अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड एफपीओ संपूर्ण माहिती – जानेवारी २०२२ | Adani Enterprises Limited FPO Full Details

Adani Enterprises Limited FPO
Adani Enterprises Limited FPO

 

‘Stock Market in Marathi’ या वेबसाईटवर आपले स्वागत आहे.

१९८८ मध्ये स्थापित झालेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (Adani Enterprises Limited) हि कंपनी ‘अदानी’ समूहाचा एक भाग आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड हे पॉवर, कोळसा, आणि कृषी वस्तूंच्या व्यापारात अग्रगण्य कामगिरी बजावत आहे.

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड हा एफपीओ २७ जानेवारी २०२३ रोजी शेअर बाजारात दाखल झाला असून एफपीओच्या माध्यमातून कंपनी २०,०००.०० कोटी रुपये भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड एफपीओ एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.

सगळ्यात अगोदर आपण एफपीओ बद्दल माहिती पाहूया.

एफपीओ म्हणजे काय? | What Is FPO | FPO क्या है?

एफपीओ शेअर बाजारात दुय्यम ऑफर म्हणून ओळखले जाते. आयपीओ (IPO) नंतर कंपनीची शेअर बाजारात नोंदणी (लिस्टेड) होते आणि कंपनी यातून पैसे जमा करते परंतु काही कालावधीनंतर कंपनीला व्यवसायवाढीसाठी किंवा कर्ज कमी करण्यासाठी पुन्हा भांडवलाची गरज भासते. अशा वेळी कंपनी पुन्हा आपल्याकडे असलेले शेअर्स विक्रीला काढते त्याला एफपीओ असे म्हटले जाते.

शेअर बाजारातील कंपनीच्या किमतीपेक्षा एफपीओमध्ये स्वस्त शेअर्स मिळतात त्यामुळे गुंतवणूकदार मोठा नफा मिळवू शकतात. त्याचबरोबर किरकोळ गुंतवणूकदारांना एफपीओमध्ये काही किमतीची सूट दिली जाते.

एफपीओ जरी केल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळते त्यामुळे गुंतवणूकदारांना स्वस्तात शेअर्स खरेदी करता येतात.

एफपीओ चे पूर्ण नाव काय आहे? |  FPO Full Form

फॉलो-ऑन पब्लिक ऑफर्स (Follow on Public Offer) असे एफपीओचे पूर्ण नाव आहे.

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड एफपीओची उपलब्धता | What is Adani Enterprises Limited FPO

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या एफपीओची एकूण किंमत २०,०००.०० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या ६४,७३८,४७५ आहे.

शेअर्सची उपलब्धता पुढीलप्रमाणे विभाजित करण्यात आली आहे.

शेअर्सची उपलब्धता विभाजित प्रमाण
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स)
(Institutional Investors)
निव्वळ ऑफरच्या ५०%
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स
(Non-Institutional Investors)
निव्वळ ऑफरच्या १५%
किरकोळ गुंतवणूकदार
(रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) 
निव्वळ ऑफरच्या ३५%

 

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड एफपीओची किंमत आणि लॉट साईझ | Adani Enterprises Limited FPO Share Price and Lot Size

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड एफपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (फेस प्राइस) हि १ रुपये प्रती शेअर आहे.

या एफपीओमध्ये एका शेअरची किमान किंमत ३११२ रुपये आणि  कमाल () किंमत ३२७६ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ३११२ ते ३२७६ मधील कोणत्याही किमतीमध्ये या एफपीओसाठी अप्लाय करू शकतात ( महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO किंवा एफपीओ मिळण्याचे chances वाढतात.)

या एफपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ४ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ४ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ३११२*४=१२,४४८ रुपये ते  ३२७६*४=१३,१०४ रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (४ शेअर्स) म्हणजेच १३,१०४ रुपये तर जास्तीत जास्त १५ लॉटची (६० शेअर्स) म्हणजेच १,९६,५६० रुपये इतकी आहे.

रिटेल इन्वेस्टरसाठी ६४ रुपये प्रत्येकी शेअर मागे discount दिला आहे.

 

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड एफपीओची तारीख | Adani Enterprises Limited FPO Date

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड एफपीओ २७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला झाला असून अखेरची तारीख ३१ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस एफपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

एफपीओ अलोटमेंट तारीख ३ फेब्रुवारी २०२३ आहे. ज्या इन्वेस्टरला एफपीओ अलोट झाला नसेल त्यांचे एफपीओसाठी भरलेली रक्कम ६ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी Demat account मध्ये शेअर्स क्रेडीट होतील आणि ८ फेब्रुवारी२०२३ रोजी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड एफपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

 

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड माहिती | Adani Enterprises Limited Information

१९८८ मध्ये स्थापन झालेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड हि कंपनी ‘अदानी’ समूहाचा एक भाग आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड हे पॉवर, कोळसा, आणि कृषी वस्तूंच्या व्यापारात अग्रगण्य कामगिरी बजावत आहे. ‘अदानी ग्रुप’ भारतातील प्रमुख व्यवसायिक घराण्यामधील एक आहेत ज्यांची बहुराष्ट्रीय कंपनी अनेक व्यावसायिक उपक्रमांमध्ये कार्यरथ आहेत.

विविध क्षेत्रातील प्रकल्पांच्या दीर्घकालीन यशस्वी अंमलबजावणीमुळे कंपनी अनेक क्षेत्रात leader कंपनी म्हणून ओळखली जाते.

अनेक दशकांच्या ऑपरेशन्समध्ये, अदानी समूहाने अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स अँड एसईझेड, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस यासारख्या युनिकॉर्न्सची यशस्वीपणे निर्मिती करून, कंपनीने देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, अदानी एंटरप्रायझेसने राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केले आहे.

१९९४ सालामध्ये कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून, राष्ट्र उभारणीत योगदान देत  गुंतवणूकदारांसाठी जास्तीत जास्त मूल्य वाढवले आहे.

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड सध्या विमानतळ, रस्ते, जल व्यवस्थापन, डेटा सेंटर्स, सौर उत्पादन, संरक्षण आणि एरोस्पेस, खाद्यतेल आणि खाद्यपदार्थ, खाणकाम एकात्मिक संसाधन उपाय आणि एकात्मिक कृषी उत्पादनांशी संबंधित व्यवसायांवर लक्ष केंद्रित करत आहे.

 

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड मुलभूत माहिती | Adani Enterprises Limited Fundamental Information

बाजार भांडवल (Market Capital)

३१४,८०५ कोटी

दर्शनी मूल्य (Face Value)

पीई रेशो

२६३.४६

लाभांश उत्पन्न (Dividend Yield)

०.०४ %

प्राइस टू बुक व्हॅल्यू (Book Value Per Share)

२२८.२४

५२ आठवड्यातील High किंमत (52 Week High)

,१९०.००

५२ आठवड्यातील Low किंमत (52 Week Low)

,५२८.८०

ROE (Return on Equity)

४.१२ %

ROCE ( Return on Capital Employed)

७.२८%

 

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीची एकत्रित आर्थिक माहिती | Adani Enterprises Limited Company Financials (Consolidated)

 

३१ मार्च २०२०

३१ मार्च २०२१ ३० सप्टेंबर २०२१ ३१ मार्च २०२२

३० सप्टेंबर २०२२

एकूण मालमत्ता

(Total Assets)

४६८९८.३६

५१६४२.८६ ८२३२४.६८ १०१७६०.१९

१२३०९१.२८

एकूण महसूल

(Total Revenue)

४४०८६.२१

४०२९०.९३ २६३२७.७३ ७०४३२.६९

७९५०७.८९

एकूण नफा

(कर वगळता) (Profit After Tax)

१०३९.९९

१०४५.७६ ४६०.१४ ७८७.७

९०१.०४

निव्वळ संपत्ती

(Net Worth)

१८२०९.९४

१८९१०.०१ २३१७६.२८ २६९२८.३७

३६१७६.४

एकूण कर्ज

(Total Borrowing)

१२६०४.९१

१६०५१.४२ ३२१८९.६२ ४१०२३.७७

४००२३.५

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे प्रमोटर्स | Promoters of Adani Enterprises Limited Company

गौतम एस अदानी आणि राजेश एस अदानी हे कंपनीचे प्रमोटर्स(Promoters) आहेत.

 

 

** सदर एफपीओ काही कारणास्तव, १ फेब्रुवारी २०२३ रोजी कंपनीने रद्द केला आहे. परंतु या लेखात एफपीओ बद्दल माहिती वाचकांसाठी उपलब्द आहे. म्हणून हि पोस्ट वाचकांच्या आग्रहास्तव डिलीट केली नाही आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करु शकता.

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड

1 thought on “अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड एफपीओ संपूर्ण माहिती – जानेवारी २०२२ | Adani Enterprises Limited FPO Full Details”

Leave a Comment