ग्लोबल सरफेसेस लिमिटेड (Global Surfaces Limited) ही भारतातील नैसर्गिक दगड आणि इंजिनीयर्ड क्वार्ट्जच्या खाणकाम, उत्पादन आणि निर्यातीमधील अग्रगण्य कामगिरी करणारी जगप्रसिद्ध कंपनी आहे.
जगभरातील दगड उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या या कंपनीने आपले क्षितिज, दगडांपासून बहुआयामी व्यवसायापर्यंत विस्तारले आहे आणि स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली आहे.
नैसर्गिक दगड जटिल भूवैज्ञानिक प्रक्रियेद्वारे तयार केले जातात आणि त्यापासून ग्रॅनाइट, चुनखडी, संगमरवरी, स्लेट, क्वार्टझाइट, गोमेद, सँडस्टोन, ट्रॅव्हर्टाइन अशा प्रकारची उत्पादने तयार करतात.
ग्लोबल सरफेसेस लिमिटेड हि कंपनी विविध आकार, रूपे आणि रंगांनुसार वातानुकूलित स्लॅब आणि काउंटरटॉप्समधील ग्रॅनाइट, संगमरवरी, सॉफ्ट क्वार्टझाइट, सोपस्टोन आणि फायलाइट सारखी उत्पादने आणि दगडांची मोठ्या प्रमाणात पुरवठा करते.
दगड उद्योगातील कंपनीचा अनुभव आणि नैसर्गिक दगड उद्योगातील जागतिक आघाडीचे स्थान यामुळे कंपनीला क्वॉर्ट्झच्या पृष्ठभागांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
२००४ मध्ये जयपूर आणि राजस्थान येथे ग्लोबल स्टोन्स म्हणून स्थापन झालेल्या ग्लोबल सर्फेसेस लिमिटेडने, संचालक श्री. मयंक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रगतीचे नवीन मार्ग निर्माण केले आहेत.
ग्लोबल सर्फेसेस लिमिटेड कंपनीचे प्राथमिक लक्ष ग्राहकांना नेहमीच समाधानी अनुभव देणे असते. कंपनी ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या गरजेनुसार सर्वोत्तम उत्पादने देण्याचा प्रयत्न करते.
कंपनी उत्पादने तयार करण्याच्या चांगल्या मार्गांवर नवनवीन शोध आणि कार्य करत असताना, नैसर्गिक संसाधने आणि खनिजे समृद्ध ठेवण्याच्या प्रयत्नांना समर्थन देते.
कंपनीचे दोन युनिट्स आहेत, एक RIICO इंडस्ट्रियल एरिया, Bagru Extn, Bagru, जयपूर, राजस्थान येथे आणि दुसरे Mahindra World City SEZ, जयपूर, राजस्थान येथे आहे.
ग्लोबल सरफेसेस लिमिटेडच्या उत्पादनांमध्ये फ्लोअरिंग, वॉल क्लेडिंग, काउंटरटॉप्स, कट-टू-साईज आणि इतर वस्तूंचा वापर आहे जी उत्पादने व्यावसायिक उद्योगांसाठी आणि निवासी घरांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. हि उत्पादने भारतात आणि बाहेरही विकली जातात.
ग्लोबल सरफेसेस लिमिटेड आयपीओ एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.
ग्लोबल सरफेसेस लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Global Surfaces Limited IPO Availability of Shares
ग्लोबल सरफेसेस लिमिटेड आयपीओची एकूण किंमत १५४.९८ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या ११,०७०,००० अशी आहे.
शेअर्सची उपलब्धता पुढीलप्रमाणे विभाजित करण्यात आली आहे.
शेअर्सची उपलब्धता | विभाजित प्रमाण |
---|---|
मोठ्या संस्था (क्वालिफाइड इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स) (Qualified Institutional Investors) |
ऑफरच्या ५०% पेक्षा जास्त नाही |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) |
ऑफरच्या १५% पेक्षा कमी नाही |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) |
ऑफरच्या ३५% पेक्षा कमी नाही |
ग्लोबल सरफेसेस लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Global Surfaces Limited Limited IPO Share Price and Lot Size
ग्लोबल सरफेसेस लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर आहे.
ग्लोबल सरफेसेस लिमिटेड या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत १३३ रुपये आणि कमाल (maximum) किंमत १४० रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार १३३ ते १४० मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात ( महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO किंवा एफपीओ मिळण्याचे chances वाढतात.)
या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि १०० आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच १०० शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १३३*१०० = १३,३०० रुपये ते १४०*१००=१४,००० रुपये इतकी आहे.
गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (१०० शेअर्स) म्हणजेच १३,३०० रुपये तर जास्तीत जास्त १४ लॉटची (१४०० शेअर्स) म्हणजेच १,९६,०००रुपये इतकी आहे.