राशि पेरिफेरल्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Rashi Peripherals Limited IPO Review in Marathi

 

भारतातील Dell, ASUS, HP, Lenovo, LG, Samsang, Intel अशा top ब्रँड्स कंपन्यांचे product आपल्या घरात Distributor द्वारे येत असतात. यात महत्वाचा भाग distribution कंपनीचा असतो जे Internationl ब्रँड्सचे product manufacture कडून घेऊन Distributor, Retailer, Reseller आणि Supply Integrator पर्यंत पोहोचविण्याचे काम करतात आणि finaly जे product आहे ते customer पर्यंत पोहोचते. आज आपण अशाच एका कंपनीच्या IPO बद्दल पाहणार आहोत. Rashi Peripherals Limited असे या कंपनीचे नाव आहे म्हणजेच RP लिमिटेड. Rashi Peripherals Limited IPO ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्द असणार आहे. चला तर पाहूया Rashi Peripherals Limited आयपीओची संपूर्ण माहिती. Rashi Peripherals Limited हि कंपनी NSE आणि BSE या दोन्ही Stock exchange मध्ये लिस्ट होत आहे.

Rashi Peripherals Limited IPO
Rashi Peripherals Limited IPO

 

Table of Contents

कंपनीचे आजचे ग्रे मार्केट:

कंपनीच्या ग्रे मार्केटचा आजचा प्रीमिअम सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ८५ रु. प्रती शेअर आहे. आणि ४८ शेअर्सच्या लॉट साईझ नुसार ८५ * ४८ = ४,०८० रुपयांचा profit पाहायला मिळत आहे आणि सरासरीनुसार २७% ने ग्रे मार्केटचा प्रिमिअम वाढला आहे ( ग्रे मार्केट demand नुसार कमी जास्त होत असतो ). ग्रे मार्केटचा आजचा प्रीमिअम मागील ३ दिवसांमध्ये ना वाढला आहे ना कमी झाला आहे आणि मार्केट बंद होताना ग्रे मार्केट प्रीमिअममध्ये घट होऊन ७० झाली आहे.

राशि पेरिफेरल्स लिमिटेड कंपनीची माहिती | Rashi Peripherals Limited company Information

Rashi Peripherals Limited ही कंपनी १९८९ साली स्थापन झाली आहे म्हणजेच स्वतःच्या सेक्टरमध्ये ३३ वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे.

Rashi Peripherals Limited ही कंपनी भारतातील ५२ आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान (International technology) ब्रँड्ससाठी आघाडीच्या राष्ट्रीय वितरण भागीदारांपैकी (International distribution) एक आहे.

Rashi Peripherals Limited ही कंपनी आपल्या पार्टनरला credit सपोर्ट, प्री-सेल ॲक्टिव्हिटी, सोल्यूशन्स डिझाइन, technical support आणि warranty services अशा अनेक प्रकारच्या facility देते.

राशि पेरिफेरल्स लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Rashi Peripherals Limited IPO Availability of Shares

राशि पेरिफेरल्स लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ६०० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या १,९२,९२,६०४ आहे आणि सगळेच शेअर्स Fresh Issue आहेत.

राशि पेरिफेरल्स लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Rashi Peripherals Limited IPO Share Price and Lot Size

राशि पेरिफेरल्स लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि ५ रुपये प्रती शेअर आहे.

राशि पेरिफेरल्स लिमिटेड या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत २९५ रुपये आणि कमाल (maximum) किंमत ३११ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार २९५ ते ३११ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ४८ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ४८ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि २९५*४८ = १४,१६० रुपये ते  ३११*४८=१४,९२८ रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (४८ शेअर्स) म्हणजेच १४,९२८ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (६२४ शेअर्स) म्हणजेच १,९४,०६४ रुपये इतकी आहे.

राशि पेरिफेरल्स लिमिटेड आयपीओची तारीख | Rashi Peripherals Limited IPO Date

राशि पेरिफेरल्स लिमिटेड आयपीओ बुधवार, फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला होणार असून अखेरची तारीख शुक्रवार, ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

आयपीओ अलोटमेंट तारीख सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम मंगळवार, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच मंगळवार, १३ फेब्रुवारी २०२४  रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ४८ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि बुधवार, १४ फेब्रुवारी २०२४ रोजी राशि पेरिफेरल्स लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

राशि पेरिफेरल्स लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Rashi Peripherals Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) ११.७५
इक्विटीवरील रिटर्न (ROE)  १९.३३ %
ROCE १४.२१ %
Debt/Equity १.५३
EPS २६.४६

राशि पेरिफेरल्स लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Rashi Peripherals Limited company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३० सप्टेंबर २०२३
एकूण मालमत्ता
(Total Assets)
१,५९४.३९ २,६६९.७६ २,७९८.६० ४,०५८.६४
एकूण महसूल
(Total Revenue)
५,९३०.२४ ९,३२१.९२ ९,४६८.९५ ५,४७३.२७
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
१३६.३५ १८२.५१ १२३.३४ ७२.०२
Net Worth
(एकूण मालमत्ता)
३९४.१९ ५७५३०७ ७००.१२ ७७२.७४
Total Borrowing
(एकूण कर्ज)
४८८.९९ ८८१.७४ १,०६५.७६ १,३९५.२०

राशि पेरिफेरल्स लिमिटेड कंपनीचे प्रमोटर्स | Promoters of Rashi Peripherals Limited Company

कृष्ण कुमार चौधरी, सुरेशकुमार पानसारी, कपाल सुरेश पानसारी, केशव कृष्ण कुमार चौधरी, चमन पानसारी, कृष्ण कुमार चौधरी आणि सुरेश एम पानसारी हे राशि पेरिफेरल्स लिमिटेड कंपनीचे संचालक (प्रमोटर्स) आहेत.

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.rptechindia.com/

Rashi Peripherals IPO

कंपनीचे ग्रे मार्केट प्रीमिअम मध्ये आज घट होऊन ते ८५ वरून ७० कडे आले आहे. ग्रे मार्केट demand आणि supply नुसार कमी जास्त होत असते.
राशि पेरिफेरल्स लिमिटेड आयपीओ ७ फेब्रुवारी २०२४ या दिवशी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्द असणार आहे.
१९८९ मध्ये कृष्णा चौधरी आणि सुरेश पानसारी यांनी मिळून RP Tech India म्हणजेच राशि पेरिफेरल्स लिमिटेड हि कंपनी स्थापन केली आहे.
राशि पेरिफेरल्स लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ६०० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या १,९२,९२,६०४ आहे आणि लॉट साईझ ४८ आहे.

Leave a Comment