सेन्सेक्स म्हणजे काय? | BSE sensex meaning in marathi

 

शेअर मार्केट म्हटले की, शेअर्समध्ये एक रुपयाचीसुद्धा गुंतवणूक न केलेल्या माणसाला देखील सेन्सेक्स आणि निफ्टी हे शब्द सर्वप्रथम आठवतात याचे कारण कि, या निर्देशांकात मोठ्या प्रमाणात होणारा चढ-उतार हा वर्तमानपत्राच्या आणि news च्या हेड लाईन्सचा हमखास विषय बनलेला असतो. कधी त्यांची price  कमी झाली किंवा कधी त्यांची price वाढली. पण नक्की सेन्सेक्स आणि निफ्टी हे काय आहे, त्यांची price कमी-जास्त कशी होते आणि हे शेअर बाजारात किती महत्वाचे आहेत हे आपण या लेखात पहाणार आहोत.

आपल्या देशातील NSE आणि BSE ही दोन प्रमुख स्टॉक एक्स्चेंजेस मुंबईत आहेत. या स्टॉक एक्स्चेंज पैकी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) हे देशातील सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंज आहे.

SENSEX in Marathi
Sensex

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या निर्देशांकाला सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) निर्देशांकाला निफ्टी म्हणून ओळखले जाते.

पण निफ्टीपेक्षा लोकांच्या तोंडी सेन्सेक्स जास्त रुळला आहे याचे कारण, तो शब्द ते आधीपासून ऐकत आले आहेत, हे एक, आणि सेन्सेक्समधील चढउताराचे आकडे निफ्टीच्या आकडयापेक्षा तिप्पट मोठे असल्यामुळेही ते लगेचच नजरेत भरतात, हे दुसरे!

आज सेन्सेक्स ७०००० आहे असे नुसतेच कोणी सांगितले, तर आपल्याला त्यातून काहीच बोध होणार नाही, पण काल सेन्सेक्स ६९५०० होता आणि तो आज ७०००० आहे असे म्हटले की आपल्याला लगेच समजते कि,  कालच्या पेक्षा आज बाजारात तेजी आहे त्याचप्रमाणे काल सेन्सेक्स ७०००० होता आणि तो आज ६९५०० आहे असे म्हटले की आपल्याला लगेच समजते कि कालच्या पेक्षा आज बाजारात मंदी आहे. सेन्सेक्समुळे सर्वसाधारण गुंतवणूकदाराला अशा रितीने बाजाराच्या हालहवालाचा अंदाज लगेच बांधता येतो.

सर्वसाधारणत: पेशंटला बरे वाटते आहे की त्याची तब्येत अधिक बिघडली आहे, हे पाहण्यासाठी थर्मामीटरने त्याचा ताप पाहिला जातो, तसाच देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे की नाही हे पाहण्यासाठी शेअर मार्केटचा निर्देशांक वापरला जातो.

सेन्सेक्सची संकल्पना मुळातच नीट माहीत नसल्यामुळे सेन्सेक्समध्ये थोडी जरी घसरण झाली तरी अनेकजण अक्षरश: आकाश कोसळल्यासारखे गडबडून जातात आणि तशा गोधळलेल्या अवस्थेत आपल्या हातातले चांगले चांगले शेअर्ससुद्धा घाबरून विकून टाकतात.

या उलट सेन्सेक्समध्ये किचितशी जरी वाढ झाली तरी आता प्रत्येक कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ यापुढे जणू दररोजच होणार आहे आणि आपले हात उद्यापासून जणू आभाळालाच टेकणार आहेत अशा भ्रमात कचऱ्याच्या पेटीत टाकायच्या लायकीचे शेअर्सही डोळे झाकून विकत घेतात. थोडक्यात म्हणजे, छाप पडो वा काटा, सेन्सेक्स विषयक अज्ञानामुळे तोटा होण्याचीच शक्यता अधिक असते. निदान आपली तरी अवस्था तशी होऊ नये, यासाठी आपण प्रथम सेन्सेक्स म्हणजे काय हे नीट लक्षात घेऊ.

सेन्सेक्स म्हणजे काय ?

सेन्सेक्स हा शब्द स्टॉक एक्सचेंज सेंसिटिव इंडेक्स (Sensitive Index) या दोन शब्दांचे एकत्रीकरण आहे. सेंसेक्स हा एक शेअर बाजार निर्देशांक आहे ज्याला भारतातील शेअर मार्केटचा बेंचमार्क इंडेक्स म्हणुनही ओळखले जाते.
सेन्सेक्स काढण्याची पद्धत तसे पाहता अत्यंत शास्त्रशुद्ध आहेच पण तशीच ती थोडीफार किचकटही आहे.
शिवाय ती पद्धत काटेकोरपणे समजून घेतली, तरी आपल्याला त्या गोष्टीचा प्रत्यक्षात काहीच उपयोग नाही. कारण त्यातली कोणतीही आकडेमोड करायची आपल्यावर वेळही येत नाही किंवा ती आकडेमोड करायचे आपल्याला कधी कारणही पडत नाही.

BSE मध्ये ३० कंपन्या कशा निवडल्या जातात?

फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल = एकूण फ्री फ्लोट शेअर्स x एक शेअरची किंमत

Free float Market capital=Number of free float shares x Price of one Shares तर

फ्री फ्लोट शेअर्स म्हणजे जे public कडे trading साठी उपलब्द असतात.

याचे उदाहरण पाहूया : श्री. राम यांनी आपली कंपनी ‘ABC’ ला  ५० कोटी शेअर्समध्ये विभाजित केले आणि IPO च्या वेळी राम यांनी ५० कोटी शेअर्समधील ३० कोटी शेअर्स public ला विकले. तर यामध्ये ३० कोटी शेअर्सला फ्री फ्लोट शेअर्स म्हटले जाते कारण फक्त ३० कोटी शेअर्सच public कडे trading साठी उपलब्द आहेत आणि या कंपनीच्या एका शेअरची किमत १० रुपये असेल तर फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलच्या फोर्मुलावरून ABC या कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल = ३० करोड x १० = म्हणजेच ३० करोड असेल.

अशाच प्रकारे सगळ्यात जास्त फ्री फ्लोट असणाऱ्या ३० कंपनींचा एकत्र group बनविला आहे आणि त्याला ‘सेन्सेक्स’ असे नाव दिले आणि सगळ्यात जास्त फ्री फ्लोट असणाऱ्या ५० कंपनींचा एकत्र group बनविला आहे त्याला ‘निफ्टी’ असे नाव दिले आहे.

Sensex ची price कमी जास्त कशी होते?

जेव्हा सेन्सेक्स चा फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल आदल्या दिवशीच्या तुलनेने जितका कमी किंवा जास्त होऊन close होतो त्याप्रमाणे सेन्सेक्स आणि निफ्टी ची value पण त्याच percentage ने कमी जास्त होऊन close होते.

सेन्सेक्स start झाले तेव्हा सेन्सेक्सची base value १०० रु. तर निफ्टी start झाले तेव्हा निफ्टीची base value १००० होती.

सेन्सेक्सचे महत्व | Sensex importance in stock market 

कोणत्याही stock मार्केट इंडेक्सला त्या देशाचे economy चे biometer (अर्थव्यवस्थेचा सुचकांक) म्हटले जाते. कारण कोणताही इंडेक्स हा त्याच्या देशातील सगळ्यात मोठ्या कंपनीची कामगिरी दर्शविते. भारतात सेन्सेक्स आणि निफ्टीच्या चढउतारवरून आपण भारताच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज लाऊ शकतो. वाढ झालेला इंडेक्स इकॉनॉमिची growth दर्शविते आणि price मध्ये घट झालेला इंडेक्स इकॉनॉमिची slowdown साईट दर्शविते यामुळे शेअर बाजारातील इंडेक्स हि देशाची economy पाहण्यासाठी खूप महत्वाची आहे.

सेन्सेक्समध्ये भारतातील कोणत्या कंपनीचा समावेश आहे? | What are the 30 shares of Sensex?

सेंसेक्समध्ये भारतातील तीस प्रमुख अशा कंपन्यांचा समावेश होत असतो. पण समजा भविष्यात ह्या कंपनींमधील एखाद्या कंपनीच्या आर्थिक स्थितीत बिघाड झाल्यास त्या कंपनीचे नाव सेंसेक्समधुन काढुन त्याठिकाणी नवीन कंपनीचे नाव add केले जात असते.

बाँम्बे स्टाँक एक्सचेंजमधील सेन्सेक्समध्ये भारतातील पुढील तीस प्रमुख कंपन्यांचा समावेश होत असतो:

Sr. No कंपनीचे नाव मराठीतून Company Name  सेक्टर * मार्केट कॅपिटल (Rs. m) Weightage ** (%)  EPS (Rs)
रिलायन्स इंडस्ट्रीज RELIANCE IND. ENERGY 18,338,524 10.9 116.4
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS SOFTWARE 13,778,401 4.6 124.5
एच डी एफ सी बॅंक HDFC BANK BANKING 10,900,013 13.1 79.1
आय सी आय सी आय बँक ICICI BANK BANKING 7,085,261 8.5 61.3
भारती एअरटेल BHARTI AIRTEL TELECOM 6,979,073 3.8 15
इन्फोसिस INFOSYS SOFTWARE 6,934,577 7.1 58.8
हिंदुस्थान युनिलिव्हर HUL FMCG 5,709,742 2.6 44
आय टि सी ITC FOOD & TOBACCO 5,683,613 6.8 16.4
स्टेट बँक ऑफ इंडिया SBI BANKING 5,469,895 2.8 77.5
१० एल अँड टी L&T ENGINEERING 4,936,965 5.9 105.4
११ बजाज फायनान्स BAJAJ FINANCE FINANCE 4,378,786 2.4 212.2
१२ एच सी एल टेकनॉलॉजिज HCL TECHNOLOGIES SOFTWARE 4,208,895 2 57.8
१३ कोटक महिंद्रा बँक KOTAK MAHINDRA BANK BANKING 3,512,778 3.1 86.9
१४ टायटन TITAN RETAILING 3,347,132 1.9 37.4
१५ सनफार्मा SUN PHARMA PHARMACEUTICALS 3,298,726 1.8 35.9
१६ ऍक्सिस बँक AXIS BANK BANKING 3,217,384 3.5 43.6
१७ मारुती सुझूकी MARUTI SUZUKI AUTOMOBILES 3,108,436 1.6 354.6
१८ एनं टी पी सी NTPC POWER 3,052,995 1.8 19.8
१९ अल्ट्राटेक सिमेंट ULTRATECH CEMENT CEMENT 2,882,272 1.4 221.7
२० एशियन पेंट ASIAN PAINTS PAINTS 2,829,202 1.6 56.4
२१ टाटा मोटर्स TATA MOTORS AUTOMOBILES 2,696,324 1.7 45.8
२२ बजाज फिनसर्व BAJAJ FINSERV FINANCE 2,600,966 1.2 88.3
२३ विप्रो WIPRO SOFTWARE 2,455,208 0.8 21.7
२४ नेस्टले इंडिया NESTLE FOOD & TOBACCO 2,392,315 1.1 30.8
२५ पॉवर ग्रीड POWER GRID POWER 2,282,833 1.3 16.9
२६ महिंद्रा अँड महिंद्रा M&M AUTOMOBILES 2,032,983 2 88.9
२७ जे एस डब्लू स्टील JSW STEEL STEEL 1,996,591 1.3 46.9
२८ टाटा स्टील TATA STEEL STEEL 1,655,089 1.3 -3.1
२९ टेक महिंद्र TECH MAHINDRA SOFTWARE 1,290,118 1 29.3
३० इंडसइंड बँक INDUSIND BANK BANKING 1,176,748 1.2 111.5

(नोट: * मार्केट कॅपिटल हे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल नसून total मार्केट कॅपिटल दर्शविते. आणि ** Weightage हे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलनुसार calculate केले जाते.)

येथे सेन्सेक्स कंपन्यांची यादी आहे BSE सेन्सेक्सची कामगिरी कशी आहे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया BSE सेन्सेक्स लाइव्ह चार्ट पहा. अधिक माहितीसाठी तुम्ही BSE च्या वेबसाईटला भेट देऊ शकता.
https://www.bseindia.com/

1 thought on “सेन्सेक्स म्हणजे काय? | BSE sensex meaning in marathi”

Leave a Comment