ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Brainbees Solutions Limited IPO Review in Marathi

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड ( Firstcry ) या कंपनीचा आयपीओ ६ ऑगस्ट २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी ओपन झाला आहे आणि आज ८ ऑगस्ट २०२४ रोजी बंद होईल तर जाणुया ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड (firstcry) आयपीओची संपूर्ण माहिती मराठीमध्ये.

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड (firstcry) ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड (firstcry) कंपनीची माहिती | Brainbees Solutions Limited company Information

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड हि कंपनी २०१० मध्ये स्थापन झाली असून आई आणि १२ वर्षाखालील मुलांसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनांची विक्री करते.

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड (firstcry) आयपीओची उपलब्धता | Brainbees Solutions Limited IPO Availability of Shares

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ४,१९३.७३ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या सुमारे ९,०१,८७,६९० इतकी आहे त्यातील १,६६६ कोटी रुपयांचे ३,५८,२७,९५७ शेअर्स Fresh Issue आहेत आणि २,५२७.७३ कोटी रुपयांचे ५,४३,५९,७३३ शेअर्स ऑफर फॉर सेल आहेत.

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड (firstcry) आयपीओची किंमत आणि लॉट साईझ |  Brainbees Solutions Limited Company Share Price and IPO Lot Size

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड (firstcry) आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि २ रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड (firstcry)  आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ४४० रुपये आणि कमाल (maximum) किंमत ४६५ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ४४० ते ४६५ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.) कंपनीच्या कर्मचारी वर्गासाठी कंपनीने special ४४ रुपयांचे प्रती शेअर्स सवलत देण्यात आली आहे.

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ३२ शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ३२ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ४४०*३२ = १४,०८० रुपये ते  ४६५*३२=१४,८८० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (३२ शेअर्स) म्हणजेच १४,८८० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (४१६ शेअर्स) म्हणजेच १,९३,४४० रुपये इतकी आहे.

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड (firstcry) आयपीओची तारीख | Brainbees Solutions Limited IPO Date

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड (firstcry) आयपीओ मंगळवार, ६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला  असून अखेरची तारीख गुरुवार, ८ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड (firstcry)  आयपीओ अलोटमेंट तारीख शुक्रवार, ९ ऑगस्ट २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम सोमवार, १२ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच सोमवार, १२ ऑगस्ट  २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ३२ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि मंगळवार, १३ ऑगस्ट २०२४ रोजी मुक्का प्रोटीन्स लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड (firstcry) कंपनीची मुलभूत माहिती | Brainbees Solutions Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) -६९.९१
EPS -६.६५

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड (firstcry) कंपनीची आर्थिक माहिती | Brainbees Solutions Limited company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३१ मार्च २०२४
एकूण मालमत्ता
(Total Assets)
६,१९७.१६ ७,११९.८३ ७,५१०.३८
एकूण महसूल
(Total Revenue)
२,५१६.९२ ५,७३१.२८ ६,५७५.०८
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
-७८.६९ -४८६.०६ -३२१.५१
Net Worth
(एकूण मालमत्ता)
३,५२७.९४ ३,४५६.२६ ३,१७०.७४
Total Borrowing
(एकूण कर्ज)
९०.१६ १७६.४७ ४६२.७२

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

 

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.firstcry.com/

Leave a Comment