एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड या कंपनीचा आयपीओ २६ मार्च २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी open झाला होता आणि आज २८ मार्च २०२४ रोजी बंद झाला आहे. ३ एप्रिल २०२४ या दिवशी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला आहे आणि पहील्याच दिवशी या शेअर्स साठी upper circuit लागले आहे तर जाणुया एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती.
SRM कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट झाली आहे.
एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड कंपनीचे एकूण subscription:
SRM कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड कंपनीचे एकूण subscription ८६.५७ पट आहे. त्यातील क्वालिफाइड इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचे एकूण subscription ५९.५९ पट आहे.
एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड कंपनीची माहिती | SRM Contractors Limited company Information
SRM कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड हि कंपनी २००८ साली स्थापन झाली असून ही एक बांधकाम (construction) आणि development कंपनी आहे जी प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये रस्ते (पुलांसह), बोगदे, उतार स्थिरीकरण कामे (slope stabilization works) आणि इतर बांधकाम (other construction activities) यामध्ये कार्यरत आहे.
कंपनी ईपीसी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करते.
कंपनीचे प्रमुख व्यवसाय पुढीलप्रमाणे आहेत:
रस्ते प्रकल्प: जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये रस्ते, पूल आणि महामार्ग यांचे पुनर्संरेखन (realignment), रुंदीकरण (widening), सुधारणा (upgradation), जीर्णोद्धार (restoration) आणि मजबुतीकरण (strengthening) करणे या प्रमुख व्यवसायामध्ये कंपनी काम करते.
टनर प्रकल्प: नवीन बोगद्यांचे डिझाइन आणि बांधकाम करणे, हिमस्खलन आणि भूस्खलन संरक्षण आणि गुहा यांच्यासाठी कट-आणि-कव्हर बोगदे यांचे विस्तार, सुधारणा, पुनर्स्थापना करणे या व्यवसायामध्ये कंपनी काम करते.
स्लोप स्टॅबिलायझेशनची कामे: स्लोप स्टॅबिलायझेशनच्या कामाचा एक भाग म्हणून तटबंदीच्या संरचनेचे नियोजन आणि बांधकाम करणे या व्यवसायामध्ये कंपनी काम करते.
इतर विविध नागरी बांधकाम उपक्रम: सरकारी घरे आणि निवासी घरांचे बांधकाम, ड्रेनेजचे काम तसेच सिंचन आणि पूर संरक्षण कार्य करणे या व्यवसायामध्ये कंपनी काम करते.
मार्च २०२४ पर्यंत, कंपनीने ३७ बांधकाम प्रकल्प पूर्ण केले आहेत ज्यांचे एकूण मूल्य रु. ७७,०८८.०० लाख आहे ज्यामध्ये ३१ रस्ते बांधकाम प्रकल्प, ३ बोगदे प्रकल्प, १ स्लोप स्टॅबिलायझेशन प्रकल्प, आणि 2 विविध बांधकाम कामांचा समावेश आहे.
एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड आयपीओची उपलब्धता | SRM Contractors Limited IPO Availability of Shares
SRM कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड आयपीओची एकूण किंमत १३०.२० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या सुमारे ६२,००,००० शेअर्स आहे आणि कंपनीचे सगळेच शेअर्स Fresh Issue आहेत.
एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | SRM Contractors Limited Company Share Price and IPO Lot Size
SRM कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO हा बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.
SRM कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत २०० रुपये आणि कमाल (maximum) किंमत २१० रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार २०० ते २१० मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)
या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ७० शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ७० शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि २००*७० = १४,००० रुपये ते २१०*७०=१४,७०० रुपये इतकी आहे.
गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (७० शेअर्स) म्हणजेच १४,७०० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (९१० शेअर्स) म्हणजेच १,९१,१०० रुपये इतकी आहे.
एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड आयपीओची तारीख | SRM Contractors Limited IPO Date
SRM कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड आयपीओ मंगळवार, २६ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला असून आणि अखेरची तारीख गुरुवार, २८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस गुंतवणुकीसाठी खुला होता.
SRM कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख सोमवार, १ एप्रिल २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम मंगळवार, २ एप्रिल २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच मंगळवार, २ एप्रिल २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ७० शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि बुधवार, ३ एप्रिल २०२४ रोजी SRM कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://srmcpl.com/