एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Exicom Tele-Systems Limited IPO Review in Marathi

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला आहे आणि २९ फेब्रुवारी २०२४ रोजी बंद होईल तर जाणुया एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती.

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.

Exicom Tele-Systems Limited IPO Review in Marathi
Exicom Tele-Systems Limited IPO

 

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड कंपनीची माहिती | Exicom Tele-Systems Limited company Information

Exicom Tele-Systems Limited हि कंपनी १९९४ साली स्थापन झाली आहे. हि कंपनी पॉवर सिस्टम, इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग आणि त्या संबंधित अनेक service पुरविते.

कंपनी दोन बिझनेस अंतर्गत काम करते.

  • पॉवर सिस्टीम: Exicom डिजिटल कम्युनिकेशन नेटवर्कसाठी अखंडित उर्जा साधने पुरविणे.
  • EV चार्जिंग सोल्यूशन्स: Exicom ने भारत आणि (Southeast Asia) आग्नेय आशियामध्ये ६१००० हून अधिक AC आणि DC चार्जरची सोय केली आहे. त्यांचे ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्स हे पर्यावरणीय आणि विद्युत परिस्थितींचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

३१ मार्च २०२३ पर्यंत, Exicom Tele-Systems Limited हि कंपनी भारतातील EV चार्जर उत्पादन क्षेत्रात प्रवेश करणारी पहिली कंपनी आहे.

कंपनी ईव्ही चार्जर व्यवसायात कार्यरत आहे, जी स्लो चार्जिंग सोल्यूशन्स (प्रामुख्याने निवासी वापरासाठी एसी चार्जर) आणि जलद चार्जिंग सोल्यूशन्स (व्यवसायासाठी डीसी चार्जर आणि शहरे आणि महामार्गांमध्ये सार्वजनिक चार्जिंग नेटवर्क) दोन्ही चार्जिंग सोल्यूशन्स ग्राहकांना पुरविते.

 कंपनीच्या ग्राहक बेसमध्ये स्थापित ऑटोमोटिव्ह OEM (प्रवासी कार आणि EV बससाठी), चार्ज पॉइंट ऑपरेटर (CPO) आणि फ्लीट एग्रीगेटर यांचा समावेश आहे.

 ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत, कंपनीने भारतातील ४०० ठिकाणी ६१,००० हून अधिक ईव्ही चार्जर स्थापन केले आहेत. त्याचप्रमाणे कंपनीने दूरसंचार क्षेत्रात २.१० GWH पेक्षा जास्त स्टोरेज क्षमतेएवढी ४७०८१० Li-ion बॅटरीज तैनात केल्या आहेत.

सप्टेंबर २०२३ पर्यंत, कंपनीने १५ ऑटोमोटिव्ह OEM, ३२ राष्ट्रीय आणि प्रादेशिक CPO आणि चार फ्लीट एग्रीगेटर्ससह ७० हून अधिक ग्राहकांना EV चार्जर्सचा पुरवठा केला आहे.

३० सप्टेंबर २०२३ पर्यंत, कंपनीचे भारतात १,१९९० कर्मचारी कार्यरत आहेत.

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Exicom Tele-Systems Limited IPO Availability of Shares

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ४२९.०० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या ३,०२,११,२१४ शेअर्स आहे आणि त्यातील ३२९.०० कोटी रुपयांचे अंदाजे २,३१,६९,०१४ शेअर्स Fresh Issue असून १००.०० कोटी रुपयांचे ७०,४२,२०० शेअर्स ऑफर फॉर सेल आहेत.

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Exicom Tele-Systems Limited IPO Share Price and Lot Size

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत १३५ रुपये आणि कमाल (maximum) किंमत १४२ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार १३५ ते १४२ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि १०० आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच १०० शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १३५*१०० = १३,५०० रुपये ते  १४२*१००=१४,२०० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (१०० शेअर्स) म्हणजेच १४,२०० रुपये तर जास्तीत जास्त १४ लॉट (१४०० शेअर्स) म्हणजेच १,९८,८०० रुपये इतकी आहे.

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड आयपीओची तारीख | Exicom Tele-Systems Limited IPO Date

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड आयपीओ मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला  असून अखेरची तारीख गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख शुक्रवार, १ मार्च २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम सोमवार, ४ मार्च २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच सोमवार, ४ मार्च २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे १०० शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि मंगळवार, ५ मार्च २०२४ रोजी एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Exicom Tele-Systems Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) २१७.६३
इक्विटीवरील रिटर्न (ROE)  १३.३८ %
ROCE १०.९२ %
EPS ०.६५

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Exicom Tele-Systems Limited company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३० सप्टेंबर २०२३
एकूण मालमत्ता
(Total Assets)
६७८.४६ ६०२.९९ ७०५.०९ ६२९.४१
एकूण महसूल
(Total Revenue)
५२४.३६ ८४८.९६ ७२३.४० ४६७.२१
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
३.४५ ५.१४ ६.३७ २७.४६
Net Worth
(एकूण मालमत्ता)
२१३.४४ २२१.५७ २३२.०० ३११.४०
Total Borrowing
(एकूण कर्ज)
१०१.७६ १०७.६७ ११७.९२ ७२.८४

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.exicom.in/

Leave a Comment