एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Entero Healthcare Solutions Limited IPO Review in Marathi

भारतातील आरोग्यसेवा उत्पादनांची वितरक असलेली एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीचा आयपीओ ९ फेब्रुवारी २०२४ रोजी शेअर बाजारात उपलब्द झाला असून १३ फेब्रुवारीपर्यंत तुम्ही या IPO साठी apply करू शकता. चला जाणून घेऊया या कंपनीच्या आयपीओची संपूर्ण माहिती.

Entero Healthcare Solutions Limited IPO
Entero Healthcare Solutions Limited IPO

 

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड कंपनीची माहिती | Entero Healthcare Solutions Limited Information

Entero Healthcare Solutions Limited ही कंपनी २०१८ साली स्थापन झाली असून भारतातील आरोग्यसेवा उत्पादनांची वितरक आहे. कंपनी संपूर्ण भारतातील फार्मसी, रुग्णालये आणि दवाखाने यांना आरोग्यसेवा उत्पादने पुरविते.

२०२२ साली revenue (महसूल)नुसार आरोग्यसेवा उत्पादने distribute करणारी भारतातील तिसरी कंपनी बनली आहे.

कंपनी भारतातील ३७ शहरे आणि ४९५ जिल्ह्यांमध्ये आरोग्यसेवा उत्पादनांचा पुरवठा करीत आहे. त्याचबरोबर कंपनीची वेगवेगळ्या शहरांमध्ये ७३ गोदामे आहेत.

२०२१, २०२२ आणि २०२३ या आर्थिक वर्षांमध्ये कंपनीने अनुक्रमे ३९,५००, ६४,२०० आणि ८१,४०० ग्राहकांना सेवा दिली. याव्यतिरिक्त, त्यांनी याच कालावधीत १,६००, २,५०० आणि ३,४०० हॉस्पिटल ग्राहकांना सेवा दिली.

३१ मार्च २०२३ पर्यंत, कंपनीमध्ये ३०१४ कर्मचारी आहेत.

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेडची आयपीओची उपलब्धता | Entero Healthcare Solutions Limited IPO Availability of Shares

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड आयपीओची एकूण किंमत १,६००.०० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या १,२७,१८,६०० आहे आणि त्यातील १,००० कोटी रुपयांचे ७९,४९,१२५ शेअर्स Fresh Issue असून ६०० कोटी रुपयांचे ४७,६९,४७५ शेअर्स ऑफर फॉर सेल आहेत.

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Entero Healthcare Solutions Limited IPO Share Price and Lot Size

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ११९५ रुपये आणि कमाल (maximum) किंमत १२५८ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ११९५ ते १२५८ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ११ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ११ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ११९५*११ = १३,१४५ रुपये ते  १२५८*११=१३,८३८ रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (११ शेअर्स) म्हणजेच १३,८३८ रुपये तर जास्तीत जास्त १४ लॉट (१५४ शेअर्स) म्हणजेच १,९३,७३२ रुपये इतकी आहे.

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड आयपीओची तारीख | Entero Healthcare Solutions Limited IPO Date

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड आयपीओ शुक्रवार, फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला  असून अखेरची तारीख मंगळवार, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस (शनिवार आणि रविवार वगळता) आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख बुधवार, १४ फेब्रुवारी २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम गुरुवार, १५ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच गुरुवार, १५ फेब्रुवारी २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ११ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि शुक्रवार, १६ फेब्रुवारी २०२४ रोजी एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Entero Healthcare Solutions Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) १२९.७५
इक्विटीवरील रिटर्न (ROE)  -२.६६ %
ROCE ६.०६ %
Debt/Equity ०.४५
EPS ९.७

 

एंटेरो हेल्थकेअर सोल्युशन्स लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Entero Healthcare Solutions Limited company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३० सप्टेंबर २०२३
एकूण मालमत्ता
(Total Assets)
८३३.७९ १,१२५.९८ १,३०८.७३ १,५०५.९५
एकूण महसूल
(Total Revenue)
१,७८३.६७ २,५२६.५५ ३,३०५.७२ १,८९८.९८
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
-१५.३५ -२९.४४ -११.१० ११.६४
Net Worth
(एकूण मालमत्ता)
४८७.०६ ५६३.२२ ५९७.६६ ६६०.५४
Total Borrowing
(एकूण कर्ज)
१४१.७० २८५.०३ ३७३.५२ ४८८.६८

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.enterohealthcare.com/

Leave a Comment