गोपाल स्नॅक्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Gopal Snacks Limited IPO Review in Marathi

गोपाल स्नॅक्स लिमिटेड या कंपनीचा आयपीओ ६ मार्च २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी open झाला होता आणि ११ मार्च २०२४ रोजी total ९.५० च्या subsription ने बंद झाला आहे. क्वालिफाइड इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सनी २,३८१ कोटी रुपयांचे शेअर्स घेऊन या आयपीओसाठी पसंती दर्शविली आहे. तर जाणुया गोपाल स्नॅक्स लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती.

गोपाल स्नॅक्स लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.

Gopal Snacks Limited IPO Review in Marathi
Gopal Snacks Limited IPO Review in Marathi

 

गोपाल स्नॅक्स लिमिटेड कंपनीची माहिती | Gopal Snacks Limited company Information

गोपाल स्नॅक्स लिमिटेड हि कंपनी १९९९ साली स्थापन झाली असून हि एक FMCG सेक्टर मधील कंपनी आहे जी भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाश्चात्य स्नॅक्स आणि इतर उत्पादनांचे व्यवहार करते.

कंपनी विविध प्रकारचे स्नॅक्स उत्पादने विकते ज्यात नमकीन आणि गाठिया यांसारखे एथनिक स्नॅक्स, तसेच वेफर्स, एक्सट्रुडेड स्नॅक्स आणि स्नॅक पेलेट्स यांसारखे वेस्टर्न स्नॅक्स यांचा समावेश आहे. ते पापड, मसाले, बेसन, नूडल्स, रस्क आणि सोनपापडी यांसारख्या जलद गतीने चालणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू देखील विकतात.

कंपनीचे सहा उत्पादन युनिट्स (manufacturing units) आहेत त्यापैकी तीन प्राथमिक उत्पादन युनिट्स (primary manufacturing units) आहेत आणि तीन सहायक उत्पादन युनिट (ancillary manufacturing units) आहेत. प्राथमिक उत्पादन युनिट नागपूर (महाराष्ट्र), राजकोट (गुजरात) आणि मोडासा (गुजरात) येथे आहेत. दोन सहायक युनिट्सपैकी एक युनिट राजकोट (गुजरात) येथे आणि एक युनिट मोडासा (गुजरात)  येथे आहे.

गोपाल स्नॅक्स लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Gopal Snacks Limited IPO Availability of Shares

गोपाल स्नॅक्स लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ६५० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या सुमारे १,६२,०९,४७६ शेअर्स आहे आणि कंपनीचे सगळेच शेअर्स  हे ऑफर फॉर सेल आहेत.

गोपाल स्नॅक्स लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ |  Gopal Snacks Limited Company Share Price and IPO Lot Size

गोपाल स्नॅक्स लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १ रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.

गोपाल स्नॅक्स लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ३८१ रुपये आणि कमाल (maximum) किंमत ४०१ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ३८१ ते ४०१ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.) या आयपीओ मध्ये गोपाल स्नॅक्स लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रती शेअर्स ३८ रुपयांची सवलत दिली आहे.

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ३७ शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ३७ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ३८१*३७ = १४,०९७ रुपये ते  ४०१*३७=१४,८३७ रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (३७ शेअर्स) म्हणजेच १४,८३७ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (४८१ शेअर्स) म्हणजेच १,९२,८८१ रुपये इतकी आहे.

गोपाल स्नॅक्स लिमिटेड आयपीओची तारीख | Gopal Snacks Limited IPO Date

गोपाल स्नॅक्स लिमिटेड आयपीओ बुधवार, ६ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला आहे आणि अखेरची तारीख सोमवार, ११ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे,

गोपाल स्नॅक्स लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख मंगळवार, १२ मार्च २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम बुधवार, १३ मार्च २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच बुधवार, १३ मार्च २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ३७ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि गुरुवार, १४ मार्च २०२४ रोजी गोपाल स्नॅक्स लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

गोपाल स्नॅक्स लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Gopal Snacks Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) ४४.४७
इक्विटीवरील रिटर्न (ROE)  १६.०५ %
ROCE २०.८३ %
Debt/Equity ०.०८
EPS ९.०२

 

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.gopalnamkeen.com/

Leave a Comment