REIT म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ( Real Estate Investment Trust). हे ट्रस्ट मोठ्या गुंतवणूकदार, retail इन्व्हेस्टर्स, नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स यांच्याकडून investment जमा करते आणि त्यातून property, जागा खरेदी करून त्या जागेत मोठमोठे मॉल, shopping सेंटर, ऑफिस उभे करून त्यांची जागा भाड्याने देते. या जागेतून जे पण रेंटल income येते ती amount investors मध्ये Dividend च्या माध्यमातून distribute केली जाते.
REIT च्या माध्यमातून कमीत कमी गुंतवणुकीमध्ये मोठ्या property मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
REIT चे ग्रुप अपार्टमेंट इमारती, सेल टॉवर्स, डेटा सेंटर्स, हॉटेल्स, वैद्यकीय सुविधा, कार्यालये, किरकोळ केंद्रे आणि गोदामांसह बहुतेक रिअल इस्टेट मालमत्ता प्रकारांमध्ये गुंतवणूक करतात. आणि हि मालमत्ता भाडेतत्त्वावर देऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नफा मिळवून दिला जातो.