प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओ २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे आणि २९ फेब्रुवारी २०२४ रोजी बंद होईल तर जाणुया प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती.
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची माहिती | Platinum Industries Limited company Information
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड हि कंपनी ऑगस्ट २०१६ मध्ये स्थापन झाली असून ती भारतातील अग्रगण्य PVC स्टॅबिलायझर्सचे उत्पादक आहे.
कंपनी पीव्हीसी स्टॅबिलायझर्स सोबतच सीपीव्हीसी ॲडिटीव्ह तयार करते.
कंपनीची उत्पादने पीव्हीसी पाईप्स, पीव्हीसी प्रोफाइल, पीव्हीसी फिटिंग्ज, इलेक्ट्रिकल वायर्स आणि केबल्स, एसपीसी फ्लोअर टाइल्स, कडक पीव्हीसी फोम बोर्ड, पॅकेजिंग मटेरियल इत्यादींमध्ये वापरली जातात.
कंपनीची उत्पादने पालघर, महाराष्ट्र येथे बनली जातात आणि ती २१००० चौरस फूट जमिनीवर पसरलेली आहे.
जुलै २०२३ पर्यंत, कंपनीची संपूर्ण भारतात बारा distribution केंद्रे आहेत.
कंपनीच्या उत्पादन युनिटमध्ये ३१ मे २०२३ पर्यंत, ७१ कर्मचारी आणि १७ कामगार आहेत.
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Platinum Industries Limited IPO Availability of Shares
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओची एकूण किंमत २३५.३२ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या सुमारे १३७६१२२५ आहे आणि कंपनीचे सगळेच शेअर्स Fresh Issue आहेत.
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Platinum Industries Limited IPO Share Price and Lot Size
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत १६२ रुपये आणि कमाल (maximum) किंमत १७१ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार १६२ ते १७१ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)
या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ८७ शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ८७ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १६२*८७ = १४,०९४ रुपये ते १७१*८७=१४,८७७ रुपये इतकी आहे.
गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (८७ शेअर्स) म्हणजेच १४,८७७ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (११३१ शेअर्स) म्हणजेच १,९३,४०१ रुपये इतकी आहे.
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओची तारीख | Platinum Industries Limited IPO Date
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओ मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला असून अखेरची तारीख गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख शुक्रवार, १ मार्च २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम सोमवार, ४ मार्च २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच सोमवार, ४ मार्च २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ८७ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि मंगळवार, ५ मार्च २०२४ रोजी प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Platinum Industries Limited Fundamental Information
पीई रेशो P/E (x) | १८.७३ |
इक्विटीवरील रिटर्न (ROE) | ९०.०२ % |
ROCE | ५६.८५ % |
Debt/Equity | ०.२८ |
EPS | ९.१३ |
प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Platinum Industries Limited company Financials (Consolidated) Information
३१ मार्च २०२१ | ३१ मार्च २०२२ | ३१ मार्च २०२३ | ३० सप्टेंबर २०२३ | |
एकूण मालमत्ता (Total Assets) |
३२.२६ | ८४.४८ | १२१.१७ | १३७.७२ |
एकूण महसूल (Total Revenue) |
८९.५३ | १८९.२४ | २३२.५६ | १२३.७३ |
Profit After Tax (करानंतरचा नफा) |
४.८२ | १७.७५ | ३७.५८ | २२.८४ |
Net Worth (एकूण मालमत्ता) |
४.४७ | २२.३४ | ६१.८८ | ८५.०४ |
Total Borrowing (एकूण कर्ज) |
३.२६ | २४.२४ | १७.४३ | ११.४६ |
* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)
अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://platinumindustriesltd.com/