क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Krystal Integrated Services Limited IPO Review in Marathi

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस या कंपनीचा आयपीओ १४ मार्च २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी open झाला आहे आणि १८ मार्च २०२४ रोजी बंद होईल तर जाणुया क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आयपीओची संपूर्ण माहिती.

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.

Krystal Integrated Services Limited IPO
Krystal Integrated Services Limited IPO

 

Table of Contents

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे आजचे subscription:

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस कंपनीचे आजचे subscription ०.६१ पट आहे.

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस कंपनीची माहिती | Krystal Integrated Services Limited company Information

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड हि कंपनी भारतातील आघाडीच्या सुविधा व्यवस्थापन सेवा (integrated facilities management) कंपन्यांपैकी एक आहे, ज्यात आरोग्यसेवा (healthcare), शिक्षण (education), सार्वजनिक प्रशासन (public administration) म्हणजेच राज्य सरकारी संस्था (state government entities), नगरपालिका संस्था (municipal bodies) आणि इतर सरकारी कार्यालये(other government offices) त्याचबरोबर विमानतळ, रेल्वे आणि मेट्रो सुविधा (metro infrastructure) आणि किरकोळ क्षेत्र (retail sectors) या सगळ्यांवर लक्ष केंद्रित करून एक व्यापक श्रेणी प्रदान करते.

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड हि कंपनी भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या एकात्मिक सुविधा व्यवस्थापन (integrated facility management) कंपन्यांपैकी एक कंपनी आहे.

कंपनीच्या service मध्ये घरकाम, स्वच्छता, लँडस्केपिंग आणि बागकाम यासारख्या सॉफ्ट सेवा त्याचबरोबर यांत्रिक (mechanical) , इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग सेवा, सॉलिड, द्रव (liquid) आणि जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन (biomedical waste management), कीटक नियंत्रण (pest control) आणि दर्शनी भागाची स्वच्छता (façade cleaning) यासारख्या हार्ड सेवांचा समावेश आहे.

कंपनी तिच्या ग्राहकांना स्टाफिंग सोल्यूशन्स आणि पेरोल मॅनेजमेंट तसेच खाजगी सुरक्षा आणि मॅनड गार्डिंग सेवा आणि जेवणाची सोय देखील करते.

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Krystal Integrated Services Limited IPO Availability of Shares

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आयपीओची एकूण किंमत ३००.१३ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या सुमारे ४१,९७,५५२ शेअर्स आहे त्यापैकी कंपनीचे १७५ कोटींचे शेअर्स म्हणजेच सुमारे २४,४७,५५२ शेअर्स Fresh Issue आहेत आणि १२५.१३ कोटींचे शेअर्स म्हणजेच सुमारे १७,५०,००० शेअर्स ऑफर फॉर सेल आहेत.

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ |  Krystal Integrated Services Limited Company Share Price and IPO Lot Size

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO हा बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ६८० रुपये आणि कमाल (maximum) किंमत ७१५ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ६८० ते ७१५ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि २० शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच २० शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ६८०*२० = १३,६०० रुपये ते  ७१५*२०=१४,३०० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (२० शेअर्स) म्हणजेच १४,३०० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (२६० शेअर्स) म्हणजेच १,८५,००० रुपये इतकी आहे.

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची तारीख | Krystal Integrated Services Limited IPO Date

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आयपीओ गुरुवार, १४ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला असून आणि अखेरची तारीख सोमवार, १८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस (शनिवार आणि रविवार वगळता) गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आयपीओ अलोटमेंट तारीख मंगळवार, १९ मार्च २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम बुधवार, २० मार्च २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच बुधवार, २० मार्च २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे २० शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि गुरुवार, १९ मार्च २०२४ रोजी क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

हे पण वाचा: पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Krystal Integrated Services Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) २१.४५
इक्विटीवरील रिटर्न (ROE)  ११.७१ %
ROCE १६.९७ %
Debt/Equity ०.५८
EPS ३३.३३

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Krystal Integrated Services Limited company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३० डिसेंबर २०२३
एकूण मालमत्ता
(Total Assets)
३३८.४७ ४०४.३९ ३४३.४७ ४४९.८३
एकूण महसूल
(Total Revenue)
४७४.३१ ५५४.८६ ७१०.९७ ४५५.६७
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
१६.६५ २६.१५ ३८.४१ २०.५६
Net Worth
(एकूण मालमत्ता)
१३६.०८ १६३.८६ १६३.४१ १८३.६८
Total Borrowing
(एकूण कर्ज)

६५.३१ ७२.५५ ४७.९९ १०३.३६

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

 

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://krystal-group.com/

Leave a Comment