पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Popular Vehicles & Services Limited IPO Review in Marathi

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा आयपीओ ५ मार्च २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी open झाला आहे आणि आज ७ मार्च २०२४ रोजी बंद होईल तर जाणुया पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती.

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.

Popular Vehicles & Services Limited IPO
Popular Vehicles & Services Limited IPO

 

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे आजचे subscription:

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे आजचे subscription ०.४६ पट आहे.

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची माहिती | Popular Vehicles & Services Limited company Information

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड हि कंपनी १९८३ मध्ये स्थापन झाली असून ती भारतातील ऑटोमोबाईल डीलरशिपचा व्यवसाय करीत आहे.

लोकप्रिय वाहनांच्या विक्रीसोबतच त्याच्याशी जोडणाऱ्या इतर सर्विसेससुद्धा कंपनी पुरविते ज्यात ज्यात नवीन आणि पूर्व-मालकी वाहनांची विक्री, सर्व्हिसिंग, स्पेअर पार्ट्सचे वितरण, ड्रायव्हिंग स्कूल आणि तृतीय-पक्ष आर्थिक आणि विमा उत्पादन विक्री यांचा समावेश आहे.

कंपनीचा व्यवसाय तीन विभागांमध्ये विभागला जातो.

  • लक्झरी वाहनांसह प्रवासी वाहने,
  • व्यावसायिक वाहने आणि
  • इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहने

कंपनी सध्या केरळमधील १४ जिल्हे, कर्नाटकमधील ८ जिल्हे, तामिळनाडूमधील १२ जिल्हे आणि महाराष्ट्रातील ७ जिल्हे याठिकाणी ५९ शोरूम, १२६ विक्री केंद्रे आणि बुकिंग कार्यालये, ३१ पूर्व-मालकीचे वाहन शोरूम आणि आउटलेट्स, १३४ अधिकृत (authorized) सेवा केंद्रे, ४० रिटेल आउटलेट्स आणि २४ गोदामे अशा विशाल नेटवर्कद्वारे कार्यरत आहे.

शोरूम व्यतिरिक्त, विक्री केंद्रे आणि बुकिंग कार्यालये वाहनांची विक्री सोपी करतात, तर किरकोळ दुकाने हे वाहनांचे सुटे भाग आणि ॲक्सेसरीजची विक्री आणि वितरण करण्याचे काम करतात.

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Popular Vehicles & Services Limited IPO Availability of Shares

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ६०१.५५ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या सुमारे २,०३,९१,६५१ शेअर्स आहे त्यापैकी कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स म्हणजेच सुमारे ८४,७४,५७६ शेअर्स Fresh Issue आहेत आणि ३५१.५५ कोटींचे शेअर्स म्हणजेच सुमारे १,१९,१७,०७५ शेअर्स ऑफर फॉर सेल आहेत.

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ |  Popular Vehicles & Services Limited Company Share Price and IPO Lot Size

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि २ रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत २८० रुपये आणि कमाल (maximum) किंमत २९५ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार २८० ते २९५ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.) या आयपीओमध्ये कंपनीच्या सहकारी कामगारांसाठी २८ रुपये प्रती शेअर्स सवलत दिली आहे.

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ५० शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ५० शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि २८०*५० = १४,००० रुपये ते  २९५*५०=१४,७५० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (५० शेअर्स) म्हणजेच १४,७५० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (६५० शेअर्स) म्हणजेच १,९१,७५० रुपये इतकी आहे.

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओची तारीख | Popular Vehicles & Services Limited IPO Date

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओ मंगळवार, १२ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला असून आणि अखेरची तारीख गुरुवार, १४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख शुक्रवार, १५ मार्च २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम सोमवार, १८ मार्च २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच सोमवार, १८ मार्च २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ५० शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि मंगळवार, १९ मार्च २०२४ रोजी पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Popular Vehicles & Services Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) २८.८८
इक्विटीवरील रिटर्न (ROE)  १०.४२ %
ROCE ८.८३ %
Debt/Equity १.९९
EPS १०.२२

 

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.popularmaruti.com/

Leave a Comment