ईपॅक ड्यूरेबल आयपीओची संपूर्ण माहिती | EPACK Durable IPO marathi review

या लेखात आज आपण २०२४ मधील तिसऱ्या आयपीओची म्हणजेच ईपॅक ड्यूरेबल आयपीओची संपूर्ण माहिती पहाणार आहोत जो आज म्हणजेच १९ जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४ पर्यंत शेअर बाजारात उपलब्द असेल. यात ईपॅक ड्यूरेबल कंपनीची माहिती, तिचे Financial Status, Fundamental Status, IPO Details, GMP याबाबत मराठी Review पहाणार आहोत.

ईपॅक ड्यूरेबल लिमिटेड कंपनीची माहिती | EPACK Durable Limited company Information

ईपॅक ड्यूरेबल लिमिटेड हि कंपनी रूम एअर कंडिशनर्स manufacture करते मग त्यात INDOOR UNIT (IDU), OUTDOOR UNIT (ODU), WINDOW AIR CONDITIONER (WAC) यांचा समावेश आहे. या unit साठी लागणारे parts ती स्वतः manufacture करते यासोबत काही लहान घरगुती उपकरणे सुद्धा manufacture करते. Voltas, Daikin, blue star, Havells यासारख्या मोठमोठ्या कंपनी या EPACK Durable कंपनीचे AC साठी customer आहेत म्हणजेच client base या कंपनीचा चांगला आहे. आर्थिक २०२३ मध्ये इनडोअर युनिट्स आणि आउटडोअर युनिट्स बनविणाऱ्या संख्येनुसार AC manufacture करणारी भारतातील दुसरी कंपनी बनली आहे.

EPACK Durable
EPACK Durable

 

सतत नावीन्य आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करून ग्राहकांच्या विविध गरजांनुसार उत्पादने manufacture करते.

कंपनी संपूर्ण आरएसी, इंडक्शन कुकटॉप, मिक्सर-ग्राइंडर,  वॉटर डिस्पेंसर यांचे डिझाइन, develop आणि manufacture करते.

वेगवेगळ्या client च्या गरजांनुसार customisation करणे हे या कंपनीचे वैशिष्ट आहे.

हीट एक्सचेंजर्स, कॉपर टयूबिंग, पीसीबीए इत्यादी critical component सुद्धा manufacture करते.

EPACK Durable IPO Full Details
EPACK Durable IPO Full Details

ईपॅक ड्यूरेबल लिमिटेड आयपीओची उपलब्धता | EPACK Durable Limited IPO Availability of Shares

ईपॅक ड्यूरेबल लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ६४०.०५ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या २,७८,२८,३५१ इतकी आहे त्यातील ४०० कोटी रुपयांचे म्हणजेच १,७३,९१,३०४ शेअर्स Fresh issue आहेत आणि २४०.०५ कोटी रुपयांचे म्हणजेच १,०४,३७,०४७ शेअर्स Offer for sale आहेत.

शेअर्सची उपलब्धता पुढीलप्रमाणे विभाजित करण्यात आली आहे.

शेअर्सची उपलब्धता विभाजित प्रमाण
मोठ्या संस्था (क्वालिफाइड इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स)
(Qualified Institutional Investors)
नेट ऑफरच्या ५०% पेक्षा जास्त नाही
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स
(Non-Institutional Investors)
नेट ऑफरच्या १५% पेक्षा कमी नाही
किरकोळ गुंतवणूकदार
(रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)
नेट ऑफरच्या ३५% पेक्षा कमी नाही

 

ईपॅक ड्यूरेबल लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | EPACK Durable IPO Share Price and Lot Size

ईपॅक ड्यूरेबल लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर आहे.

या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत २१८ रुपये आणि कमाल (maximum) किंमत २३० रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार २१८ ते २३० मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ६५ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ६५ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि २१८*६५ = १४,१७० रुपये ते  २३०*६५=१४,९५० रुपये इतकी आहे.

cut off किमतीनुसार गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (६५ शेअर्स) म्हणजेच १४,९५० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (८४५ शेअर्स) म्हणजेच १,९४,३५० रुपये इतकी आहे.

ईपॅक ड्यूरेबल लिमिटेड आयपीओची तारीख | EPACK Durable IPO Date

(* २२ जानेवारीच्या सुट्टीमुळे IPO च्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत आणि ते बदल पुढीलप्रमाणे असतील.)

ईपॅक ड्यूरेबल लिमिटेड आयपीओ १९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला होणार असून अखेरची तारीख २४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. (२० जानेवारी आणि २१ जानेवारी शनिवार आणि रविवार मार्केट बंद राहील)

आयपीओ अलोटमेंट तारीख २५ जानेवारी २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम २९ जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर २९ जानेवारी २०२४  रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ६५ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि ३० जानेवारी २०२४ रोजी ईपॅक ड्यूरेबल आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

 

ईपॅक ड्यूरेबल लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | EPACK Durable Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) ५६.४
इक्विटीवरील रिटर्न (ROE)  १४.६८ %
ROCE ११.८५ %
Debt/Equity १.५८
EPS ४.०८

 

ईपॅक ड्यूरेबल लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | EPACK Durable Limited company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३० सप्टेंबर २०२३
एकूण मालमत्ता
(Total Assets)
५२०.३७ १,०७६.६८ १,४६४.१६ १,०७१.४५
एकूण महसूल
(Total Revenue)
७३९.६६ ९२७.३४ १,५४०.२५ ६१६.३२
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
७.८० १७.४३ ३१.९७ २.६५
Net Worth
(एकूण मालमत्ता)
६८.९१ १२१.८७ ३१३.६२ ४७८.३१
Total Borrowing
(एकूण कर्ज)
२३८.५६ ३८३.९८ ४९२.४५ ३६९.५७

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

 

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://epackdurable.com/

Leave a Comment