उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती – मार्च २०२३ | Udayshivakumar Infra Limited IPO

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड हि कंपनी १९९५ साली स्थापन झाली असून रस्ते बांधणीच्या व्यवसायात कार्यरत आहे.

राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते, महानगरपालिका अंतर्गत स्मार्ट रस्ते, पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी मिशन प्रकल्पांतर्गत स्मार्ट रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, ब्रुहत बेंगलुरु महानगर पालीके (BBMP), आणि विविध तालुक्याच्या ठिकाणी स्थानिक क्षेत्रातील रस्ते बांधण्याचे काम करत आहे..

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड ही ISO 9001:2015, ISO 14001:2015 आणि ISO 45001:2018 कंपनी आहे.

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड आयपीओ २० मार्च २०२३ रोजी शेअर बाजारात दाखल झाला असून आयपीओच्या माध्यमातून कंपनी ६६.०० कोटी रुपये भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड आयपीओ एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.

चला तर मग उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड कंपनीची आणि उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड आयपीओची माहिती घेऊया.

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड आयपीओची उपलब्धता  | Udayshivakumar Infra Limited IPO Availability of Shares

Udayshivakumar Infra Limited IPO
Udayshivakumar Infra Limited IPO

 

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ६६.०० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या २०,०००,००० आहे.

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सची उपलब्धता पुढीलप्रमाणे विभाजित करण्यात आली आहे.

शेअर्सची उपलब्धता विभाजित प्रमाण
मोठ्या संस्था (क्वालिफाइड इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स)
(Qualified  Institutional Investors)
१,८८५,७१५ (ऑफरच्या १०% पेक्षा जास्त नाही)
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स
(Non-Institutional Investors)
५,६५७,१४२ (ऑफरच्या ३०% पेक्षा कमी नाही)
किरकोळ गुंतवणूकदार
(रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)
११,३१४,२८५ (ऑफरच्या ६०% पेक्षा कमी नाही)

 

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ  | Udayshivakumar Infra Limited IPO Share Price and Lot Size

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर आहे.

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ३३ रुपये आणि  कमाल (maximum)  किंमत ३५ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ३३ ते ३५ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात ( महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO किंवा एफपीओ मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ४२८ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ४२८ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ३३*४२८ = १४,१२४ रुपये ते  ३५*४२८=१४,९८० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (४२८ शेअर्स) म्हणजेच कमाल किमतीनुसार १४,९८० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची (५५४६ शेअर्स) म्हणजेच १९४,७४० रुपये इतकी आहे.

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड आयपीओची तारीख  | Udayshivakumar Infra Limited IPO Date

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड आयपीओ २० मार्च २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता झाला असून अखेरची तारीख ३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

आयपीओ अलोटमेंट तारीख २८ मार्च २०२३ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम २९ मार्च २०२३ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर ३१ मार्च २०२३ रोजी Demat account मध्ये, १ लॉट मागे ४२८ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि ३ एप्रिल २०२३ रोजी उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड कंपनीची माहिती | Udayshivakumar Infra Limited Information

कंपनीचे मुख्य कार्यालय कर्नाटक येथे असून या कंपनीची सरकारकडे विशेष श्रेणी कंत्राटदार म्हणून नोंद आहे. कंपनी प्रामुख्याने कर्नाटक राज्यात कार्यरत आहे. ते कर्नाटकातील रस्ते, पूल, सिंचन आणि कालवे औद्योगिक क्षेत्राच्या बांधकामामध्ये काम करत आहे, यामध्ये राष्ट्रीय महामार्ग (MORTH), राज्य महामार्ग विकास महामंडळ लि. (State Highway Development Corporations Ltd.)(SHDP)यांचा समावेश आहे.

कर्नाटक सार्वजनिक बांधकाम बंदरे(Karnataka Public Works Ports) आणि अंतर्देशीय जल वाहतूक विभाग (KPWP & IWTD) दावणगेरे हरिहरा नागरी विकास प्राधिकरण (Davanagere Harihara Urban Development Authority) (DHUDA) यांसारख्या सरकारी विभागांमध्ये कंपनी काम करत आहे.

कंपनीचा प्रारंभिक जोर सिमेंट, स्टील, बिटुमेन आणि RMC, क्रशर यांसारख्या प्रकल्पांवर आहे, जो खाजगी क्षेत्राचा भाग आहे, जेथे प्रकल्प वेळेवर पूर्ण करणे आणि गुणवत्तेला अत्यंत महत्त्व देणे यावर कंपनी प्रामुख्याने लक्ष केंद्रित करते.

१९९५-१९९६ सालामध्ये ०.१० कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या कमाईपासून कंपनीने २०२०-२०२१ सालापर्यंत २२४.९३ कोटींचे उत्पनाची कमाई केली आहे.

आपले कार्य वाढवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी, कंपनी उद्योगातील इतर पायाभूत सुविधा कंपन्यांसह संयुक्त उपक्रमात प्रकल्प हाती घेण्याचा विचार करत आहे.

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड मुलभूत माहिती | Udayshivakumar Infra Limited Fundamental Information

बाजार भांडवल (Market Capital) १९३.७५ कोटी
दर्शनी मूल्य (Face Value) १०
पीई रेशो P/E (x) ९.६७

 

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड कंपनीची एकत्रित आर्थिक माहिती | Udayshivakumar Infra Limited Company Financials (Consolidated)

३१ मार्च २०२० ३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३० सप्टेंबर २०२२
एकूण मालमत्ता
(Total Assets)
१५८.२६ १४६.८२ १६२.६१ १७८.९०
एकूण महसूल
(Total Revenue)
१९४.४१ २११.११ १८६.३९ १०७.१४
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
१०.४९ ९.३२ १२.१५ १०.०२
Net Worth
(एकूण मालमत्ता)
४६.८७ ५६.१८ ६८.३२ ७८.३४
Total Borrowing
(एकूण कर्ज)
३३.९५ ३०.६० २६.४८ ३९.४६

* (वरील किंमती कोटी मध्ये आहे)

उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड कंपनीची व्यावसायिक टीम | Professional Team of Udayshivakumar Infra Limited

श्री. उदयशिवकुमार हे या कंपनीच्या प्रमोटर्समधील महत्त्वाचे प्रमोटर असून ते या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) आहेत. त्यांनी इंटरनॅशनल ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीमधून सोशल वर्क एम्पॉवरमेंट आणि कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंटमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे आणि त्यांना नागरी बांधकाम क्षेत्रात 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

मंजुश्री शिवकुमार या कंपनीच्या बोर्डावर कार्यकारी संचालक आहेत.

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
http://www.uskinfra.com/

Leave a Comment