मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Mukka Proteins Limited IPO Review in Marathi

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड या कंपनीचा आयपीओ २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला आहे आणि ४ मार्च २०२४ रोजी बंद होईल तर जाणुया मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती.

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.

Mukka Proteins IPO
Mukka Proteins IPO

 

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड कंपनीची माहिती | Mukka Proteins Limited company Information

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड हि कंपनी २००३ मध्ये स्थापन झाली असून कंपनी फिश प्रोटीन उत्पादने बनवते. जी प्रामुख्याने फिश मील, फिश ऑइल आणि फिश सोल्युबल पेस्ट तयार करते आणि पुरविते जे एक्वा फीड (मासे आणि कोळंबीसाठी), पोल्ट्री फीड (ब्रॉयलर आणि लेयर्ससाठी) आणि पाळीव प्राणी (कुत्रा आणि मांजरीच्या खाद्यासाठी) तयार करण्यासाठी आवश्यक घटक आहेत तसेच प्राण्यांच्या अन्न विभागात ब्लॅक सोल्जर फ्लाय (बीएसएफ) इन्सेक्ट मील सारखी पर्यायी प्रथिने विकसित करते.

कंपनी आपली उत्पादने बहारीन, बांगलादेश, चिली, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, चीन, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, ओमान, तैवान आणि व्हिएतनाम अशा १० हून अधिक देशांमध्ये निर्यात करते. ३१ मार्च २०२३ पर्यंत, कंपनीमध्ये तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचारी, प्रशासन, व्यवस्थापन आणि ऑपरेशन्ससह विविध विभागांमध्ये ३८५ कर्मचारी काम करीत आहेत. कंपनी सध्या सहा उत्पादन facilities चालवते, ज्यात चार भारतात आणि दोन ओमानमध्ये आहेत, ज्या तिच्या विदेशी उपकंपनी Ocean Aquatic Proteins LLC कडे आहेत. याव्यतिरिक्त, कंपनी तीन ब्लेंडिंग प्लांट आणि पाच स्टोरेज facilities चालवते ज्या सर्व भारतात आहेत.  ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत, कंपनीने फिशमील आणि फिश ऑइलच्या पुरवठ्यासाठी ससिहिथलू (कर्नाटक), उडुपी (कर्नाटक), तळोजा (महाराष्ट्र) आणि रत्नागिरी (महाराष्ट्र) येथे तृतीय-पक्ष manufacturing facilities यांच्याशी करारबद्ध व्यवस्था केली आहे.

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Mukka Proteins Limited IPO Availability of Shares

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओची एकूण किंमत २२४.०० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या सुमारे ८,००,००,००० आहे आणि कंपनीचे सगळेच शेअर्स Fresh Issue आहेत.

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ |  Mukka Proteins Limited Company Share Price and IPO Lot Size

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १ रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत २६ रुपये आणि कमाल (maximum) किंमत २८ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार २६ ते २८ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ५३५ शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ५३५ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि २६*५३५ = १३,९१० रुपये ते  २८*५३५=१४,९८० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (५३५ शेअर्स) म्हणजेच १४,९८० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (६९५५ शेअर्स) म्हणजेच १,९४,७४० रुपये इतकी आहे.

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओची तारीख | Mukka Proteins Limited IPO Date

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओ गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला  असून अखेरची तारीख सोमवार, मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस (शनिवार आणि रविवार वगळता) आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख मंगळवार, मार्च २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम बुधवार, ६ मार्च २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच बुधवार, मार्च २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ५३५ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि गुरुवार, मार्च २०२४ रोजी मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Mukka Proteins Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) १२.९६
इक्विटीवरील रिटर्न (ROE)  ३६.७१ %
ROCE १७.६२ %
Debt/Equity १.६४
EPS २.१६

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Mukka Proteins Limited company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३० सप्टेंबर २०२३
एकूण मालमत्ता
(Total Assets)
३५३.९३ ३९२.३० ५७५.१६ ६४१.१८
एकूण महसूल
(Total Revenue)
६०९.९५ ७७६.१५ १,१८३.८० ६१२.८८
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
११.०१ २५.८२ ४७.५३ ३२.९८
Net Worth
(एकूण मालमत्ता)
६४.५४ ८७.२५ १२८.९२ १५९.११
Total Borrowing
(एकूण कर्ज)
१५९.१९ १७३.५० २५४.८३ ३१७.७३

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

 

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.mukkaproteins.com/

1 thought on “मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Mukka Proteins Limited IPO Review in Marathi”

Leave a Comment