आज ७ जुलै २०२३ रोजी आयडियाफोर्ग आयपीओची आज मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली आहे. आज आपण पाहूया या आयपीओ ची लेटेस्ट उपडेट म्हणजेच आयपीओ चे subscription, आजच्या दिवशी स्टॉकचा ( Grey Market Premium ) जीएमपी किती चालू आहे. आयडियाफोर्ग शेअर्सची current मार्केट price काय चालू आहे इत्यादी.
चला तर मग आयडियाफोर्ग आयपीओची माहिती घेण्यासाठी सुरुवात करूया.
आज आयडियाफोर्ग आयपीओने मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. सरासरीनुसार या आयपीओमध्ये ९४% लिस्टिंग नफा मिळाला आहे.
२००७ मध्ये स्थापन झालेल्या ideaForge Technology Limited हि कंपनी ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग करणारी मार्केटमधील आघाडीची कंपनी आहे.
२६ जून २०२३ ते ३० जून २०२३ या दरम्यान बाजारात ओपन झाला होता आणि या आयपीओच्या माध्यमातून कंपनी ५६७.२९ कोटी रुपये भांडवल उभे केले असून शेअर्सची संख्या ८,४४१,७६४ आहे त्यातील ३,५७२,०५२ शेअर्स Fresh Issue होते आणि ४,८६९,७१२ शेअर्स ‘Offer for Sale’ होते
ideaForge Technology Limited आयपीओ एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाला आहे.
ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Ideaforge ने शुक्रवारी स्टेलर पदार्पण केले आणि बीएसई वर त्यांच्या ऑफर किमतीच्या 94.21% प्रीमियमने शेअर्सची सूची केली, जी गेल्या दोन वर्षातील सर्वोत्तम सूची आहे. स्टॉक ₹1,305.10 वर उघडला, ₹1,344 चा उच्चांक नोंदवला आणि ₹1,295.50 वर बंद झाला. ऑफरची किंमत ₹672 होती.
Ideaforge Technology Limited ताज्या इश्यूमध्ये २४० कोटी रुपये आणि ऑफर फॉर सेल मध्ये ३२७.२५ कोटींचा समावेश आहे. २६ ते ३० जून दरम्यान विकल्या गेलेल्या आयपीओचे subsciption १०६ होते. किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investor) वर्गाने त्यांना बाजूला ठेवलेल्या भागाच्या ८५.२० पट Subscription घेतले होते. QIB (Qualified Institutional Buyers ) वर्गाने १२५.८१ पट Subscription घेतले होते आणि Non-Institutional Investors (NII) वर्गाने ८०.५८ पट Subscription घेतले होते.