बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती | BLS E-Services Limited IPO review in Marathi

बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती आज आपण या लेखात पहाणार आहोत. कंपनीचे आजचे ग्रे मार्केट पाहून शेअर्समध्ये Non stop खरेदी होत आहे, Demand खूपच जास्त आहे याचा अंदाज लावता येतोय.  ६० रुपयांपासून ग्रे मार्केटची सुरुवात झाली आहे आणि ती आज १५५ झाली आहे. ग्रे मार्केटमध्ये शेअर्स ची price ३ पटीने वाढत आहे. शिवाय  हि कंपनी Fundamentally आणि technically खूप strong आहे. बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओ ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत मार्केट मध्ये उपलब्द असणार आहे. चला तर मग बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओचा Review पाहूया.

BLS E-Services Limited IPO
BLS E-Services Limited IPO

 

कंपनीचे आजचे ग्रे मार्केट:

कंपनीच्या ग्रे मार्केट चा आजचा प्रीमिअम १५५ रु. प्रती शेअर आहे. आणि १०८ शेअर्सच्या लॉट साईझ नुसार १५५ * १०८ = १६,७४० रुपयांचा profit पाहायला मिळत आहे ( ग्रे मार्केट demand नुसार कमी जास्त होत असतो ). सरासरीनुसार ११३% profit प्रती लॉट मिळू शकतो. यावरून शेअर्सची मागणी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.

बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची माहिती | BLS E-Services Limited company Information

बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी हि २०१६ साली  न्यू दिल्ली येथे स्थापन झाली असून २०२२ मध्ये या कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून पब्लिक लिमिटेड कंपनीत रुपांतरण झाले आहे म्हणजेच बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे तिच्या सेक्टरमध्ये ७ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव आहे.

BLS E-Services Limited हि कंपनी बीएलएस इंटरनॅशनल सर्विस लिमिटेड (BLS International Services) या कंपनीची उपकंपनी आहे जी मूळतः मार्केट मध्ये उपलब्द आहे ज्याची आजची किंमत ४०३ रु. आहे आणि खूप चांगला profit गुंतवणूकदारांना दिला आहे.

BLS E-Services Limited हि कंपनी E-सेर्विसेस देते. BLS ई-सर्व्हिसेस लिमिटेड आणि तिच्या उपकंपन्या भारतातील प्रमुख बँकांना बिझनेस करस्पॉन्डंट सेवा आणि भारतातील 28 राज्यांमध्ये तळागाळातील नागरिकांना इतर मूल्यवर्धित सेवा आणि भारतातील ५ राज्यांना ई-गव्हर्नन्स सेवा पुरविते.

कंपनीचा व्यवसाय (i) ई-गव्हर्नन्स सेवा (E-Governance Services), (ii) व्यवसाय वार्ताहर सेवा (Business Correspondents Services), आणि (iii) मूल्यवर्धित सेवा (Value Added Services) या तीन प्राथमिक व्यवसाय विभागांमध्ये विभाजित केला आहे. कंपनीचे व्यवसाय विभागातील प्रमुख स्टेकहोल्डर हे व्यापारी आहेत, त्यांच्यासोबत कंपनी उत्पादने आणि सेवा नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सहयोग करते.

कंपनी तिच्या व्यापाऱ्यांमार्फत विविध माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (“ICT”) आणि सक्षम नागरिक केंद्रित सेवा (“ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस”) प्रदान करून भारतातील राज्य सरकारांच्या विविध ई-गव्हर्नन्स उपक्रमांचे वितरण सुलभ करतो, ज्यांना BLS टचपॉइंट म्हणूनही ओळखले जाते यामध्ये बचत खाते चालू करणे (opening savings), आवर्ती ठेव खाती उघडणे ( recurring deposit accounts ), रोख ठेवी (cash deposits), पैसे काढणे (withdrawals), प्रेषण (remittance), transfer, bill collection services त्याचबरोबर लोकांना बँकिंग उत्पादने आणि सेवा बँकांच्या वतीने प्रदान करण्यासाठी व्यवसाय प्रतिनिधी (“Business Correspondents”) म्हणून देखील कार्य करते.

कंपनी बीएलएस टचपॉइंट्सद्वारे ग्राहकांना पीओएस सेवा, तिकीट सेवा, सहाय्यक ई-कॉमर्स सेवा देण्याचेसुद्धा काम करते ज्याची मागणी कायम वाढत असते.

कंपनी ग्रामीण आणि दुर्गम भागात अत्यावश्यक सार्वजनिक उपयोगिता सेवा, सामाजिक कल्याण योजना, आरोग्य सेवा, आर्थिक, शैक्षणिक, कृषी आणि बँकिंग सेवा सरकार (G2C) आणि व्यवसाय (B2B) सारख्याच शहरी, निमशहरी भागातील नागरिकांना B2C सेवा पुरवण्यासाठी मदत करते.

कंपनी जेथे लोकांना इंटरनेटचा वापर करणे गैरसोईचे असते आणि आणि नागरिकांना मूलभूत तंत्रज्ञान सेवांचा लाभ घेण्यासाठी मदतीची आवश्यकता असते अशा निम-शहरी, ग्रामीण भागात G2C, B2C, B2B श्रेणींमध्ये डिजिटल आणि भौतिक उत्पादने आणि सेवा प्रदान करते.

बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची उपलब्धता | BLS E-Services Limited IPO Availability of Shares

बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ३१०.९१ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या २,३०,३०,००० इतकी आहे. विक्रीसाठी असलेले सगळेच शेअर्स फ्रेश इश्शु आहेत.

बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | BLS E-Services Limited IPO Share Price and Lot Size

बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर आहे.

बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत १२९ रुपये आणि कमाल (maximum) किंमत १३५ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार १२९ ते १३५ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि १०८ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच १०८ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १२९ x १०८ = १३,९३२ रुपये ते  १३५ x १०८=१४,५८० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (१०८ शेअर्स) म्हणजेच १३,९३२ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (१४०४ शेअर्स) म्हणजेच १,८९,५४० रुपये इतकी आहे.

बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची तारीख | BLS E-Services Limited IPO Date

बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओ ३० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला होणार असून अखेरची तारीख १ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

आयपीओ अलोटमेंट तारीख २ फेब्रुवारी २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम ५ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच ५ फेब्रुवारी २०२४  रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे १०८ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि ६ फेब्रुवारी २०२४ रोजी बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | BLS E-Services Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) ४४.३१
इक्विटीवरील रिटर्न (ROE)  ३३.३३ %
ROCE ३०.६२ %
Debt/Equity ०.०५
EPS ३.०५

 

बीएलएस ई-सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | BLS E-Services Limited company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३० सप्टेंबर २०२३
एकूण मालमत्ता
(Total Assets)
४०.५९ ५५.९३ १७९.४७ २१३.७७
एकूण महसूल
(Total Revenue)
६५.२३ ९८.४० २४६.२९ १५८.०५
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
३.१५ ५.३८ २०.३३ १४.६८
Net Worth
(एकूण मालमत्ता)
९.६८ १५.०७ १०६.९४ १२०.३७
Total Borrowing
(एकूण कर्ज)
११.०२ ८.७६ ०.०० ०.००

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.blseservices.com/

Leave a Comment