इंटरार्च बिल्डींग प्रोडक्ट लिमिटेड कंपनीचा आयपीओ १९ ऑगस्ट २०२४ रोजी शेअर बाजारात दाखल होणार असून आयपीओच्या माध्यमातून कंपनी ६००.२९ कोटी रुपये भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
इंटरार्च बिल्डींग प्रोडक्ट लिमिटेड आयपीओ एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.
सगळ्यात अगोदर आपण आयपीओबद्दल माहिती पाहूया.
इंटरार्च बिल्डींग प्रोडक्ट लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Interarch Building Products Limited IPO Availability of Shares
Interarch Building Products Limited आयपीओची एकूण किंमत ६००.२९ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या ६६६९८५२ आहे त्यातील २०० कोटी रुपयांचे २२२२२२२ शेअर्स फ्रेश इश्शु (Fresh Issue) आहेत आणि ४००.२९ कोटी रुपयांचे ४४४७६३० शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale) आहेत.
इंटरार्च बिल्डींग प्रोडक्ट लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Interarch Building Products Limited IPO Share Price and Lot Size
इंटरार्च बिल्डींग प्रोडक्ट लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर आहे.
Interarch Building Products Ltd. कंपनीच्या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ८५० रुपये आणि कमाल (maximum) किंमत ९०० रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ८५० ते ९०० मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात ( महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO किंवा एफपीओ मिळण्याचे chances वाढतात.)
या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि १६ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच १६ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ८५०*१६= १३,६००० रुपये ते ९००*१६=१४,४०० रुपये इतकी आहे.
गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (१६ शेअर्स) म्हणजेच १४,४०० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची (२०८शेअर्स) म्हणजेच १,८७,२०० रुपये इतकी असेल
.
इंटरार्च बिल्डींग प्रोडक्ट लिमिटेड आयपीओची तारीख | Interarch Building Products Limited IPO Date
इंटरार्च बिल्डींग प्रोडक्ट लिमिटेड आयपीओ हा रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच सोमवार, १९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला होणार असून अखेरची तारीख बुधवार, २१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
आयपीओ अलोटमेंट तारीख गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम शुक्रवार, २३ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर शुक्रवार, २३ ऑगस्ट २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे १६ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ रोजी इंटरार्च बिल्डींग प्रोडक्ट लिमिटेड या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.saraswatisareedepot.com/home