सेन्सेक्स आणि निफ्टी मधील फरक | Difference between Sensex and nifty

 

सेन्सेक्स आणि निफ्टी मधील फरक काय आहे हे आपण या लेखात पाहणार आहोत. सेन्सेक्सची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी तुम्ही सेन्सेक्स म्हणजे काय? हि post वाचू शकता.

सेन्सेक्स आणि निफ्टी हे भारतील शेअर बाजारातील एकत्रितपणे चढ-उतार गुंतवणूकदारांना दाखवत असतात म्हणूनच त्यांना भारतीय शेअर मार्केटचे इंडेक्स म्हणजेच ‘निर्देशांक’ म्हटले जाते. कोणत्याही देशातील शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक हा त्या देशातील सर्वात महत्वाच्या अशा निवडक आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वात मोठया आणि महत्वाच्या कंपन्यांनी बनलेला असतो त्यामुळे शेअर बाजारातील निर्देशांकाची वाढ हि त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये तेजीचे वातावरण तर निर्देशांकाची घट हि आर्थिक क्षेत्रांमध्ये मंदीचे वातावरण दर्शविते. या कारणामुळे प्रत्येक शेअर बाजाराचा निर्देशांक हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा निदर्शक असतो.

सेन्सेक्स आणि निफ्टी मधील फरक
Difference between Sensex and nifty

 

सेन्सेक्स निफ्टी 
शब्दरचना सेन्सेक्स हा शब्द सेंसिटिव इंडेक्स (Sensitive Index) या शब्दांना  एकत्रित करून बनविला आहे. निफ्टी हा शब्द नॅशनल फिफ्टी (National Fifty) या शब्दांना  एकत्रित करून बनविला आहे.
निर्देशांक सेन्सेक्स हा बॉम्बे स्टाॅक एक्सचेंज (BSE) चा निर्देशांक आहे. निफ्टी हा बॉम्बे स्टाॅक एक्सचेंज (BSE) चा निर्देशांक आहे.
लिस्टेड कंपनी बॉम्बे स्टाॅक एक्सचेंज (BSE) मधील ३० कंपनींचा समावेश आहे  नॅशनल स्टाॅक एक्सचेंज (NSE) मधील ५० कंपनींचा समावेश आहे
सेक्टरची संख्या एकूण १३ सेक्टरच्या कंपनींचा समावेश आहे. एकूण २४ सेक्टरच्या कंपनींचा समावेश आहे.
सुरुवात १ एप्रिल १९७९ रोजी, १०० रु. या मूळ मुल्यावरून सुरुवात झाली. ३ नोव्हेंबर १९९५ रोजी, १००० रु. या मूळ मुल्यावरून सुरुवात झाली.
बेस कॅपिटल N/A २.०६ ट्रिलियन रुपये
मार्केट कॅपिटल सेन्सेक्स मध्ये एकूण मार्केट कॅप १३८०४५६८.८९ कोटी असलेले ३0 कंपनींचा समभाग आहेत निफ्टी 50 मध्ये एकूण मार्केट कॅप १६,७७०,२२०.५६  कोटी असलेले ५० कंपनींचा समभाग आहेत

 

Leave a Comment