आर के स्वामी लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | R K SWAMY Limited IPO Review in Marathi

 

आर के स्वामी लिमिटेड या कंपनीचा आयपीओ ४ मार्च २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे आणि ६ मार्च २०२४ रोजी बंद होईल तर जाणुया आर के स्वामी लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती.

आर के स्वामी लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.

आर के स्वामी लिमिटेड कंपनीचे आजचे ग्रे मार्केट | GMP Today

कंपनीच्या ग्रे मार्केट चा आजचा प्रीमिअम ५५ रु. प्रती शेअर आहे. आणि ५० शेअर्सच्या लॉट साईझ नुसार ५५ * ५० = २७५०/- रुपयांचा profit पाहायला मिळत आहे. ( ग्रे मार्केट demand नुसार कमी जास्त होत असतो ) म्हणजेच सरासरीनुसार प्रती शेअर मध्ये १९% profit पहायला मिळत आहे.

हे पण वाचा: Mukka Proteins Limited IPO

आर के स्वामी लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती
आर के स्वामी लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती

 

आर के स्वामी लिमिटेड कंपनीची माहिती | R K SWAMY Limited company Information

आर के स्वामी लिमिटेड हि कंपनी १९७३ साली स्थापन झाली असून भारतातील सर्वात मोठी मालकीची integrated marketing services पुरविणारी कंपनी आहे जी creative, मीडिया, डेटा ॲनालिटिक्स आणि मार्केट रिसर्च या व्यवसायात गुंतलेली आहे.

कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये ४,००० हून अधिक ग्राहक संस्थांना service दिली आहे आणि २०२३ या आर्थिक वर्षात १२ शहरांमधील १२ कार्यालयांमधून ४७५ हून अधिक ग्राहकांना सेवा दिली हे क्लायंट मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्सना त्यांच्या यशासाठी महत्त्वाचे इनपुट मानतात.

कंपनीच्या असंख्य ग्राहकांमध्ये आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेड, आयएफबी लिमिटेड, सेरा सॅनिटरीवेअर लिमिटेड, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, ई.आय.डी. – पॅरी (इंडिया) लिमिटेड, फुजीत्सू जनरल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया लिमिटेड, हॅवेल्स इंडिया लिमिटेड, हॉकिन्स कुकर्स लिमिटेड, हिमालय वेलनेस कंपनी, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, लि. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, रॉयल एनफिल्ड (आयशर मोटर्सचे एक युनिट), श्रीराम फायनान्स लिमिटेड, टाटा प्ले लिमिटेड, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आणि युनियन बँक ऑफ इंडिया यासारख्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण क्लायंटचा अमावेश आहे. कंपनी अशा ग्राहकांना शोधते जे भागीदारीवर विश्वास ठेवतात.

कंपनीच्या तीन व्यवसाय विभागांमध्ये १२ शहरांमधील १२ कार्यालये आणि १२ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अंदाजे २,३९१ कर्मचारी काम करतात.

R K SWAMY IPO
R K SWAMY IPO

आर के स्वामी लिमिटेड आयपीओची उपलब्धता | R K SWAMY Limited IPO Availability of Shares

आर के स्वामी लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ४२३.५६ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या सुमारे १,४७,०६,९४४ शेअर्स आहे त्यापैकी कंपनीचे १७३ कोटींचे शेअर्स म्हणजेच सुमारे ६०,०६,९४४ शेअर्स Fresh Issue आहेत आणि २५०.५६ कोटींचे शेअर्स म्हणजेच सुमारे ८७,००,००० शेअर्स ऑफर फॉर सेल आहेत.

आर के स्वामी लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ |  R K SWAMY Limited Company Share Price and IPO Lot Size

आर के स्वामी लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि ५ रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.

आर के स्वामी लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत २७० रुपये आणि कमाल (maximum) किंमत २८८ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार २७० ते २८८ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ५० शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ५० शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि २७०*५० = १३,५०० रुपये ते  २८८*५०=१४,४०० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (५० शेअर्स) म्हणजेच १३,५०० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (६५० शेअर्स) म्हणजेच १,८७,२०० रुपये इतकी आहे.

आर के स्वामी लिमिटेड आयपीओची तारीख | R K SWAMY Limited IPO Date

आर के स्वामी लिमिटेड आयपीओ सोमवार, ४ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द होणार आहे आणि अखेरची तारीख बुधवार, मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

आर के स्वामी लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख गुरुवार, मार्च २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम सोमवार, ११ मार्च २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच सोमवार, ११ मार्च २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ५० शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि मंगळवार, १२ मार्च २०२४ रोजी आर के स्वामी लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

आर के स्वामी लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | R K SWAMY Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) ४०.९६
इक्विटीवरील रिटर्न (ROE)  १६.४७ %
ROCE ६.२९ %
Debt/Equity १.५
EPS ७.०३

आर के स्वामी लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | R K SWAMY Limited company Financials (Consolidated) Information

३१ मार्च २०२१ ३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३० सप्टेंबर २०२३
एकूण मालमत्ता
(Total Assets)
३९०.०६ ४०६.४४ ३१३.६५ २५२.२३
एकूण महसूल
(Total Revenue)
१८३.२२ २४४.९७ २९९.९१ १४२.५५
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
३.०८ १९.२६ ३१.२६ ७.९३
Net Worth
(एकूण मालमत्ता)
९८.२२ १११.९३ १४०.८१ १४६.६६
Total Borrowing
(एकूण कर्ज)
४५.६८ २८.७३ ४.५१ ५१.०५

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.rkswamy.com/

Leave a Comment