जुनिपर हॉटेल्स लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Juniper Hotels IPO Review in Marathi

 

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड हि कंपनी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये अग्रगण्य लक्झरी हॉटेल डेव्हलपमेंट आणि ownership कंपनी म्हणून आघाडीवर आहे. या कंपनीचा आयपीओ २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत शेअर बाजारात खरेदीसाठी उपलब्द होणार आहे तर जाणुया जुनिपर हॉटेल्स लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती.

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.

हे पण वाचा: स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? | Stock Exchange in Marathi

Juniper Hotels IPO Review in Marathi
Juniper Hotels IPO Review in Marathi

 

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड कंपनीची माहिती | Juniper Hotels Information

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड कंपनी १९८५ साली स्थापन झाली असून ही एक लक्झरी हॉटेल डेव्हलपमेंट आणि ownership  कंपनी आहे.

३० सप्टेंबर २०२३ पर्यंत, कंपनी एकूण १,८३६ खोल्यांसह सात हॉटेल्स आणि सर्व्हिस अपार्टमेंट चालवते.

कंपनीचे लक्झरी, उच्च श्रेणीतील मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, लखनौ, रायपूर आणि हम्पी येथे हॉटेल्स आणि सर्व्हिस केलेले अपार्टमेंट्स आहेत.

ग्रँड हयात मुंबई हॉटेल आणि रेसिडेन्सेस’ हे भारतातील सर्वात मोठे लक्झरी हॉटेल आहे, तर ‘हयात रीजन्सी लखनऊ’ आणि ‘हयात रीजन्सी अहमदाबाद’ ही त्यांच्या संबंधित बाजारपेठांमधील सर्वात मोठी उच्च श्रेणीतील हॉटेल्स आहेत. आणि ‘हयात रायपूर’ हे रायपूरमधील एकमेव उच्च श्रेणीचे हॉटेल आहे.

३० सप्टेंबर २०२३ पर्यंत, कंपनीकडे ग्रँड हयात मुंबईमध्ये ११६ सर्व्हिस अपार्टमेंट आणि हयात दिल्लीमध्ये १२९ सर्व्हिस अपार्टमेंट आहेत.

कंपनीला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे ज्यात ‘अंदाज दिल्ली’साठी २०२२ मध्ये Today’s Traveller अवॉर्ड्समध्ये “दिल्लीतील सर्वोत्कृष्ट लक्झरी बिझनेस हॉटेल” आणि ‘हयात रीजेंसी अहमदाबाद’साठी २०२२ मध्ये गुजरात टुरिझम अवॉर्ड्समध्ये “गुजरातमधील सर्वोत्कृष्ट ५ स्टार हॉटेल” यांचा समावेश आहे.

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Juniper Hotels IPO Availability of Shares

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड आयपीओची एकूण किंमत १,८०० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या ५,००,००,००० आहे आणि कंपनीचे सगळेच शेअर्स Fresh Issue आहेत.

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Juniper Hotels IPO Share Price and Lot Size

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ३४२ रुपये आणि कमाल (maximum) किंमत ३६० रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ३४२ ते ३६० मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ४० शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ४० शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ३४२*४० = १३,६८० रुपये ते  ३६०*४०=१४,४०० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (४० शेअर्स) म्हणजेच १४,४०० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (५२० शेअर्स) म्हणजेच १,८७,२०० रुपये इतकी आहे.

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड आयपीओची तारीख | Juniper Hotels IPO Date

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड आयपीओ बुधवार, २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द होणार  असून अखेरची तारीख शुक्रवार, २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख सोमवार, २६ फेब्रुवारी २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ४० शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि बुधवार, २८ फेब्रुवारी २०२४ रोजी जुनिपर हॉटेल्स लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

जुनिपर हॉटेल्स लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Juniper Hotels company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३० सप्टेंबर २०२३
एकूण मालमत्ता
(Total Assets)
३,०५५.५४ ३,०६९.८६ ३,०२०.२७ ३,८३७.८३
एकूण महसूल
(Total Revenue)
१९२.८५ ३४३.७६ ७१७.२९ ३३७.४३
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
-१९९.४९ -१८८.०३ -१.५० -२६.५०
Net Worth
(एकूण मालमत्ता)
५४३.९० ३५६.३७ ३५४.५१ ८५९३६७
Total Borrowing
(एकूण कर्ज)
१,८३०.४८ २,१२१.८१ २,०४५.६१ २,२५२.७५

 

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://juniperhotels.com/

Leave a Comment