प्रीमियर एनर्जी लिमिटेड या कंपनीचा आयपीओ २७ ऑगस्ट २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी open झाला असून आणि आज २९ ऑगस्ट २०२४ रोजी बंद होईल. तर जाणुया प्रीमियर एनर्जी लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती.
प्रीमियर एनर्जी लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होणार आहे.
Premier Energies Limited कंपनीचे आजचे एकूण subscription:
प्रीमियर एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण subscription ६९.४६ पट आहे. त्यातील क्वालिफाइड इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचे एकूण subscription १९४.६५ पट आहे. कंपनीच्या शेअर्सची बऱ्याच प्रमाणात मागणी असलेली पाहायला मिळत आहे.
प्रीमियर एनर्जी लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Premier Energies Limited IPO Availability of Shares
Premier Energies Limited आयपीओची एकूण किंमत २,८३०.४० कोटी रुपये असून शेअर्सची संख्या ६,२८,९७,७७७ आहे त्यातील १,२९१.४० कोटी रुपयांचे ६,२८,९७,७७७ शेअर्स फ्रेश इश्शु (Fresh Issue) आहेत आणि १,५३९ कोटी रुपयांचे ३,४२,००,००० शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale) आहेत.
प्रीमियर एनर्जी लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Premier Energies Limited IPO Share Price and Lot Size
प्रीमियर एनर्जी लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १ रुपये प्रती शेअर आहे.
प्रीमियर एनर्जी लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ४२७ रुपये आणि कमाल (maximum) किंमत ४५० रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ४२७ ते ४५० मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात ( महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO किंवा एफपीओ मिळण्याचे chances वाढतात.)
या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ३३ आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ३३ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ४२७*३३ = १४,०९१ रुपये ते ४५०*३३ = १४,८५० रुपये इतकी आहे.
गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (३३ शेअर्स) म्हणजेच १४,८५० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची (४२९ शेअर्स) म्हणजेच १,९३,०५० रुपये इतकी असेल.
प्रीमियर एनर्जी लिमिटेड आयपीओची तारीख | Premier Energies Limited IPO Date
प्रीमियर एनर्जी लिमिटेड आयपीओ हा मंगळवार, २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला झाला असून अखेरची तारीख गुरुवार, २९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
आयपीओ अलोटमेंट तारीख शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम सोमवार, २ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर सोमवार, २ सप्टेंबर २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ३३ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि मंगळवार, ३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रीमियर एनर्जी लिमिटेड या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.premierenergies.com/