आज आपण २०२४ या वर्षातील चौथ्या आयपीओची माहिती पाहणार आहोत जो आज २३ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत खरेदीसाठी उपलब्द असेल. कंपनीचे नाव आहे ‘नोवा ॲग्रीटेक’. चला तर मग पाहूया Nova Agritech कंपनीची माहिती.
नोवा ॲग्रीटेक लिमिटेड कंपनीचे आजचे ग्रे मार्केट:
कंपनीच्या ग्रे मार्केट चा आजचा प्रीमिअम २० रु. प्रती शेअर आहे. आणि ३६५ शेअर्सच्या लॉट साईझ नुसार २० * ३६५ = ७३००/- रुपयांचा profit पाहायला मिळत आहे. ( ग्रे मार्केट demand नुसार कमी जास्त होत असतो ) म्हणजेच सरासरीनुसार प्रती शेअर मध्ये ४८% profit पहायला मिळत आहे.
नोवा ॲग्रीटेक लिमिटेड कंपनीची माहिती | Nova Agritech Limited company Information
नोवा ॲग्रीटेक लिमिटेड हि कंपनी ९ मे २००७ रोजी आंध्रप्रदेश मधील हैद्राबाद येथे स्थापन झाली आहे. म्हणजेच स्वतःच्या सेक्टर मध्ये १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव आहे. कंपनी कृषी उत्पादक क्षेत्रातील (Agriculture sector) उत्पादने बनविते. कंपनी प्रामुख्याने पुढील तीन प्रकारचे उत्पादने बनविते १. मातीचे आरोग्य वाढविणारे खत (soil health management), २. पिकाचे पोषण वाढविणारे खत (crop nutrition) आणि ३. पीक संरक्षण करणारे उत्पादक (crop protection products).
कंपनी संशोधन आणि विकासावर आधारित पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ आणि पौष्टिकदृष्ट्या संतुलित उत्पादने बनवून शेतकऱ्यांचे समाधान करण्यावर भर देते.
कंपनीने एकूण ६२९ उत्पादनांची नोंद केली आहे ज्यामध्ये ७ नोंदणी मातीचे आरोग्य वाढविणारे उत्पादने, १६८ नोंदणी पिकांचे पोषण वाढविणारे उत्पादने, ४ नोंदणी जैव कीटकनाशक उत्पादने आणि ४५० नोंदणी पिकांचे संरक्षण वाढविणारे उत्पादने यांचा समावेश होतो. तसेच अजूनही पुढे नोवा ॲग्रीसायन्स प्रायव्हेट लिमिटेड (NASPL) च्या नावाने ५३ विविध उत्पादने आणि नोवा ॲग्रीटेक लिमिटेड (NATL) च्या नावाने २६ नवीन नोंदणीसाठी अर्ज केले आहेत.
नोवा ॲग्रीटेक लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Nova Agritech Limited IPO Availability of Shares
नोवा ॲग्रीटेक लिमिटेड आयपीओची एकूण किंमत १४३.८१ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या ३,५०,७५,६९३ इतकी आहे त्यातील २,७३,१७,०७३ शेअर्स Fresh Issue आणि ७७,५८,६२० शेअर्स ऑफर फॉर सेल म्हणून विक्रिसाठी उपलब्द आहेत.
नोवा ॲग्रीटेक लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Nova Agritech Limited IPO Share Price and Lot Size
नोवा ॲग्रीटेक लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि २ रुपये प्रती शेअर आहे.
नोवा ॲग्रीटेक लिमिटेड हा आयपीओ बुक बिल्ड इश्श्यू टाईप आहे. या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ३९ रुपये आणि कमाल (maximum) किंमत ४१ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ३९ ते ४१ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)
या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ३६५ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ३६५ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ३९*३६५ = १४,२३५ रुपये ते ४१*३६५=१४,९६५ रुपये इतकी आहे.
कमाल किमतीनुसार, गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (३६५ शेअर्स) म्हणजेच १४,९६५ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (४,७४५ शेअर्स) म्हणजेच १,९४,५४५ रुपये इतकी आहे.
नोवा ॲग्रीटेक लिमिटेड आयपीओची तारीख | Nova Agritech Limited IPO Date
Nova Agritech Limited IPO २३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला होणार असून अखेरची तारीख २५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
आयपीओ अलोटमेंट तारीख २९ जानेवारी २०२४ आहे. ज्या इन्वेस्टर्सना आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम ३० जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच ३० जानेवारी २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ३६५ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि ३१ जानेवारी २०२४ रोजी Nova Agritech Limited IPO शेअर बाजारात लिस्ट होईल.
नोवा ॲग्रीटेक लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Nova Agritech Limited Fundamental Information
पीई रेशो P/E (x) | १३.०५ |
इक्विटीवरील रिटर्न (ROE) | ३८.२७ % |
ROCE | २७.२५ % |
Debt/Equity | १.११ |
EPS | ३.१४ |
नोवा ॲग्रीटेक लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Nova Agritech Limited company Financials (Consolidated) Information
३१ मार्च २०२१ | ३१ मार्च २०२२ | ३१ मार्च २०२३ | ३० सप्टेंबर २०२३ | |
एकूण मालमत्ता (Total Assets) |
१४७.४४ | १६०.३० | १८०.७८ | १९६.३७ |
एकूण महसूल (Total Revenue) |
१६०.९३ | १८५.६१ | २१०.९३ | १०३.२४ |
Profit After Tax (करानंतरचा नफा) |
६.३० | १३.६९ | २०.४९ | १०.३८ |
Net Worth (एकूण मालमत्ता) |
२९.४३ | ४३.१९ | ६३.८८ | ७४.२३ |
Total Borrowing (एकूण कर्ज) |
५१.१० | ६४.२७ | ७०.९६ | ६८.५० |
* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)
Nova agritech ipo marathi subscription review
-> आज पहील्याच दिवशी शेअर बाजार बंद होत असताना आयपीओचे subscription खूपच चांगले झाले. Agritech Limited IPO चे आजचे subscription १०.२५ पट आहे.
-> आज तिसऱ्या दिवशी IPO चे subscription ६२.७३ पट आहे. यात Retail Investors नी ६०.९२ पटीने, नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सनी १५४.२६ पट आणि anchor इन्व्हेस्टर्सनी सुद्धा आपली पसंती दर्शविली आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://novaagri.in/