दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Divgi TorqTransfer Systems Limited IPO in मराठी

‘Stock Market in Marathi’ या वेबसाईटवर आपले स्वागत आहे.

Divgi TorqTransfer Systems Limited या कंपनीची स्थापना, १९६४ रोजी गीअर्स आणि स्क्रू मशिन पार्ट्सच्या निर्मितीमध्ये विशेष असलेले एक लघुस्तरीय उत्पादन उद्योग म्हणून झाली होती.

जॉन डीरे, जेसीबी, कॅटरपिलर आणि बोर्ग वॉर्नर यांनी नवीन पिढीच्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  

दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड आयपीओ १ मार्च २०२३ रोजी शेअर बाजारात दाखल होणार असून आयपीओच्या माध्यमातून कंपनी १८०.०० कोटी रुपये भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड आयपीओ एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.

सगळ्यात अगोदर आपण आयपीओबद्दल माहिती पाहूया.

Table of Contents

दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड आयपीओची उपलब्धता  | Divgi TorqTransfer Systems Limited IPO Availability of Shares

Divgi TorqTransfer Systems Limited IPO
Divgi TorqTransfer Systems Limited IPO

 

दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड आयपीओची एकूण किंमत १८०.०० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या ३,९३४,२४३ आहे.

शेअर्सची उपलब्धता पुढीलप्रमाणे विभाजित करण्यात आली आहे.

शेअर्सची उपलब्धता विभाजित प्रमाण
मोठ्या संस्था (क्वालिफाइड इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स)
(Qualified  Institutional Investors)
ऑफरच्या ७५% पेक्षा कमी नाही
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स
(Non-Institutional Investors)
ऑफरच्या १५% पेक्षा जास्त नाही
किरकोळ गुंतवणूकदार
(रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)
ऑफरच्या १०% पेक्षा जास्त नाही

 

दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ  | Divgi TorqTransfer Systems Limited IPO Share Price and Lot Size

दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि ५ रुपये प्रती शेअर आहे.

Divgi TTS या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ५६० रुपये आणि  कमाल (maximum)  किंमत ५९० रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ५६० ते ५९० मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात ( महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO किंवा एफपीओ मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि २५ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच २५ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ५६०*२५ = १४,००० रुपये ते  ५९०*२५=१४,७५० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (२५ शेअर्स) म्हणजेच १४,७५० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची (३२५ शेअर्स) म्हणजेच १,९१,७५० रुपये इतकी आहे.

दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड आयपीओची तारीख  | Divgi TorqTransfer Systems Limited IPO Date

दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड आयपीओ १ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला होणार असून अखेरची तारीख ३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

आयपीओ अलोटमेंट तारीख ९ मार्च २०२३ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम १० मार्च २०२३ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर १३ मार्च २०२३ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे २५ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि १४ मार्च २०२३ रोजी दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड माहिती | Divgi TorqTransfer Systems Limited Information

Divgi TTS प्रगत ड्राइव्हट्रेन घटक आणि प्रणालींचे डिझाइन, विकास आणि उत्पादन यामध्ये भारतातील अग्रगण्य टियर 1 कंपन्यांपैकी एक बनली आहे.

सिस्टम-लेव्हल ट्रान्सफर केस, टॉर्क कप्लर्स आणि ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोल्यूशन्स विकसित करण्याची आणि प्रदान करण्याची क्षमता असलेल्या भारतातील काही मोजक्या कंपनीपैकी Divgi TTS हि एक कंपनी आहे.

कंपनीचे विविध उत्पादने आहेत ज्यात मेकॅनिकल तसेच इलेक्ट्रिकल 4×4 ट्रान्सफर केसेस, इंटरएक्टिव्ह टॉर्क कप्लर्स, ड्युअल आणि ट्रिपल कोन स्टील सिंक्रोनायझर्स, ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, 5 आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सिंगल स्पीड इलेक्ट्रिक वाहन (EV) यांचा समावेश आहे.

Divgi TTS ने गेल्या काही वर्षांमध्ये टोयोटा, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स यांच्यासारखाच ग्राहकवर्ग तयार केला आहे. त्याचबरोबर कंपनी भारतासोबतच यूके, रशिया, कोरिया, चीन, थायलंड आणि यूएसए मधील ग्राहकांना आपल्या product चा पुरवठादार करत आहे.

सध्याच्या आर्थिक डेटाच्या आधारावर, उज्ज्वल संभावनांसाठी हा एक लांब शर्यतीचा घोडा आहे. कंपनीने गेल्या तीन आर्थिक वर्षांत खूप चांगला लाभांश (profit) दिला आहे. गुंतवणूकदार दीर्घकालीन दृष्टीकोनातून त्याचा फायदा घेऊ शकतात.

दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड मुलभूत माहिती | Divgi TorqTransfer Systems Limited Fundamental Information

बाजार भांडवल (Market Capital) १८०४.३९ कोटी
दर्शनी मूल्य (Face Value)
पीई रेशो P/E (x) ३५.१६

 

दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड कंपनीची एकत्रित आर्थिक माहिती | Divgi TorqTransfer Systems Limited Company Financials (Consolidated)

३१ मार्च २०२० ३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३० सप्टेंबर २०२२
एकूण मालमत्ता
(Total Assets)
३०३.७० ३६२.८८ ४०५.३७ ४३०.२१
एकूण महसूल
(Total Revenue)
१७०.७४ १९५.०३ २४१.८७ १३७.५५
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
२८.०४ ३८.०४ ४६.१५ २५.६६
Net Worth
(एकूण मालमत्ता)
२०९.५३ २९५.८८ ३४०.०२ ३५६.20
Total Borrowing
(एकूण कर्ज)
५०.४१ 0.२६ 0.१२ 0.५०

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड कंपनीचे प्रमोटर्स | Promoters of Divgi TorqTransfer Systems Limited Company

जितेंद्र भास्कर दिवगी, हितेंद्र भास्कर दिवगी आणि दिवगी होल्डिंग प्रायवेट लिमिटेड हे दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड कंपनीचे प्रमोटर्स आहेत.

 

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://divgi-tts.com//index.html

1 thought on “दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Divgi TorqTransfer Systems Limited IPO in मराठी”

Leave a Comment