास्त किमतीमध्ये ते विकायचे आणि त्यातून profit मिळवायचे हे आपणास ठाऊक आहे परंतु या व्यतिरिक्त अजूनही बरेच मार्ग आहेत ज्यातून आपण शेअर मार्केट मधून पैसे कमवू शकतो. तर शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवता येतात आणि त्यासाठी कोणकोणत्या पद्धती आहेत हे आपण या लेखात पाहणार आहोत, चला तर मग सुरू करूया.

१ – IPO | आईपीओ

IPO मार्केट हे भारतामध्ये एखाद्या उत्सवाप्रमाणे असते.

अनेक गुंतवणूकदार, शेअर मार्केट मध्ये नवीन येणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स घेण्यासाठी पसंती दाखवतात.

IPO (Initial Public Offering) हा प्रायमरी मार्केटचा प्रकार आहे ज्यात कंपनी पहिल्यांदा आपले शेअर हे बाजारात विक्रीसाठी घेऊन येते आणि जो शेअर्स खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो तो directly कंपनी आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये होत असतो त्याला IPO असे म्हणतात.

आयपीओ जेव्हा मार्केट मध्ये येतो त्यावेळी बऱ्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची किंमत कमी असते,पण कंपनी जेंव्हा शेअर बाजारात लिस्ट होते तेंव्हा  लोकांच्या मागणीनुसार त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळे गुंतवणुकदारांना अगदी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

उदाहरणार्थ, Happiest Minds Technologies या IT  कंपनीचा आयपीओ  सप्टेंबर २०२० मध्ये आला होता, ज्यामध्ये Happiest Minds Technologies च्या एका शेअर ची किंमत 166 रुपये ठेवण्यात आली होती .आणि 17 सप्टेंबर 2020 ला कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली त्या वेळेस एक शेअरची किंमत 351 रुपये झाली होती, म्हणजेच  प्रीमियमवर १११% नफा investors ला मिळालेला आपण पहिला आहे  आणि सध्या Happiest Minds Technologies च्या शेअरची किंमत 1000+ रुपयांवर पोहोचली आहे.

अजून एक उदाहरण सांगायचे म्हणजे

बर्गर किंग या देशातील सर्वात वेगाने वाढणारी क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) Quick Service Restaurant (QSR) ज्याला आपण Restaurant Brands Asia Ltd या कंपनीच्या नावाने ओळखतो या कंपनीच्या शेअर्स ने 14 डिसेंबर 2020 रोजी ₹60 प्रति शेअरच्या इश्यू किमतीपासून 92% ने नफा मिळवून ११५.४ रुपयांनी हि कंपनी मार्केट मध्ये लिस्ट झाली आहे.

२- शेअरच्या किमती वाढणे | CAPITAL APPRECIATION

CAPITAL APPRECIATION हा शेअर मार्केट मध्ये पैसे कमावण्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे.
आपण एखादा शेअर खरेदी केला आणि काही काळानंतर तो शेअर खरेदी किमतीपेक्षा जास्त किमतीमध्ये विकला कि त्यातून आपण नफा मिळवू शकतो,
तर मूळ खरेदी किमतीपेक्षा शेअर किती रुपयांनी वाढला आहे किंवा किती नफा मिळाला आहे त्याला CAPITAL APPRECIATION असे म्हणतात.

या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी आपल्याला शेअर खरेदी केल्यावर अधिक काळासाठी आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये होल्ड करणे गरजेचे असते.

शेअर मार्केट मधील प्रसिद्ध इन्व्हेस्टर जसे की वॉरेन बफेट,राकेश झुणझुणवाला, विजय केडीया,राधाकिशन दमानी यांनी याच प्रकारातून शेअर मार्केटमध्ये करोडो रुपयांचा नफा मिळविला आहे.

उदाहरणार्थ, Dmart (Avenue Supermarts Ltd) या कंपनीचा शेअर २०१७ साली ६०० रुपयांना मिळत होता २०१८ साली १३०० रुपयांना मिळत होता आणि २०१९ साली १९०० रुपयांना मिळत होता २०२० साली २४०० रुपयांना मिळत होता २०२१ साली ३५०० रुपयांना मिळत होता आणि आता २०२२ साली ४५०० रुपयांना मिळत आहे. याठिकाणी मिळणारा नफा हा कितीतरी पटीने वाढताना आपल्याला पाहायला मिळतो यालाच CAPITAL APPRECIATION असे म्हणतात.

३ – डिव्हिडंड | Dividend

डिव्हिडंड म्हणजे कंपनीला जो नफा होतो त्या नफ्यातुन आपल्या शेअरहोल्डर यांना दिला जाणारा  मोबदला, त्याला आपण डिव्हिडंड असे म्हणतो.

काही कंपनी या वर्षातून एकदा किंवा दर तीन-चार-सहा महिन्यांना डिव्हिडंड जाहीर करत असतात.

अनेक लोक डिव्हिडंड च्या माध्यमातून भरपूर पैसे कमवतात. राकेश झुनझुनवाला यांना जूनमध्ये Canara Bank यामध्ये ६.५०/- प्रमाणे आणि जुलै मध्ये Titan कंपनीमध्ये ७.५० प्रमाणे आणि  Federal Bank Ltd. यामध्ये १.८०/- प्रमाणे अशा या  तीन कंपनीतून अंदाजे ७० करोडपेक्षा अधिक dividend मिळाला आहे.

समजा, जर तुमच्याकडे Wipro या कंपनीचे शेअर्स असतील म्हणजेच  तुम्ही Wipro कंपनीचे समभागधारक असाल आणि जर Wipro ने प्रति समभाग ५  रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आणि तुमच्याकडे Wipro कंपनीचे १०० शेअर असतील तर  तुम्हाला ५०० रुपये लाभांश म्हणून मिळेल. २१ जानेवारी २०२२ मध्ये १ रुपया प्रती शेअर आणि ५ एप्रिल २०२२ मध्ये Wipro ने ५ रुपये, तर २४ जानेवारी २०२३ रिजी १ रुपया प्रती शेअर्स असा dividend दिला आहे.

सर्वाधिक जास्त dividend देणाऱ्या कंपनीपैकी “Southern Gas Ltd.”, “Vardhman Acrylics Ltd.”, “Vedanta Ltd.”, “Hindustan Zinc Ltd.” इत्यादी कंपनी आपल्याला पाहायला मिळतात.

४ – बोनस शेअर | Bonus Stock

बोनस शेअर्स हे कंपनीने अतिरिक्त दिलेले शेअर्स आहेत जे कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय त्यांच्या account मधील शेअरच्या प्रमाणात दिलेले असतात.

बोनस शेअर हे १:१ बोनस, १:२ बोनस, २:१ बोनस,३:१ बोनस या प्रमाणात जाहीर केले जातात .

बोनस शेअर हे कंपनीला आपल्या गुंतवणूकदारांना बक्षीस देण्यासाठी आणि बाजारात तरलता (liquidity) वाढवण्याचा मार्ग म्हणून जारी केले जातात.

कंपनीच्या वित्तीय वर्षातील कमाईतील एकूण नफ्यातून अतिरिक्त शेअर्स हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना बोनस शेअर म्हणून दिले जातात.

शेअर बोनस जाहीर केल्याने शेअरची संख्या तर वाढतेच आणि भविष्यात शेअरच्या किंमती वाढण्यास देखील मदत होते.

५ – स्टॉक स्प्लिट | Stalk Spilt

स्टॉक स्प्लिट हा शेअर बाजारातील एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये कंपनीमधील एक शेअर त्याच्या मूल्याप्रमाणे तोडला जातो आणि तो स्प्लिट होतो म्हणजेच Stock Split हे शेअर्सचे होणारे विभाजन आहे त्यामुळे शेअरधारकांना अधिक शेअर्स आणि नवीन मूल्यांची खरेदी करण्याची संधी मिळते.

उदाहरणार्थ, एका कंपनीचे १,००० शेअर्स असताना, २:१ स्प्लिट झाल्यास कंपनीच्या शेअरधारकांना प्रत्येकी एक शेअरच्या बदल्यात दोन नवीन शेअर्स वितरित केले जातात, त्यामुळे कंपनीच्या शेअर्सची संख्या 2,000 होते आणि त्यासाठी त्यांना केवळ १,००० नवीन शेअर दिले जातात.

स्टॉक स्प्लिट हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात: “एकचालन स्टॉक स्प्लिट” आणि “नॉन-एकचालन स्टॉक स्प्लिट”. एकचालन स्टॉक स्प्लिट यामध्ये शेअरधारकांना नवीन शेअर्स वितरित केले जातात. नॉन-एकचालन स्टॉक स्प्लिट हे त्यापेक्षा कमी असते आणि हे केवळ काही शेअरधारकांना नवीन शेअर्स वितरित करण्यासाठी दिले जातात.

स्टॉक स्प्लिट मध्ये कंपनीच्या उत्पादन किंवा सेवा वितरणात कोणताही बदल करण्यात येत नाहीत, बदलत असतील फक्त शेअर्सची संख्या आणि मूल्य (Face Value) .

शेअर्स विभाजित केल्यामुळे बाजारात शेअर्सची संख्या वाढून त्याची Liquidity वाढते. ज्या ratio नुसार शेअर स्प्लिट केला जातो त्याच ratio नुसार त्या शेअरची face value सुद्धा कमी होते.

उदाहरनार्थ समजा एखाद्या कंपनीचा शेअर आपल्याकडे आहे ज्याची किमत १०० रुपये आहे आणि Face Value १० आहे व कंपनीने २:१ या प्रमाणात शेअर स्प्लिट केला तर एका शेअरचे २ शेअर्स होतील आणि शेअरची किंमत १०० रुपयांवरून ५० रुपये प्रति शेअर होईल. यात जरी शेअरची संख्या १ वरून २ झाली आणि शेअरची किंमत कमी झाली तरी आपली एकूण गुंतवणूक सारखीच राहते.
तसेच जर शेअर ५:१ या प्रमाणात स्प्लिट केला आणि शेअर किंमत की १०० रुपये असेल व Face Value १० रु असेल, तर शेअरची किंमत ही 20 रु होईल आणि Face Value १० रुपयांवरून २ रुपये होते.

स्टॉक स्प्लिट झाल्यामुळे आपल्याकडील असलेल्या शेअर्सची संख्या वाढते त्यामुळे आपल्याला अधिकच्या शेअरवर डिव्हिडंड मिळू शकतो आणि आपण profit मिळवू शकतो.

1 thought on “शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवता येतात | HOW TO EARN MONEY FROM SHARE MARKET”

Leave a Comment