आज एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती आपण मराठीतून पहाणार आहोत. १९९५ सालामध्ये फ्रॅमोंट, कॅलिफोर्नियामध्ये सर्किट बोर्ड असेंबल करण्याचा जो उपक्रम संस्थापकांनी सुरु केला तोच उपक्रम आज ३१ मार्च २०२२ रोजी १९०० हून अधिक कर्मचाऱ्यांसह जागतिक उत्पादन क्षेत्रात विस्तारला गेला आहे. आज आपण या लेखात पाहणार आहोत अशा एका कंपनीबद्दल जी आपल्या ग्राहकांसाठी आणि समुदायांसोबतच जगासाठीसुद्धा नवीन गोष्टी बनवून त्या अधिक चांगल्या बनवण्याचा प्रयत्न करते. कंपनीचे नाव आहे एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड.
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीचा आयपीओ ३ एप्रिल २०२३ रोजी शेअर बाजारात दाखल होणार असून आयपीओच्या माध्यमातून कंपनी ८६५.०० कोटी रुपये भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनी एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.
सगळ्यात अगोदर आपण कंपनीच्या आयपीओबद्दल (Avalon Technologies IPO Review) माहिती पाहूया.
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Avalon Technologies Limited IPO Availability of Shares
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ८६५.०० कोटी रुपये असून शेअर्सची एकूण संख्या १९,८३९,४५० आहे त्यातील ७,३३९,४५० शेअर्स कंपनीने नवीन इक्वीटी शेअर्स (Fresh Issue) जारी केले आहेत तर १२,५००,००० शेअर्स ‘Offer for Sale’ म्हणजेच कंपनीच्या प्रोमोटर्स कडून किवा इन्वेस्टर्स कडून जारी केले आहेत.
शेअर्सची उपलब्धता पुढीलप्रमाणे विभाजित करण्यात आली आहे.
शेअर्सची उपलब्धता | विभाजित प्रमाण |
---|---|
मोठ्या संस्था (क्वालिफाइड इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स) (Qualified Institutional Investors) |
ऑफरच्या ७५% पेक्षा कमी नाही |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) |
ऑफरच्या १५% पेक्षा जास्त नाही |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) |
ऑफरच्या १०% पेक्षा जास्त नाही |
संस्थात्मक गुंतवणूकदार (एन्कर इन्वेस्टर्स/Anchor Investor Shares Offered) |
८,९२७,७५१ |
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Avalon Technologies IPO Price and Lot Size
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि २ रुपये प्रती शेअर आहे.
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ४१५ रुपये आणि कमाल (maximum) किंमत ४३६ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ४१५ ते ४३६ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात ( महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO किंवा एफपीओ मिळण्याचे chances वाढतात.)
या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ३४ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ३४ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ४१५*३४ = १४,११० रुपये ते ४३६*३४=१४,८२४ रुपये इतकी आहे.
गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (३४ शेअर्स) म्हणजेच १४,८२४ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची (४४२ शेअर्स) म्हणजेच १,९२,७१२ रुपये इतकी आहे.
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड आयपीओची तारीख | Avalon Technologies IPO Date
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड आयपीओ ३ एप्रिल २०२३ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख ६ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
आयपीओ अलोटमेंट तारीख १२ एप्रिल २०२३ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम १३ एप्रिल २०२३ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर १७ एप्रिल २०२३ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ३४ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि १८ एप्रिल २०२३ रोजी एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड माहिती | Avalon Technologies Limited Information
१९९९ साली स्थापन झालेली, Avalon Technologies Limited हि कंपनी इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा प्रदान करणारी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (EMS) कंपनी आहे ज्यामध्ये उच्च-मूल्याच्या अचूक अभियांत्रिक उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून, महसूलाच्या बाबतीत भारतात बॉक्स-बिल्ड सोल्यूशन्स वितरीत करण्यासाठी एंड-टू-एंड ऑपरेशन्स आहेत.
Avalon Technologies Limited ही 31 मार्च 2022 पर्यंत 1900+ कर्मचार्यांसह ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग फूटप्रिंट असलेली अग्रगण्य वर्टिकल-इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (“EMS”) कंपन्यांपैकी एक आहे.
IPO च्या आधी, कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ₹389 कोटी उभे केले आहेत.
२०२२ मध्ये, Avalon ही महसुलाच्या बाबतीत भारतातील त्याच्या विभागातील एक प्रमुख कंपनी आहे.
एव्हलॉन टेक्नॉलॉजीज अत्यंत विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक्स सर्किट कार्डसाठी PCB डिझाइन, सोर्सिंग, PCB असेंब्ली, प्रोटोटाइपिंग आणि सर्विस देतात. त्याचबरोबर बॉक्स बिल्ड, सिस्टम इंटिग्रेशन आणि प्रोडक्ट इंटिग्रेशन दरम्यान ग्राहकांना, अचूक यांत्रिक भाग, प्लास्टिकचे भाग, शीट मेटलचे भाग, कॉइल, ट्रान्सफॉर्मर, केबल्स आणि हार्नेस यासारखे घटक Avalon स्वतंत्रपणे विकतात.
ते वैद्यकीय, दूरसंचार, रेल्वे, उर्जा, एरोस्पेस आणि संरक्षण आणि औद्योगिक यांसारख्या उद्योगांना त्यांच्या उत्पादनांच्या डिझाइन आणि उत्पादनासाठी लागणारे साहित्य पुरविते.
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड मुलभूत माहिती | Avalon Technologies Limited Fundamental Information
बाजार भांडवल (Market Capital) | २८४६.७६ कोटी |
दर्शनी मूल्य (Face Value) | २ |
पीई रेशो P/E (x) | ५५.५४ |
इक्विटीवर परतावा (Return on Equity) | ८५.९% |
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीची एकत्रित आर्थिक माहिती | Avalon Technologies Limited Company Financials (Consolidated)
३१ मार्च २०२० | ३१ मार्च २०२१ | ३१ मार्च २०२२ | |
एकूण मालमत्ता (Total Assets) |
४४९.६५ | ५१२.४८ | ५८७.९६ |
एकूण महसूल (Total Revenue) |
६५३.१५ | ६९५.९० | ८५१.६५ |
Profit After Tax (करानंतरचा नफा) |
१२.३३ | २३.०८ | ६८.१६ |
Total Borrowing (एकूण कर्ज) |
२४८.४८ | २९५.३३ | २९४.०५ |
* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)
एव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे प्रमोटर्स | Promoters of Avalon Technologies Limited Company
- कुन्हामेद बिचा (Kunhamed Bicha)
- भास्कर श्रीनिवासन (Bhaskar Srinivasan)
अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.avalontec.com/