आज आपण २०२४ या नवीन वर्षातील पहिल्या आयपीओची माहिती पाहणार आहोत. या कंपनीचे नाव आहे ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओ जो ९ जानेवारी ते ११ जानेवारीपर्यंत मार्केट मध्ये उपलब्द असणार आहे. चला तर मग ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती पाहूया.
ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Jyoti CNC Automation IPO Availability of Shares
ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड आयपीओची एकूण किंमत १०००.०० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या ३,०२,११,४८० इतकी आहे.
शेअर्सची उपलब्धता पुढीलप्रमाणे विभाजित करण्यात आली आहे.
शेअर्सची उपलब्धता | विभाजित प्रमाण |
मोठ्या संस्था (क्वालिफाइड इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स) (Qualified Institutional Investors) |
ऑफरच्या ७५% पेक्षा कमी नाही |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) |
ऑफरच्या १५% पेक्षा जास्त नाही |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) |
ऑफरच्या १०% पेक्षा जास्त नाही |
ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Jyoti CNC Automation IPO Share Price and Lot Size
ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि २ रुपये प्रती शेअर आहे.
jyoti cnc automation या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ३१५ रुपये आणि कमाल (maximum) किंमत ३३१ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ३१५ ते ३३१ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)
या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ४५ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ४५ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ३१५*४५ = १४,१७५ रुपये ते ३३१*४५=१४,८९५ रुपये इतकी आहे.
गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (४५ शेअर्स) म्हणजेच १४,१७५ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (५८५ शेअर्स) म्हणजेच १,९३,६३५ रुपये इतकी आहे.
ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड आयपीओची तारीख | Jyoti CNC Automation IPO Date
ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड आयपीओ ९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला होणार असून अखेरची तारीख ११ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
आयपीओ अलोटमेंट तारीख १२ जानेवारी २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम १५ जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच १५ जानेवारी २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ४५ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि १६ जानेवारी २०२४ रोजी ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.
ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड कंपनीची माहिती | Jyoti CNC Automation Limited company Information
ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड कंपनी हि १९९१ मध्ये गुजरात मधील राजकोट येथे स्थापन झाली असून Automotive सेक्टर मधील ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव आहे. हि कंपनी CNC ( Computer Numerical Control) मशिनरी manufacturing आणि supply करते ज्या कॉम्पुटरनुसार oprate केल्या जातात. Computer मध्ये एकदा प्रोग्राम फिक्स केला कि automatic छोट्या धातूपासून ते मोठ्या धातूपर्यंत त्यांचे cutting करणे, त्यांना shape देण्याचे काम या machin करतात ज्या सगळ्याच सेक्टर मध्ये use केल्या जातात.
ISRO, BrahMos Aerospace, Airtech, alicon Cating The Future, Allengers, Ambuja Cement, Ashok Leyland, AVTEC, Bhabha Atomic Research Center, Bharat Dynamic Limited, Boyd Corporation, Bajaj Global Limited, BOSCH, Bharat Forge, Bemco, CSIR National Aerospace Laboratories, Defence Research and Development Organisation, Gun and Shell Factory Cossipore, Gun Carriage Factory, Godrej, Havells, Hindalco, Indian Railways, IFB Limited, Indian Oil, IPCL, JSW steel, L & T, Liquid Propulsion System Centre, Mahindra, NIT, NSIC, OFDC, Orbit Bearings India Pvt. Ltd., Rifle Factory Ishapore, SIEMENS, Solar Industries India, TATA, Titan, Yuken India Ltd. असे अनेक भारतामधील आणि भारताच्या बाहेरील देशातील clients आहेत.
या कंपनीचे total ३ manufacturing युनिट्स आहेत त्यातील २ युनिट्स राजकोट येथे तर १ युनिट भारताबाहेरील फ्रांस या देशात आहे. शेवटच्या तीन वर्षांमध्ये, भारत, युरोप, नॉर्थ अमेरिका आणि आशिया येथील ३००० हून जास्त customer ला ७२०० पेक्षा जास्त मशीन supply केल्या आहेत.
कंपनीने आतापर्यंत टीम वर्कच्या माध्यमातून कंपनीला तंत्रज्ञानाचे मंदिर बनवण्याच्या दृष्टीकोनातून मशीनसाठी गीअर बॉक्स तयार करण्यापासून ते त्यातील अचूकता विकसित करण्यापर्यंत अनेक पटींनी वाढ केली आहे.
प्रक्रियेत सातत्यपूर्ण सुधारणा आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे कंपनी भारत आणि जागतिक स्तरावर अनुक्रमे दुसऱ्या आणि बाराव्या क्रमांकाच्या CNC मशीनच्या जगातील आघाडीच्या उत्पादकांपैकी एक बनली आहे.
Automotive सेक्टर मधून कंपनीला ४६% तर Aerospace आणि Defence सेक्टरमधून २०% revenue कंपनी मिळवित आहे.
ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Jyoti CNC Automation Limited Fundamental Information
पीई रेशो P/E (x) | ३२४.५ |
इक्विटीवरील रिटर्न (ROE) | १८.३५ % |
ROCE | ९.५० % |
Debt/Equity | १०.१७ |
EPS | १.०२ |
ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Jyoti CNC Automation Limited company Financials (Consolidated) Information
३१ मार्च २०२१ | ३१ मार्च २०२२ | ३१ मार्च २०२३ | ३० सप्टेंबर २०२३ | |
एकूण मालमत्ता (Total Assets) |
१,३८८.१९ | १,२८६.२४ | १,५१५.३८ | १,७०६.०७ |
एकूण महसूल (Total Revenue) |
५९०.०९ | ७५०.०६ | ९५२.६० | ५१०.५३ |
Profit After Tax (करानंतरचा नफा) |
-७०.०३ | -४८.३० | १५.०६ | ३.३५ |
Net Worth (एकूण मालमत्ता) |
१८.६७ | -२९.६८ | ३६.२३ | २०५.६३ |
Total Borrowing (एकूण कर्ज) |
७२५.१२ | ७९२.१६ | ८३४.९७ | ८२१.४० |
* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)
ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड कंपनीचे प्रमोटर्स | Promoters of Jyoti CNC Automation Limited Company
श्री. पराक्रमसिंघ जडेजा आणि श्री. एस. एल. जडेजा हे ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड कंपनीचे प्रमोटर्स आहेत.
कंपनीचे आजचे ग्रे मार्केट (GMP):
कंपनीच्या ग्रे मार्केट चा आजचा प्रीमिअम १०० रु. प्रती शेअर आहे. आणि ४५ शेअर्सच्या लॉट साईझ नुसार १०० * ४५ = ४,५०० रुपयांचा profit पाहायला मिळत आहे. ( ग्रे मार्केट demand नुसार कमी जास्त होत असतो )
अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
jyoti.co.in