जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती आज आपण मराठीतून पाहणार आहोत. जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.
कंपनीचे आजचे ग्रे मार्केट:
कंपनीच्या ग्रे मार्केटचा आजचा प्रीमिअम मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लागोपाठ ३ दिवस continue कमी होत आहे. १०८ वरून ग्रे मार्केट प्रीमिअम ६६ रु. प्रती शेअर वर आले आहे आणि ३६ शेअर्सच्या लॉट साईझ नुसार ६६ * ३६ = २,३७६ रुपयांचा profit पाहायला मिळत आहे आणि सरासरीनुसार १५% चा ग्रे मार्केटचा प्रिमिअम आहे ( ग्रे मार्केट demand नुसार कमी जास्त होत असतो ).
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडची माहिती | Jana Small Finance Bank Limited Information
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड हि कंपनी जून २००६ मध्ये स्थापन झाली असून non-banking finance कंपनी आहे. हि कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज देण्याचे काम करते. त्यात secure लोन म्हणजेच गृह कर्ज, टर्म लोन, fixed deposit वर लोन, दोन चाकी गाड्यांसाठी लोन, सोनेतारण देते त्याचबरोबर अनेक लहान मोठे व्यवसाय, शेतीसाठी सुद्धा कंपनी लोन provide करते.
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Jana Small Finance Bank Limited IPO Availability of Shares
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ५७० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या १,३७,६८,०४९ आहे आणि त्यातील ४६२ कोटी रुपयांचे १,११,५९,४२० शेअर्स Fresh Issue असून १०८ कोटी रुपयांचे २६०८६२९ शेअर्स ऑफर फॉर सेल आहेत.
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Jana Small Finance Bank Limited IPO Share Price and Lot Size
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर आहे. कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ३९३ रुपये आणि कमाल (maximum) किंमत ४१४ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ३९३ ते ४१४ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)
या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ३६ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ३६ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ३९३*३६ = १४,१४८ रुपये ते ४१४*३६=१४,९०४ रुपये इतकी आहे.
गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (३६ शेअर्स) म्हणजेच १४,९०४ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (४६८ शेअर्स) म्हणजेच १,९३,७५२ रुपये इतकी आहे.
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आयपीओची तारीख | Jana Small Finance Bank Limited IPO Date
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आयपीओ बुधवार, ७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला होणार असून अखेरची तारीख शुक्रवार, ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम मंगळवार, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच मंगळवार, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ३६ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि बुधवार, १४ फेब्रुवारी २०२४ रोजी जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Jana Small Finance Bank Limited Fundamental Information
पीई रेशो P/E (x) | १५.११ |
इक्विटीवरील रिटर्न (ROE) | १६.७८ % |
ROCE | १४ % |
Debt/Equity | ३.४९ |
EPS | २७.४ |
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Jana Small Finance Bank Limited company Financials (Consolidated) Information
३१ मार्च २०२१ | ३१ मार्च २०२२ | ३१ मार्च २०२३ | ३० सप्टेंबर २०२३ | |
एकूण मालमत्ता (Total Assets) |
१९,०७८.६६ | २०,१८८.७१ | २५,६४३.६९ | २८,१०५.८७ |
एकूण महसूल (Total Revenue) |
२,७२०.७४ | ३,०६२.३७ | ३,६९९.८८ | २,२१५.५७ |
Profit After Tax (करानंतरचा नफा) |
७२.२६ | १७.४७ | २५५.९७ | २१३.२२ |
Net Worth (एकूण मालमत्ता) |
१,१००.७७ | १,१८४.५६ | १,७७७.०७ | २,५४७.११ |
Total Borrowing (एकूण कर्ज) |
४,८१५.३२ | ४,५०९.८३ | ६,२७७.४६ | ५,३१३.५४ |
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंपनीचे प्रमोटर्स | Promoters of Jana Small Finance Bank Limited Company
जना कॅपिटल लिमिटेड (जे जन अर्बन फाऊंडेशन आणि इतर गुंतवणूकदारांकडे आहे) आणि जना होल्डिंग्स लिमिटेड हे जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंपनीचे संचालक (Promoters) आहेत. जन अर्बन फाऊंडेशन, ज्याला पूर्वी जनलक्ष्मी सोशल सर्व्हिसेस म्हणून ओळखले जात होते.
अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.janabank.com/