नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आयपीओ संपूर्ण माहिती | Nexus Select Trust REIT IPO Marathi Review

stock मार्केटमध्ये या आठवड्यात Nexus Select Trust या कंपनीचा आयपीओ येत आहे. Nexus Select Trust हा भारतातील अग्रगण्य असलेले रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्ट आहे याचा आयपीओ ९ मे २०२३ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि ११ मे २०२३ रोजी बंद होईल. कंपनी IPO द्वारे ३,२०० कोटी रुपये उभे करण्याचा विचार करत आहे, त्यापैकी १,४०० कोटी रुपये नवीन इश्यू असतील आणि उर्वरित १,८०० कोटी रुपये ऑफर फॉर सेल (OFS) असतील.

या लेखात आपण Nexus सिलेक्ट ट्रस्ट REIT IPO ची माहिती, Review पहाणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट REIT आयपीओची उपलब्धता  | Nexus Select Trust REIT IPO Availability of Shares

नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आयपीओची एकूण किंमत ३,२०० कोटी रुपये असून १,४०० कोटी रुपये नवीन इश्यू असतील आणि उर्वरित १,८०० कोटी रुपये ऑफर फॉर सेल (OFS) असतील.

नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट या कंपनीच्या शेअर्सची उपलब्धता पुढीलप्रमाणे विभाजित करण्यात आली आहे.

शेअर्सची उपलब्धता विभाजित प्रमाण
मोठ्या संस्था (क्वालिफाइड इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स)
(Qualified  Institutional Investors)
नेट ऑफरच्या ७५% पेक्षा जास्त नाही
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स
(Non-Institutional Investors)
ऑफरच्या २५% पेक्षा कमी नाही

 

नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट REIT आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Nexus Select Trust REIT IPO Share Price and Lot Size

नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ९५ रुपये आणि  कमाल (maximum)  किंमत १०० रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ९५ ते १०० मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात ( महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO किंवा एफपीओ मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि १५० आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच १५० शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ९५*१५० = १४,२५० रुपये ते  १००*१५०=१५,००० रुपये इतकी आहे.

GMP Today : GMP म्हणजेच ग्रे मार्केटचा प्रीमिअम ५ रुपये प्रती शेअर आहे या आयपीओची लॉट size १५० शेअर्स आहे त्यानुसार १५०*५ = ७५० रु. असा फायदा प्रती लॉट होण्याची संभावना आहे.

नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट REIT आयपीओची तारीख  | Nexus Select Trust REIT IPO Date

नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आयपीओ ९ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता subscription साठी खुला होणार असून अखेरची तारीख ११ मे २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

आयपीओ अलोटमेंट तारीख १६ मे २०२३ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम १७ मे २०२३ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर १८ मे २०२३ रोजी Demat account मध्ये, १ लॉट मागे १५० शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि १९ मे २०२३ रोजी नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीची माहिती | Nexus Select Trust REIT Information

कंपनी भारतातील सर्वात मोठे REIT केंद्र आहे ज्याचे १४ वेगवेगळ्या शहरांमध्ये एकूण १७ REIT केंद्र आहेत ज्यामध्ये अहमदाबाद, अमरीतसर, पुणे, नवी मुंबई, इंदोर, चंदिगढ, भुबनेश्वर, उदैपूर, दिल्ही, चेन्नई, बेंगळूर, मेंगलूर, हैद्राबाद, मैसूर आदि महत्वाच्या शहरांचा समावेश होतो.

या शहरांमध्ये कंपनीचे अनेक शॉपिंग मॉल्स,सेल टॉवर्स, डेटा सेंटर्स, हॉटेल्स, वैद्यकीय सुविधा, कार्यालये आहेत जी भाड्याने देण्यात आली आहेत. ग्राहकांना सर्वांगीण खरेदी आणि मनोरंजनाचा अनुभव देण्यासाठी कंपनीकडे पोशाख आणि उपकरणे, हायपरमार्केट, मनोरंजनासाठी चित्रपटगृह आणि खाद्यपदार्थ आणि पेये यासारख्या क्षेत्रांमध्ये सुद्धा भाडेकरू आहेत.

कंपनीची मालमत्ता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दाट निवासी पाणलोटांच्या जवळ आहे आणि प्रमुख वाहतूक आणि सामाजिक पायाभूत सुविधांशी वाहतूक आणि सामाजिक पायाभूत सुविधांशी चांगल्या प्रकारे जोडलेली आहे यामुळे कंपनीला स्पर्धकांची जास्त भीती नाही.

कंपनीचे स्केल आणि खोल उद्योग संबंधांमुळे (मालकीचा फायदा) शक्तिशाली नेटवर्क प्रभाव आहेत.

समुदाय आणि पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी कंपनीने गेल्या तीन आर्थिक वर्षांत आणि तीन महिन्यांत 50 हून अधिक ESG उपक्रम राबवले आहेत.

 

 

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.nexusselecttrust.com/

Leave a Comment