बोनस शेअर म्हणजे काय? | Bonus Share | बोनस शेअरचे फायदे काय आहेत, जाणून घ्या…

 

बोनस शेअर म्हणजे काय? बोनस शेअरचे फायदे काय आहेत? बोनस शेअरमुळे आपली कंपनीतील गुंतवणूक वाढते का? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया बोनस शेअर.

Bonus Share
Bonus Share

 

बोनस शेअर म्हणजे काय?

बोनस शेअर म्हणजे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दिलेली फ्री भेट असते ज्यांना ‘स्क्रिप डिव्हिडंड’ किंवा ‘कॅपिटलायझेशन इश्यू’ म्हणूनही ओळखले जाते. बोनस शेअर्स हे अतिरिक्त खर्चाशिवाय दिलेले शेअर्स आहेत जे कंपनी आपल्या शेअरधारकांना त्यांच्या मालकीच्या शेअरच्या प्रमाणात देत असते आणि त्यासाठी कंपनी १:१ बोनस, १:२ बोनस, २:३ बोनस, २:४ बोनस अशा प्रमाणात बोनस जाहीर करते.
जेव्हा एखादी कंपनी बोनस शेअर्स जारी करण्याचा निर्णय घेते, तेव्हा ती सध्याच्या भागधारकांची प्रमाणबद्ध मालकी कायम ठेवत थकबाकी असलेल्या समभागांची एकूण संख्या वाढवते. उदाहरणार्थ, जर एखाद्या भागधारकाकडे कंपनीचे १०० शेअर्स असतील आणि कंपनीने १:१ बोनस जारी करण्याची घोषणा केली, तर शेअरहोल्डरला अतिरिक्त १०० शेअर्स मोफत मिळतील. परिणामी, भागधारकाची एकूण होल्डिंग २०० समभागांपर्यंत वाढेल.

कंपनीकडे जेव्हा पुरेसा राखीव किंवा नफा जमा केला असेल आणि कंपनीच्या रोख स्थितीवर परिणाम न करता त्यांच्या भागधारकांना बक्षीस देऊ इच्छित असेल तर कंपनीमध्ये असलेल्या एकूण नफ्यातून म्हणजेच रिझर्व्ह्‌ज फंडातून असे बोनस शेअर हे शेअर धारकांना दिले जातात. कंपनीचे संचालक मंडळाने बोनस द्यायचे असे जाहीर केल्यानंतर एक तारीख ठरवून एखाद्या दिवशी हे बोनस शेअर आपल्या डिमॅट खात्यात जमा करतात.

कंपनी बोनस शेअर्स का देत असते?

जर कंपनीला एखाद्या वर्षी फायदा होऊनही निधीची कमतरता असल्यास ,जेव्हा एखाद्या कंपनीस आपल्या भागधारकांना लाभांश देण्यास कॅश नसते तेव्हा बोनस शेअर दिले जातात. अशा परिस्थितीत कंपनी लाभांश देण्याऐवजी विद्यमान शेअरधारकांना बोनस शेअर वाटते . हे शेअर विद्यमान समभागधारकांना कंपनीत असलेल्या सध्याच्या शेअरच्या प्रमाणात दिले जातात. विद्यमान भागधारकांना बोनस शेअर्स देणे म्हणजे capitalization of profits असेही म्हटले जाते कारण ते शेअर कंपनीच्या नफ्यातून दिले जाते.

बोनस नंतर कंपनीची face value बदलते का ?

कोणत्याही कंपनीने बोनस जाहीर केल्यानंतर त्या कंपनीच्या फेस value च्या किंमतीवर काहीही परिणाम होत नाही. जसे कि एखाद्या कंपनीची फेस value १० रु असेल तर बोनस जाहीर केल्यानंतर सुद्धा face value १० रु राहील. कंपनीच्या शेअरच्या किंमती खालीवर होत असतात पण face value ची किंमत बदलत नसते.

उदाहरण पाहूया,

समजा, XYZ कंपनीने १:१ बोनस जाहीर केला आणि एका शेअरचा भाव १००० रुपये आहे. आणि आपल्याकडे XYZ कंपनीचे एकूण १०० शेअर्स असतील

तर बोनसनंतर ,

१:१ बोनस नुसार गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक शेअर बोनस म्हणून मिळेल म्हणजेच आपल्याकडे असलेल्या १०० शेअर्सची एकूण संख्या २०० होईल आणि XYZ कंपनीच्या एका शेअरचा भाव १००० रुपये वरून प्रति शेअर  ५०० रुपये होईल.

बोनसपूर्वी आपली XYZ कंपनीतील
एकूण गुंतवणूक = १०० शेअर * १००० रु प्रति शेअर किंमत = १,००,००० रुपये.

बोनसनंतर आपली XYZ कंपनीतील
एकूण गुंतवणूक = २०० शेअर * ५०० रु प्रति शेअर किंमत = १,००,००० रुपये अशीच असेल.

याठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे कि आपली कंपनीतील एकूण गुंतवणूक बोनसपूर्वी किंवा बोनसनंतरहि जास्त किंवा कमी होत नाही. कारण बोनसनंतर आपल्या अकाउंटमधील एकूण शेअरची संख्या वाढते परंतु  शेअरची किंमत हि बोनसच्या प्रमाणात कमी होते .

या उदाहरणामध्ये १:१ बोनस जाहीर केला म्हणजेच शेअरची संख्या हि दुप्पट होईल आणि शेअरची किंमत हि निम्मी होईल.

बोनस शेअर जाहीर केल्याने कंपनीसाठी होणारे फायदे

Share Capital वाढते –
बोनस जाहीर केल्याने कंपनीच्या शेअरची संख्या वाढते. जर डिविडेंड जाहीर केला असता तर कंपनीच्या नफ्यातून पैसे शेअरधारकांच्या बँक अकाउंट मध्ये जातो तर बोनस जाहीर केल्याने कंपनीचा पैसा कंपनीमध्येच राहतो.

शेअरची किंमत कमी होते –
बोनस जाहीर केल्यावर शेअरची संख्या वाढते पण सोबतच शेअरची किंमत कमी होते. त्यामुळे जे नवीन ग्राहक असतात ज्या व्यक्तींना तो शेअर खरेदी करायचं असेल तर ते कमी किंमतीमुळे खरेदी करू शकतात .ज्याचा फायदा कंपनीला होतो. शेअरची किंमत कमी झाल्यामुळे आधीचे जुने गुंतवणूकदार  जास्त गुंतवणूक करण्यास तयार होतात आणि नवीन गुंतवणूकदारांना कमी किमतीमध्ये शेअर्स खरेदी करण्याची संधी मिळते.

कंपनीचे नाव होते –
बोनस जाहीर केल्याने त्या कंपनी विषयी लोकांमध्ये सकारात्मक परिणाम होतो आणि गुंतवणूक करण्यास तयार होतात.

Liquidity  वाढते –
कंपनीचे एकूण शेअर्स वाढल्याने कंपनीची Liquidity  वाढण्यास मदत होते..

बोनस शेअर जाहीर केल्याने शेअरधारकांना होणारे फायदे

शेअरची संख्या वाढते –
बोनस शेअर जाहीर केल्याने आपल्याकडील त्या कंपनीच्या  एकूण शेअरची संख्या वाढते.

जर शेअर मार्केटमध्ये XYZ कंपनीने १:१ बोनस जाहीर केला आणि एका शेअरचा भाव २०० रुपये आहे. आणि आपल्याकडे XYZ कंपनीचे एकूण शेअर १०० असतील तर बोनसनंतर ,

१:१ बोनस म्हणजेच आपल्याला एका शेअरवर एक शेअर बोनस मिळेल म्हणजेच आपल्याकडील एकूण शेअरची संख्या २०० होईल .

भविष्यात जास्त शेअरवर डिविडेंड मिळू शकतो –
आपल्याकडे XYZ कंपनीचे १०० शेअर्स असतील आणि  १:१ बोनस जाहीर केल्यानंतर ते शेअर २०० होतील आणि जर XYZ कंपनीने १० रु प्रति शेअर डिविडेंड जाहीर केला तर तर आपल्यला मिळणारा डिविडेंड हा २०० शेअर वर मिळेल त्याचा आपल्याला फायदा होईल .

बोनसपूर्वी डिविडेंड – १०० शेअर * १० रु प्रति शेअर = १००० रुपये
बोनसनंतर डिविडेंड – २०० शेअर * १० रु प्रति शेअर = २००० रुपये

बोनस शेअर निगडित महत्वाच्या तारखा –

Bonus Announcement Date –
ज्या दिवशी कंपनी बोनस देण्याचे जाहीर करते त्या तारखेला Bonus Share Announcement Date असे म्हणतात.

Ex Bonus Date –
Ex Bonus Date म्हणजेच अशी तारीख, ज्या दिवशी किंवा या तारखेच्या आधी आपण त्या कंपनीचे शेअर खरेदी केलेलं असावेत. जर आपण Ex Bonus Date च्या नंतर त्या कंपनीचे शेअर खरेदी केले तर आपणास बोनस शेअरचा लाभ मिळणार नाही.

Record Date –
या दिवशी कंपनी आपले रेकॉर्ड तपासते आणि ठरवते कोण कोण बोनस शेअर्ससाठी पात्र आहेत. Record Date च्या दिवशी आपल्या डिमॅट खात्यात कंपनीचे शेअर असणे आवश्यक आहे.

Credit Date –
ज्या दिवशी आपल्या डिमॅट खात्यात कंपनीचे बोनस शेअर जमा होतात त्या तारखेला Credit Date असे म्हणतात .

बोनस शेअर कुठे पाहावे –

ज्या कंपन्या बोनस शेअर जाहीर करतात अशा कंपन्याची यादी आपण इंटरनेट वर पाहू शकता. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण nseindia च्या वेबसाइट वर बोनस देणाऱ्या कंपन्यांची यादी पाहू शकता.
https://www.nseindia.com/

Leave a Comment