एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Apeejay Surrendra Park Hotels Limited IPO Review in Marathi

 

२०२४ ह्या वर्षातील, Hospitality सेक्टर मधील कंपनी पहिल्यांदा लिस्ट होत आहे. Apeejay Surrendra Park Hotels Limited असे या कंपनीचे नाव आहे. Apeejay Surrendra Park Hotels Limited IPO ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्द असणार आहे. चला तर पाहूया आयपीओची संपूर्ण माहिती.

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती
एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती

Table of Contents

कंपनीचे आजचे ग्रे मार्केट:

कंपनीच्या ग्रे मार्केट चा आजचा प्रीमिअम शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ६५ रु. प्रती शेअर आहे. आणि ९६ शेअर्सच्या लॉट साईझ नुसार ६५ * ९६ = ६,२४० रुपयांचा profit पाहायला मिळत आहे आणि सरासरीनुसार ४१% ने ग्रे मार्केटचा प्रिमिअम वाढला आहे ( ग्रे मार्केट demand नुसार कमी जास्त होत असतो )

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड कंपनीची माहिती | Apeejay Surrendra Park Hotels Limited company Information

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड कंपनी १ नोव्हेंबर १९६७ रोजी पार्क हॉटेल समूहातील १४९ खोल्या असलेले पहिले हॉटेल हे कोलकाता येथील फॅशनेबल पार्क स्ट्रीटवर सुरु झाले म्हणजेच ३६ वर्षे जुनी कंपनी आहे.

Apeejay Surrendra Park Hotels Limited (ASPHL) या कंपनीची भारतातील आठवी सर्वात मोठी हॉटेल साखळी आहे.

१ नोव्हेंबर १९६७ रोजी पार्क हॉटेल समूहातील १४९ खोल्या असलेले पहिले हॉटेल कोलकाता येथील फॅशनेबल पार्क स्ट्रीटवर सुरु झाले. त्याच्या पुढच्या वर्षी विशाखापट्टणम येथील THE Park समूहाचे दुसरे हॉटेल हे आंध्र प्रदेशातील पहिले डिलक्स हॉटेल बनले. नोव्हेंबर १९८७ मध्ये नवी दिल्ली येथे २२० खोल्या असलेले, २००० मध्ये बॅंगलोर येथे १०९ खोल्या असलेले, मे २००२ मध्ये चेन्नई येथे २१४ खोल्या असलेले, फेब्रुवारी २००७ मध्ये नवी मुंबई येथे, २०१० मध्ये हैद्राबाद येथे २७० खोल्या असलेले, २०११ मध्ये गोवा ३० खोल्या असलेले येथे आणि डिसेंबर २०२० मध्ये इंदोर येथे एक आकर्षक, आधुनिक आणि आकर्षक ९९ खोल्यांचे हॉटेल सुरू करण्यात आले.

कंपनीचे total ५ ब्रँड्स आहेत १. द पार्क (THE Park), २. द पार्क कलेक्शन (THE Park Collection), ३. झोन बाय द पार्क (Zone by The Park), ४. झोन कनेक्ट बाय द पार्क (Zone Connect by the Park आणि ५. स्टॉप बाय झोन (Stop by Zone).

Apeejay Surrendra Park Hotels Limited या कंपनीने भारतातील लक्झरी बुटीक हॉटेल्सची संकल्पना आपला ब्रँड, ‘द पार्क’ अंतर्गत, पार्क कलेक्शनद्वारे आणि आपल्या इतर ब्रँडद्वारे उच्च मध्यम स्तरावर विस्तारित केली.

३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनी ८० हॉटेल्स, night clubs, आणि बार चालवते. जे पर्यटक ( tourist) स्थळे आहेत अशा शहरात कंपनीचे प्रमुख हॉटेल्स आहेत. जसे सध्या बंगलोर, चेन्नई, गोवा, हैदराबाद, इंदूर, कोलकाता, मुंबई, नवी मुंबई, नवी दिल्ली आणि विशाखापट्टणम येथे आहेत आणि लवकरच चेट्टीनाड, पटियाला, पुणे आणि कोलकाता येथे सुरु होणार आहेत.

ASPHL चे पहिले हॉटेल कोलकाता येथील आयकॉनिक पार्क स्ट्रीट येथे पार्क या ब्रँड अंतर्गत सुरू करण्यात आले.

Apeejay Surrendra Park Hotels Limited हॉटेल सोबतच ‘फ्ल्युरीस’ या ब्रँडमार्फत कोलकाता येथील पार्क स्ट्रीट येथे अन्न आणि पेय उद्योगातही काम करते ज्याचा देशभरात ८० पेक्षा जास्त आउटलेट्समध्ये विस्तार झाला आहे.

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Apeejay Surrendra Park Hotels Limited IPO Availability of Shares

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ९२० कोटी रुपये असून त्यातील ६००.०० कोटी Fresh Issue आहेत आणि ३२० कोटी शेअर्स Offer for Sale द्वारे विक्रीसाठी उपलब्द आहे.

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Apeejay Surrendra Park Hotels Limited IPO Share Price and Lot Size

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १ रुपये प्रती शेअर आहे.

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत १४७ रुपये आणि कमाल (maximum) किंमत १५५ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार १४७ ते १५५ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ९६ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ९६ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १४७*९६ = १४,११२ रुपये ते  १५५*९६=१४,८८० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (९६ शेअर्स) म्हणजेच १४,८८० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (१२४८ शेअर्स) म्हणजेच १,९३,४४० रुपये इतकी आहे.

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड आयपीओची तारीख | Apeejay Surrendra Park Hotels Limited IPO Date

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड आयपीओ सोमवार, ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला होणार असून अखेरची तारीख बुधवार, ७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

आयपीओ अलोटमेंट तारीख गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम शुक्रवार, ९ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच शुक्रवार, ९ फेब्रुवारी २०२४  रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ९६ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Apeejay Surrendra Park Hotels Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) ५६.३६
Debt/Equity ०.९९
EPS २.७५

 

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Apeejay Surrendra Park Hotels Limited company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३० सप्टेंबर २०२३
एकूण मालमत्ता
(Total Assets)
१,२८०.३४ १,२७५.१८ १,३६१.७९ १,३८२.५१
एकूण महसूल
(Total Revenue)
१९०.२९ २६७.८३ ५२४.४३ २७२.३१
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
-७५.८८ -२८.२० ४८.०६ २२.९५
Net Worth
(एकूण मालमत्ता)
५३६.२८ ५०८.५१ ५५५.६८ ५७८.७१
Total Borrowing
(एकूण कर्ज)
५९३.४४ ६२२.६८ ५६६.८८ ५९७.०९

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड कंपनीचे प्रमोटर्स | Promoters of Apeejay Surrendra Park Hotels Limited Company

करण पॉल, प्रिया पॉल, Apeejay Surrendra Trust आणि Great Eastern Stores हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत.

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.theparkhotels.com/

Apeejay IPO

दिवंगत सुरेंद्र पॉल यांचे पुत्र श्री. करण पॉल हे Apeejay ग्रुपचे अध्यक्ष आहेत.
Apeejay Surrendra Park Hotels IPO, ५ फेब्रुवारी २०२४ पासून ७ फेब्रुवारी २०२४ या तारखेपर्यंत खरेदीसाठी उपलब्द आहे
अपीजे ग्रुपची एकूण नेटवर्थ सध्या 6,000 कोटींहून अधिक आहे.
शेअर्सची किंमत १४७-१५५/- रुपये आहे Apeejay Surrendra Park Hotels ltd. या कंपनीचा Face Value १ रुपये प्रती शेअर असून ९२० कोटी इनिशियल पब्लिक ऑफरिंगद्वारे (IPO) उघडण्याची घोषणा केली आहे.

 

1 thought on “एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Apeejay Surrendra Park Hotels Limited IPO Review in Marathi”

Leave a Comment