एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज आयपीओ संपूर्ण माहिती मराठीतून, अर्ज करण्याची शेवटची तारीख | HMA AGRO INDUSTRIES LTD JUNE 2023 IN MARATHI

HMA Agro Industries Ltd ही कंपनी सन 2008 मध्ये स्थापन झालेली भारतातील पॅकेज्ड गोठवलेल्या हलाल बोनलेस म्हशीच्या मांस उत्पादनांचे तिसरे मोठे निर्यात करणारी कंपनी आहे. कंपनीची उत्पादने प्रामुख्याने “ब्लॅक गोल्ड”, “कमिल” आणि “एचएमए” या ब्रँड नावाखाली पॅकेज केली जातात आणि जगभरातील 40 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात.

कंपनीचे मुख्य उत्पादन फ्रोझन केलेले ताजे डिग्लँडेड म्हशीचे मांस हे आहेच परंतु अलीकडेच फ्रोझन फिश प्रॉडक्ट्स आणि बासमती तांदूळ यांचा व्यवसाय समावेश करून कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली आहे.

कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये पोल्ट्री आणि इतर कृषी उत्पादने देखील समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यामुळे भारतातील सर्वात प्रसिद्ध खाद्य उत्पादनाचे निर्यातदार बनण्याचा कंपनीचा मानस आहे.

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओ २० जून २०२३ रोजी शेअर बाजारात दाखल झाला असून आयपीओच्या माध्यमातून कंपनी ४८०.०० कोटी रुपये भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओ एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.

सगळ्यात अगोदर आपण आयपीओबद्दल माहिती पाहूया.

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओची उपलब्धता  | HMA AGRO INDUSTRIES LTD IPO Availability of Shares

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ४८०.०० कोटी रुपये असून त्यातील १५० कोटी रुपयांचे शेअर्स नवीन शेअर्स (Fresh Issue) आहेत जे directly कंपनीकडून विकले जातील आणि ३३० कोटी रुपयांचे शेअर्स हे Offer for Sale अंतर्गत विकले जातील.

शेअर्सची उपलब्धता पुढीलप्रमाणे विभाजित करण्यात आली आहे.

शेअर्सची उपलब्धता विभाजित प्रमाण
मोठ्या संस्था (क्वालिफाइड इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स)
(Qualified  Institutional Investors)
१,७२९,७२९ (२८.५७%)
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स
(Non-Institutional Investors)
१,२९७,२९८ (२१.४३%)
किरकोळ गुंतवणूकदार
(रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)
३,०२७,०२७ (५०.००%)

 

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ  | HMA AGRO INDUSTRIES LTD IPO Share Price and Lot Size

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर आहे.

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ५५५ रुपये आणि कमाल (maximum)  किंमत ५८५ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ५५५ ते ५८५ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात ( महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO किंवा एफपीओ मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि २५ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच २५ शेअर्ससाठी अर्ज करू शकतो.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि किमान ५५५*२५ = १३,८७५ रुपये ते किमान ५८५*२५=१४,६२५ रुपये इतकी असू शकते.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (२५ शेअर्स) म्हणजेच १४,६२५ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची (३२५ शेअर्स) म्हणजेच १,९०,१२५ रुपये इतकी आहे.

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओची तारीख | HMA AGRO INDUSTRIES LTD IPO Date

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओ २० जून २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला झाला असून अखेरची तारीख आज म्हणजेच २३ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला आहे.

आयपीओ अलोटमेंट तारीख २९ जून २०२३ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम ३० जून २०२३ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर ३ जुलै २०२३ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे २५ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि ४ जुलै २०२३ रोजी एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची माहिती | HMA AGRO INDUSTRIES LTD Company’s Information

आज HMA विविध राष्ट्रांमध्ये कार्यरत आहे आणि कंपनी मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्याचा प्रयत्न करीत आहे. कंपनी जगभरातील सुमारे 60 राष्ट्रांमध्ये सेवा देत आहोत आणि जगातील ड्रायव्हिंग फूड चेन ऑर्गनायझेशनमध्ये बदलले आहे. HMA GROUP मध्ये एकूण 25000 कर्मचारी आहेत. FSSAI, OHSAS, HACCP, ISO 9001, ISO 14001, ISO 22000, FSSC 22000 v5.1, ISO 45001, GMP, GHP आणि ISO 37001 अंतर्गत कंपनी दर्जेदार आणि वस्तुंच्या सुरक्षा संरचनांसाठी प्रयत्न करत असते.

कंपनीचे अलिगढ, मोहाली, आग्रा आणि परभणी येथे चार पूर्णतः एकात्मिक पॅकेज केलेले मांस प्रक्रिया संयंत्र आहेत आणि हरियाणामध्ये पाचवे पूर्णतः एकात्मिक मालकीचे मांस उत्पादन प्रक्रिया युनिट स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे.

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड मुलभूत माहिती | HMA AGRO INDUSTRIES LTD Fundamental Information

बाजार भांडवल (Market Capital) २९२९.५ कोटी
दर्शनी मूल्य (Face Value) १०
पीई रेशो P/E (x) १९.४
इपिएस (EPS) १८.८३

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची एकत्रित आर्थिक माहिती | HMA AGRO INDUSTRIES LTD Company Financials Information (Consolidated)

३१ मार्च २०१९ ३१ मार्च २०२० ३१ मार्च २०२१ ३० सप्टेंबर २०२२
एकूण मालमत्ता
(Total Assets)
५४९.२७ ४७२.८५ ५७२.०४ ८५६.११
एकूण महसूल
(Total Revenue)
२,७८४.०३ २,४१६.६१ १,७२०.४० ३,१३८.९८
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
३१.१७ ४५.९० ७१.६० ११७.६२
Net Worth
(एकूण मालमत्ता)
१४१.४५ १८७.०५ २५८.६९ ३७४.६५
Total Borrowing
(एकूण कर्ज)
१३१.९८ १६९.१३ १८१.३४ ३३०.०२

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

 

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.hmagroup.co/

 

 

Leave a Comment