सरस्वती साडी डेपो लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Saraswati Saree Depot Limited IPO in marathi

सरस्वती साडी डेपो लिमिटेड आयपीओ १२ ऑगस्ट २०२४ रोजी शेअर बाजारात दाखल झाला असून आयपीओच्या माध्यमातून कंपनी १६०.०१ कोटी रुपये भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

सरस्वती साडी डेपो लिमिटेड आयपीओ एनएसइ आणि बीएसइ अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे.

सगळ्यात अगोदर आपण आयपीओबद्दल माहिती पाहूया.

सरस्वती साडी डेपो लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Saraswati Saree Depot Limited IPO Availability of Shares

सरस्वती साडी डेपो लिमिटेड आयपीओची एकूण किंमत १६०.०१ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या १,००,००,८०० आहे त्यातील १०४ कोटी रुपयांचे ६४,९९,८०० शेअर्स फ्रेश इश्शु (Fresh Issue) आहेत आणि ५६.०१ कोटी रुपयांचे ३५,०१,००० शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale) आहेत.

सरस्वती साडी डेपो लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ  | Saraswati Saree Depot Limited IPO Share Price and Lot Size

सरस्वती साडी डेपो लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर आहे.

Saraswati Saree Depot Ltd. कंपनीच्या आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत १५२ रुपये आणि  कमाल (maximum)  किंमत १६० रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार १५२ ते १६० मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात ( महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO किंवा एफपीओ मिळण्याचे chances वाढतात.)

या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ९० आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ९० शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.

याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १५२*९०= १३,६८० रुपये ते  १६०*९०=१४,४०० रुपये इतकी आहे.

गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (९० शेअर्स) म्हणजेच १४,४०० रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची (११७० शेअर्स) म्हणजेच १,८७,२०० रुपये इतकी आहे.

सरस्वती साडी डेपो लिमिटेड आयपीओची तारीख  | Saraswati Saree Depot Limited IPO Date

सरस्वती साडी डेपो लिमिटेड आयपीओ आज सोमवार, १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता खुला होणार असून अखेरची तारीख बुधवार, १४ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे  दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

आयपीओ अलोटमेंट तारीख शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम सोमवार, १९ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर सोमवार, १९ ऑगस्ट २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ९० शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि मंगळवार, २० ऑगस्ट २०२४ रोजी सरस्वती साडी डेपो लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.

सरस्वती साडी डेपो लिमिटेड कंपनीची माहिती | Saraswati Saree Depot Limited company Information

सरस्वती साडी डेपो लिमिटेड हि कंपनी १९९६ मध्ये स्थापन झाली आहे. अंदाजे आपल्या क्षेत्रात २८ वर्षे जुनी कंपनी आहे. हि कंपनी महिलांच्या पोशाखांचे जसे कुर्ती, ड्रेस मटेरियल, ब्लाउज पीस, लेहेंगा, बॉटम्स इ. चे उत्पादन करते आणि त्यांचे घाऊक विक्री करते.

कंपनी मुख्यत्वे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडूचा समावेश असलेल्या दक्षिण आणि पश्चिम भागात उत्पादनांची विक्री करते. कंपनीचा प्राथमिक व्यवसाय हा साड्यांचा घाऊक (B2B) विभाग आहे. ३० जून २०२४ पर्यंत, कंपनीकडे वेगवेगळ्या department मध्ये ३१४ कर्मचारी होते.

सरस्वती फॅब्रिक्स प्रा. लि. हि या कंपनीची group कंपनी आहे.

सरस्वती साडी डेपो लिमिटेड मुलभूत माहिती | Saraswati Saree Depot Limited Fundamental Information

पीई रेशो P/E (x) २३.०५
इक्विटीवरील रिटर्न (ROE)  ५८.८८
ROCE ६४.४६
Debt/Equity ०.६७
EPS ६.९४

 

सरस्वती साडी डेपो लिमिटेड कंपनीची एकत्रित आर्थिक माहिती | Saraswati Saree Depot Limited Company Financials (Consolidated)

३१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२३ ३१ मार्च २०२४
एकूण मालमत्ता
(Total Assets)
१६९.९३ १८८.८५ २०५.९४
एकूण महसूल
(Total Revenue)
५५०.३१ ६०३.५२ ६१२.५८
Profit After Tax
(करानंतरचा नफा)
१२.३१ २२.९७ २९.५३
Net Worth
(एकूण मालमत्ता)
१२.४१ ३५.३८ ६४.९१
Total Borrowing
(एकूण कर्ज)
६६.६२ ४१.४३ ४३.४९

* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)

सरस्वती साडी डेपो लिमिटेड कंपनीचे प्रमोटर्स | Promoters of Saraswati Saree Depot Limited Company

श्री शंकर दुल्हानी हे कंपनीचे चेअरमन असून श्री विनोद शेवकराम दुल्हानी हे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) आहेत. श्री.महेश साजनदास दुल्हानी आणि श्री राजेश सुजानदास दुल्हानी हे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

 

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.saraswatisareedepot.com/home

Leave a Comment