भारतातील विविध अभियांत्रिकी उद्योगांना स्टीलचे पाईप्स आणि ट्यूब्सचे पुरवठा करणारी कंपनी लवकरच शेअर बाजारात आपले शेअर्स घेऊन येत आहे. कंपनीचे नाव ‘विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड’ असे आहे. या कंपनीचा आयपीओ उद्या १३ फेब्रुवारी २०२४ रोजी खरेदीसाठी उपलब्द होणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत तुम्ही या IPO साठी apply करू शकता. तर जाणुया विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती.
हे पण वाचा: एसएमइ आयपीओ म्हणजे काय?
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.
कंपनीचे आजचे ग्रे मार्केट:
कंपनीच्या ग्रे मार्केट चा आजचा प्रीमिअम सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत १३० रु. प्रती शेअर आहे. आणि ९९ शेअर्सच्या लॉट साईझ नुसार १३० * ९९ = १२,८७० रुपयांचा profit पाहायला मिळत आहे आणि सरासरीनुसार ८६% ने ग्रे मार्केटचा प्रिमिअम वाढला आहे ( ग्रे मार्केट demand नुसार कमी जास्त होत असतो )
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेडची माहिती | Vibhor Steel Tubes Limited IPO Information
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड हि कंपनी २००३ मध्ये स्थापन झाली असून अनेक मोठमोठ्या अभियांत्रिकी उद्योगांना स्टील पाईप्स आणि ट्यूब्सचे उत्पादन सोबतच त्यांची निर्यात आणि पुरवठा सुद्धा करते.
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Vibhor Steel Tubes Limited IPO Availability of Shares
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ७२.१७ कोटी रुपये आहे आणि कंपनीचे सगळेच शेअर्स Fresh Issue आहेत.
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Vibhor Steel Tubes Limited IPO Share Price and Lot Size
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि १० रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत १४१ रुपये आणि कमाल (maximum) किंमत १५१ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार १४१ ते १५१ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)
या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि ९९ शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच ९९ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि १४१*९९ = १३,९५९ रुपये ते १५१*९९=१४,९४९ रुपये इतकी आहे.
गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (९९ शेअर्स) म्हणजेच १४,९४९ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (१२८७ शेअर्स) म्हणजेच १,९४,३३७ रुपये इतकी आहे.
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड आयपीओची तारीख | Vibhor Steel Tubes Limited IPO Date
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड आयपीओ मंगळवार, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द होणार असून अखेरची तारीख गुरुवार, १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड आयपीओ अलोटमेंट तारीख शुक्रवार, १६ फेब्रुवारी २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम सोमवार, १९ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच सोमवार, १९ फेब्रुवारी २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे ९९ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि मंगळवार, २० फेब्रुवारी २०२४ रोजी विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Vibhor Steel Tubes Limited Fundamental Information
पीई रेशो P/E (x) | १०.१७ |
इक्विटीवरील रिटर्न (ROE) | २५.५१ % |
ROCE | १६.४८ % |
Debt/Equity | १.६३ |
EPS | १४.८५ |
विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Vibhor Steel Tubes Limited company Financials (Consolidated) Information
३१ मार्च २०२१ | ३१ मार्च २०२२ | ३१ मार्च २०२३ | ३० सप्टेंबर २०२३ | |
एकूण मालमत्ता (Total Assets) |
१७२.९३ | २४८.५४ | २९३.६३ | ३७६.४८ |
एकूण महसूल (Total Revenue) |
५११.५१ | ८१८.४८ | १,११४.३८ | ५३१.२४ |
Profit After Tax (करानंतरचा नफा) |
०.६९ | ११.३३ | २१.०७ | ८.५२ |
Net Worth (एकूण मालमत्ता) |
६०.४९ | ७१.९७ | ९३.२० | १०१.७६ |
Total Borrowing (एकूण कर्ज) |
५८.७४ | १०६.०७ | १२६.८३ | १६०.२७ |
* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)
अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.vstlindia.com/