GPT Healthcare Limited IPO २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला आहे आणि आज २६ फेब्रुवारी २०२४ रोजी बंद होईल तर जाणुया जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती.
GPT हेल्थकेअर लिमिटेड ही GPT ग्रुपची हेल्थकेअर शाखा आहे, जी ILS हॉस्पिटल्स ब्रँड अंतर्गत, पूर्व (Eastern) भारतातील मल्टीस्पेशालिटी शेजारच्या तृतीय सेवा रुग्णालयांची मालकी आणि संचालन करते.
GPT हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.
जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड कंपनीची माहिती | GPT Healthcare Limited company Information
ILS हॉस्पिटल्स हे मल्टिस्पेशालिटी शेजारचे तृतीयक केअर हॉस्पिटल आहे, ज्याची स्थापना GPT ग्रुपने जुलै 2000 मध्ये केली होती आणि त्याचे नेतृत्व डॉ. ओम टांटिया, हे देशातील एक प्रख्यात सर्जन आहेत.
हे पूर्व भारतातील एक अग्रगण्य आरोग्य सेवा ब्रँड म्हणून ओळखले जाणारे ILS रुग्णालयांपैकी एक आहे. सध्या 4 रुग्णालये पूर्व भारतातील सॉल्ट लेक (कोलकाता), आगरतळा (त्रिपुरा), दम दम (कोलकाता) आणि हावडा येथे आहेत.
याशिवाय, त्रिपुरातील रहिवाशांसाठी ILS रुग्णालयामार्फत त्यांच्या आगरतळा रुग्णालयात ४० सीटचे GNM नर्सिंग स्कूल आणि ४० सीटचे B.Sc सह नर्सिंग कॉलेज आहे.
जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड आयपीओची उपलब्धता | GPT Healthcare Limited IPO Availability of Shares
जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ५२५.१४ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या सुमारे २,८२,३३,३२३ आहे त्यापैकी कंपनीचे ४० कोटींचे शेअर्स म्हणजेच सुमारे २१५०५३७ शेअर्स Fresh Issue आहेत आणि ४८५.१४ कोटींचे शेअर्स म्हणजेच सुमारे २,६०,८२,७८६ शेअर्स ऑफर फॉर सेल आहेत.
जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | GPT Healthcare Limited IPO Share Price and Lot Size
जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.
जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत १७७ रुपये आणि कमाल (maximum) किंमत १८६ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार १७७ ते १८६ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)
या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ८० शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ८० शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १७७*८० = १४,१६० रुपये ते १८६*८०=१४,८०० रुपये इतकी आहे.
गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (८० शेअर्स) म्हणजेच १४,८०० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (१०४० शेअर्स) म्हणजेच १,९३,४४० रुपये इतकी आहे.
जीपीटीहेल्थकेअरलिमिटेड आयपीओची तारीख | GPT Healthcare Limited IPO Date
जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड आयपीओ गुरुवार, २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला असून अखेरची तारीख सोमवार, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस (शनिवार आणि रविवार वगळता) आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम बुधवार, २८ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच बुधवार, २८ फेब्रुवारी २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ८० शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ रोजी जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.gptgroup.co.in/gpt-healthcare/