जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | JG Chemicals Limited IPO Review in Marathi | गुंतवणूक करण्याची आज शेवटची तारीख

जेजी केमिकल्स लिमिटेड या कंपनीचा आयपीओ ५ मार्च २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी open झाला आहे आणि आज ७ मार्च २०२४ रोजी बंद होईल तर जाणुया जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती.

जेजी केमिकल्स लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.

जेजी केमिकल्स लिमिटेड कंपनीचे आजचे subscription:

जेजी केमिकल्स लिमिटेड कंपनीचे आजचे subscription तिसऱ्या दिवशी २८.१६ पट आहे. त्यापैकी domestic investors कडून IPO साठी खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती
जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती

 

जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओची उपलब्धता | JG Chemicals Limited IPO Availability of Shares

जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओची एकूण किंमत २५१.१९ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या सुमारे ११३६६०६३ शेअर्स आहे त्यापैकी कंपनीचे १६५ कोटींचे शेअर्स म्हणजेच सुमारे ७४६६०६३ शेअर्स Fresh Issue आहेत आणि ८६.१९ कोटींचे शेअर्स म्हणजेच सुमारे ३९००००० शेअर्स ऑफर फॉर सेल आहेत.

जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ |  JG Chemicals Limited Company Share Price and IPO Lot Size

जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.

जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत २१० रुपये आणि कमाल (maximum) किंमत २२१ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार २१० ते २२१ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ६७ शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ६७ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि २१०*६७ = १४,०७० रुपये ते  २२१*६७=१४,८०७ रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (६७ शेअर्स) म्हणजेच १४,८०७ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (८७१ शेअर्स) म्हणजेच १,९२,४९१ रुपये इतकी आहे.

जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओची तारीख | JG Chemicals Limited IPO Date

जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओ मंगळवार, ५ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला आहे आणि अखेरची तारीख गुरुवार, मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख सोमवार, ११ मार्च २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम मंगळवार, १२ मार्च २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच मंगळवार, १२ मार्च २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ६७ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि बुधवार, १३ मार्च २०२४ रोजी जेजी केमिकल्स लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

जेजी केमिकल्स लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | JG Chemicals Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) १६.२५
इक्विटीवरील रिटर्न (ROE)  ८.२० %
ROCE ११.८६ %
Debt/Equity ०.११
EPS १३.०६

जेजी केमिकल्स लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | JG Chemicals Limited company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३० डिसेंबर २०२३
एकूण मालमत्ता
(Total Assets)
२०९.९४ २६४.१४ २९७.७९ २७१.२६
एकूण महसूल
(Total Revenue)
४४०.४१ ६२३.०५ ७९४.१९ ४९१.१०
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
२८.८० ४३.१३ ५६.७९ १८.५१
Net Worth
(एकूण मालमत्ता)
१०८.४८ १४७.६६ १९९.८९ २१७.८६

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://jgchem.com/

Leave a Comment