मेडी असिस्ट हेल्थकेयर आयपीओची संपूर्ण माहिती | Medi Assist IPO Details in Marathi

आज आपण मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर उपलब्द होणाऱ्या आणि २०२४ सालातील दुसऱ्या आयपीओची माहिती पाहणार आहोत. या कंपनीचे नाव आहे ‘मेडी असिस्ट’. या कंपनीचा आयपीओ १५ जानेवारी २०२४ ते १७ जानेवारी २०२४ पर्यंत मार्केट मध्ये उपलब्द असणार आहे. चला तर मग मेडी असिस्ट हेल्थकेअर सर्विसेस लिमिटेडच्या आयपीओचा Review पाहूया.

Medi Assist IPO
Medi Assist IPO

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओची उपलब्धता | Medi Assist Healthcare IPO Availability of Shares

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओची एकूण किंमत ११७१.५८ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या २,८०,२८,१६८ इतकी आहे.

मेडी असिस्ट शेअर्सची उपलब्धता पुढीलप्रमाणे विभाजित करण्यात आली आहे.

शेअर्सची उपलब्धता विभाजित प्रमाण
मोठ्या संस्था (क्वालिफाइड इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स)
(Qualified Institutional Investors)
नेट इशुच्या ५०% पेक्षा जास्त नाही
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स
(Non-Institutional Investors)
नेट इशुच्या 15% पेक्षा कमी नाही
किरकोळ गुंतवणूकदार
(रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors)
नेट इशुच्या ३५% पेक्षा कमी नाही

 

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Medi Assist Healthcare IPO Share Price and Lot Size

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि ५ रुपये प्रती शेअर आहे.

मेडी असिस्ट हेल्थकेअर या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ३९७ रुपये आणि कमाल (maximum) किंमत ४१८ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ३९७ ते ४१८ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ३५ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ३५ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक राहील.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ३९७ * ३५ = १३,८९५ रुपये ते  ४१८ * ३५ = १४,६३० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (३५ शेअर्स) म्हणजेच १३,८९५ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (४५५ शेअर्स ) म्हणजेच १९०१९० रुपये इतकी आहे.

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओची तारीख | Medi Assist Healthcare IPO Date date and Listing Date

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ १५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला होणार असून अखेरची तारीख १७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवसात आपण या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता.

आयपीओ अलोटमेंट तारीख १८ जानेवारी २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांना त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम १९ जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच १९ जानेवारी २०२४  रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ४५ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि १६ जानेवारी २०२४ रोजी मेडी असिस्ट हेल्थकेअर हा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीची मुलभूत माहिती | Medi Assist Healthcare Fundamental Information

मार्केट कॅपिटल २८७८.३२ कोटी
पीई रेशो P/E (x) ३८.२२
ROCE  २४.९५%
RONW १९.६३
EPS १०.९४

कंपनीचे आजचे ग्रे मार्केट (GMP):

कंपनीच्या ग्रे मार्केट चा आजचा प्रीमिअम ८१ वरून घसरून ३० रु. वर आले आहे. आणि ३५ शेअर्सच्या लॉट साईझ नुसार ३० * ३५ = १०५० रुपयांचा profit पाहायला मिळत आहे. ( ग्रे मार्केट demand नुसार कमी जास्त होत असतो )

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता

https://mediassist.in/

Leave a Comment