भारत हायवेज इनविट आयपीओ संपूर्ण माहिती | Bharat Highways Infrastructure Investment Trust InvIT IPO Review in Marathi

भारत हायवेज इनविट आयपीओ २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला आहे आणिv आज १ मार्च २०२४ रोजी बंद होईल तर जाणुया भारत हायवेज इनविट आयपीओची संपूर्ण माहिती.

भारत हायवेज इनविट ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.

Bharat Highways Infrastructure Investment Trust IPO
Bharat Highways Infrastructure Investment Trust IPO

 

भारत हायवेज इनविट कंपनीची माहिती | Bharat Highways Infrastructure Investment Trust company Information

Bharat Highways InvIT हा infrastructure क्षेत्रात गुंतलेल्या कंपन्यांच्या infrastructure मालमत्तांच्या पोर्टफोलिओमध्ये आणि/किंवा सिक्युरिटीज प्राप्त करण्यासाठी, व्यवस्थापित करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला एक इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे, जो SEBI अंतर्गत परवानगी असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या कामकाजांना पुढे नेतो ज्यामध्ये जसे निधी उभारणे, SEBI InvIT नियमांनुसार गुंतवणूक करणे यांच्जा समावेश असतो.

कंपनीकडे तिच्या पोर्टफोलिओमध्ये सात रस्त्यांचे प्रोजेक्ट  आहेत, जे सर्व पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये HAM तत्त्वावर चालवले जातात.

भारत हायवेज इनविट आयपीओची उपलब्धता | Bharat Highways Infrastructure Investment Trust IPO Availability of Shares

भारत हायवेज इनविट आयपीओची एकूण किंमत २,५००.०० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या सुमारे २५,००,००,००० आहे आणि कंपनीचे सगळेच शेअर्स Fresh Issue आहेत.

भारत हायवेज इनविट आयपीओची किंमत आणि लॉट साईझ |  Bharat Highways InvIT Share Price and Lot Size

भारत हायवेज इनविट आयपीओ हा बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.

भारत हायवेज इनविट आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ९८ रुपये आणि कमाल (maximum) किंमत १०० रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ९८ ते १०० मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि १५० शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच १५० शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ९८*१५० = १४,७०० रुपये ते  १००*१५०=१५,००० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (१५० शेअर्स) म्हणजेच १५,००० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (१९५० शेअर्स) म्हणजेच १,९५,००० रुपये इतकी आहे.

भारत हायवेज इनविट आयपीओची तारीख | Bharat Highways InvIT IPO Date

भारत हायवेज इनविट आयपीओ बुधवार, २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला  असून अखेरची तारीख शुक्रवार, १ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

भारत हायवेज इनविट आयपीओ अलोटमेंट तारीख सोमवार, ४ मार्च २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम मंगळवार, ५ मार्च २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच मंगळवार, मार्च २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे १५० शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि बुधवार, ६ मार्च २०२४ रोजी भारत हायवेज इनविट आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

भारत हायवेज इनविट कंपनीची आर्थिक माहिती | Bharat Highways InvIT company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३० सप्टेंबर २०२३
एकूण मालमत्ता
(Total Assets)
४,९४३.९५ ५,५३६.४० ६,०५६.२८ ५,९१६.८०
एकूण महसूल
(Total Revenue)
२,१७०.३९ १,६००.१८ १,५३७.४७ ३८८.५४
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
१४९.४५ ६२.८७ ५२७.०५ १०१.३५

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.bharatinvit.com/

 

Leave a Comment